यिर्मया 20:8-9
यिर्मया 20:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा मी बोलू लागतो, मी आक्रोश करतो हिंसाचार व विनाश हेच जाहीर करतो. कारण याहवेहच्या वचनामुळे माझ्या वाट्याला दिवसभर निंदा व अप्रतिष्ठाच आली आहे. परंतु जर मी म्हटले, “मी त्यांचे शब्द उच्चारणार नाही किंवा त्यांच्या नावाने संदेश देणार नाही,” तर त्यांचे वचन माझ्या अंतःकरणात अग्नीप्रमाणे पेटते, व तो अग्नी माझ्या हाडात बंदिस्त राहतो. तो आतील आत इतःपर दाबून ठेवणे मला असह्य होते. निश्चितच, मी ते करू शकत नाही.
यिर्मया 20:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मी बोलू लागलो की, “जुलूम, लूट!” हे शब्द मला उच्चारावे लागतात आणि दिवसभर परमेश्वराचे वचन माझ्या निंदेला व अप्रतिष्ठेला कारण झाले आहे. मी म्हणालो, “मी त्याचे नाव काढणार नाही, ह्यापुढे मी त्याच्या नावाने बोलणार नाही, तेव्हा त्याचे वचन माझ्या हृदयात जणू हाडात कोंडलेल्या अग्नीसारखे जळत होते आणि मी स्वतःला आवरता आवरता थकलो, पण मला ते साधेना.
यिर्मया 20:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जेव्हा मी बोललो, तेव्हा मी ओरडलो, मी हिंसा आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो. कारण परमेश्वराचे वचन सारा दिवस माझ्यासाठी निंदा व उपहास असे करण्यात आले आहे. जर मी असे बोललो, मी परमेश्वराबद्दल आता ह्यापुढे विचार करणार नाही, मी त्याचे नाव ह्यापुढे घोषीत करणार नाही. पण त्याचे वचन माझ्या हृदयात, माझ्या हाडांत आग असल्यासारखे होते. म्हणून मी ते समाविष्ट करण्यास संघर्ष करतो परंतु मी त्यामध्ये सक्षम होत नाही.