यिर्मया 21:8-9
यिर्मया 21:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तू या लोकांस सांग, परमेश्वर असे म्हणतो, ‘पाहा! जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग मी तुम्हापुढे ठेवतो, जो या शहरात राहील तो तलवार, उपासमारीने व भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी बाहेर तुम्हास वेढा घातलेल्या खास्द्यांकडे पार निघून जाईल तो वाचेल, आणि त्याचा जीव त्यास लूट असा होईल.
यिर्मया 21:8-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“पुढे या लोकांना सांग, ‘याहवेह म्हणतात: पाहा मी तुमच्यासमोर जीवनाचा मार्ग आणि मरणाचा मार्ग ठेवला आहे. या नगरात जे कोणी राहतील ते तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरतील. परंतु जे कोणी ज्यांनी तुम्हाला वेढा घातला आहे त्या खास्द्यांच्या सैन्यास समर्पण करतील ते जगतील; त्यांचा जीव वाचेल.
यिर्मया 21:8-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ह्या लोकांना असे सांग, ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुम्हांला जीवनाचा मार्ग व मरणाचा मार्ग दाखवतो. ह्या नगरात जो राहील तो तलवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हांला वेढा घालणार्या खास्द्यांना मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल.