यिर्मया 23:3-4
यिर्मया 23:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“मी स्वत: माझ्या उरलेल्या कळपास ज्या सर्व देशात घालवला होता, त्यास एकत्र करणार, आणि त्यांना त्यांच्या कुरणात परत आणीन. मग ती सफल होऊन बहूतपट होतील. मग मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, जो त्यांना पाळील, म्हणजे ती घाबरणार नाहीत व भयभीत होणार नाहीत. त्यातील एकही हरवणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो.
यिर्मया 23:3-4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“जिथे माझ्या कळपाला मी पाठविले आहे, तिथून मी माझ्या कळपाच्या अवशेषाला त्या सर्व देशातून एकत्र करून पुन्हा त्यांच्या मेंढवाड्यात आणेन आणि मग ती मेंढरे फलद्रूप होतील व त्यांची संख्यावाढ होईल. त्यांची काळजी घेण्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे त्यांचे संगोपन करतील, व त्यांना पुन्हा भीती आणि दहशत वाटण्याचे कारण राहणार नाही, तसेच त्यातील कोणी हरविणारही नाही,” असे याहवेह जाहीर करतात.
यिर्मया 23:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यांना त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, ते त्यांना चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.