यिर्मया 46:27
यिर्मया 46:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु तू, माझ्या सेवक याकोबा, भिऊ नकोस. हे इस्राएला, घाबरु नकोस. कारण पाहा, मी तुला दूर देशातून आणि तुझ्या वंशजाला त्यांच्या बंदिवासाच्या देशातून परत आणील. मग याकोबाला पुन्हा शांतता व संरक्षण लाभेल. तेथे कोणीही त्यास भीती दाखविणार नाही.
सामायिक करा
यिर्मया 46 वाचायिर्मया 46:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नको; इस्राएला, निराश होऊ नका. मी बंदिवासाच्या देशातून तुमच्या वंशजांचा दूर देशातून तुमचा बचाव करेन, याकोबाला पुन्हा शांती व संरक्षण मिळेल, त्याला कोणीही भयभीत करणार नाही.
सामायिक करा
यिर्मया 46 वाचायिर्मया 46:27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे माझ्या सेवका, याकोबा, तू भिऊ नकोस; हे इस्राएला, कच खाऊ नकोस; पाहा, मी तुला दूर देशातून वाचवून आणीन, तुझ्या संततीला बंदिवासातून मुक्त करीन; याकोब परत येईल, निर्भयपणे विश्रांती पावेल, त्याला कोणी धाक घालणार नाही.
सामायिक करा
यिर्मया 46 वाचा