योना 4:10-11
योना 4:10-11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परमेश्वर म्हणाला, “ह्या तुंबीसाठी तुला काही श्रम पडले नाहीत, तू हिला वाढवले नाहीस, ही एका रात्रीत वर आली व एका रात्रीत मेली, हिची तू इतकी पर्वा करतोस! तर उजव्याडाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही अशी एक लाख वीस हजारांहून अधिक माणसे व पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्यांची मी पर्वा करू नये काय?”
सामायिक करा
योना 4 वाचायोना 4:10-11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परमेश्वर त्यास म्हणाला, “या वेलीसाठी तू काहीच कष्ट केले नाहीस व तू हिला मोठे केले नाही, ती एका रात्रीत मोठी झाली आणि एका रात्रीत नष्ट झाली, त्या वेलीची तुला एवढी काळजी आहे; ज्यांना उजव्या व डाव्या हाताचा फरक समजत नाही असे एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त लोक या मोठ्या निनवे शहरात आहेत आणि पुष्कळ गुरेढोरे आहेत. त्यांची मी काळजी करू नये काय?”
सामायिक करा
योना 4 वाचा