यहोशवा 22:5
यहोशवा 22:5 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु याहवेहचा सेवक मोशेने तुम्हाला दिलेल्या आज्ञा आणि नियमांचे काळजीपूर्वक पालन करा: याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करा, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागा आणि त्यांच्या नियमानुसार चला, याहवेहला धरून राहा व तुमच्या सर्व अंतःकरणाने आणि तुमच्या संपूर्ण जिवाने त्यांची सेवा करा.”
यहोशवा 22:5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मात्र परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने दिलेली आज्ञा व नियमशास्त्र निष्ठापूर्वक पाळा, म्हणजे आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करा, त्याच्या सर्व मार्गांनी चाला, त्याच्या आज्ञा पाळा, त्याला धरून राहा आणि जिवेभावे त्याची सेवा करा.”
यहोशवा 22:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या आज्ञा आणि जे शास्त्र दिले आहे; त्याचे काटेकोरपणे पालन करण्याविषयी जपा. तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रीती करावी, सर्व मार्गांत त्याचे अनुसरण करावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्याच्याशी बिलगून रहावे आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार जपा.”