लूक 10:41-42
लूक 10:41-42 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
प्रभूने उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस. पण एकच गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो आणि मरीयेने तिच्यासाठी चांगला वाटा निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
लूक 10:41-42 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण प्रभू तिला म्हणाले, “मार्था, मार्था, तू उगाच पुष्कळ गोष्टींची काळजी करीत असते. परंतु वास्तविक, केवळ एकाच गोष्टीची गरज आहे. मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
लूक 10:41-42 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्थे, मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस; परंतु थोडक्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे; मरीयेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही.”
लूक 10:41-42 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींची किंबहुना एकाच गोष्टीची आवश्यकता आहे. मरियेने अधिक चांगला वाटा निवडला आहे. तो तिच्याकडून काढून घेतला जाणार नाही.”