मत्तय 5:15-16
मत्तय 5:15-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याचप्रमाणे लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवण्याऐवजी दिवठणीवर ठेवतात म्हणजे घरातील प्रत्येकाला प्रकाश मिळावा. याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:15-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.
सामायिक करा
मत्तय 5 वाचामत्तय 5:15-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि दिवा लावून तो कोणी टोपलीखाली लपवून ठेवत नाही, उलट तो दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो दिवा घरातील सर्वांना प्रकाश देतो. तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
सामायिक करा
मत्तय 5 वाचा