नहेम्या 12:27
नहेम्या 12:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यरूशलेमची तटबंदीची भिंत लोकांनी समर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरूशलेमेला एकत्र आणले. यरूशलेमची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावांहून आले. देवाची स्तुतीगीते आणि धन्यवादगीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली.
नहेम्या 12:27 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
यरुशलेमच्या नवीन तटाच्या समर्पणविधीमध्ये भाग घेण्यासाठी देशातील सर्वच लेवी जिथे कुठे असतील तिथून शोधून यरुशलेम येथे पाचारण करण्यात आले, जेणेकरून या विधीमध्ये त्यांनी भाग घेऊन साह्य करावे, झांजा, सारंग्या, वीणा यांच्या संगीतासह गीते गाऊन उपकारस्तुती करावी आणि हा आनंदोत्सवाचा सोहळा साजरा करावा.
नहेम्या 12:27 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
यरुशलेमेच्या कोटाच्या समर्पणाच्या वेळी लेव्यांनी आनंद व धन्यवाद करून झांजा, सारंग्या व वीणा वाजवून आणि गाऊन तो प्रसंग साजरा करावा म्हणून त्यांना यरुशलेमेत पोचवण्यासाठी त्यांच्या-त्यांच्या स्थानांतून शोधून काढले.