स्तोत्रसंहिता 30:11-12
स्तोत्रसंहिता 30:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत. म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 30 वाचास्तोत्रसंहिता 30:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले. तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली, जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे. याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 30 वाचास्तोत्रसंहिता 30:11-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू माझा विलाप दूर करून मला नाचायला लावले आहेस; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवले आहेस; ह्यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये; हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी सर्वकाळ तुझे उपकारस्मरण करीन.
सामायिक करा
स्तोत्रसंहिता 30 वाचा