YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 30

30
स्तोत्र 30
एक स्तोत्र. मंदिराच्या समर्पण सोहळ्यासाठी एक गाणे, दावीदाचे स्तोत्र
1याहवेह मी तुमची प्रशंसा करेन,
कारण तुम्ही मला खोल दरीतून बाहेर काढले आहे
आणि माझ्या शत्रूंना माझा उपहास करू दिला नाही.
2हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी तुम्हाला साहाय्यासाठी विनवणी केली
आणि तुम्ही मला रोगमुक्त केले.
3याहवेह तुम्ही मला अधोलोकातून बाहेर काढले;
तुम्ही मला गर्तेत जाण्यापासून वाचविले.
4अहो याहवेहच्या भक्तांनो, त्यांची स्तुतिस्तोत्रे गा,
त्यांच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.
5त्यांचा क्रोध क्षणभर टिकतो,
पण त्यांची कृपा जन्मभर राहते.
विलाप करणे केवळ रात्रभर राहील,
परंतु प्रातःकाल उगवताच आनंद होईल.
6माझ्या भरभराटीच्या वेळी मी म्हणालो,
“मी कधीही डगमगणार नाही.”
7याहवेह, तुमच्या कृपेने
मला बळकट पर्वताप्रमाणे#30:7 म्हणजेच सीयोन पर्वत स्थिर केले होते,
परंतु तुम्ही आपले मुख लपविले,
तेव्हा मी भयभीत झालो.
8याहवेह मी तुमचा धावा केला,
मी प्रभूला कृपेची विनवणी केली.
9मी चिरनिद्रीत होण्यापासून
मी अधोलोकात जाण्यापासून काय लाभ?
माती तुमची स्तुती करेल काय?
ती तुमच्या विश्वासूपणाची साक्ष देईल काय?
10याहवेह, माझे ऐका, मजवर दया करा;
याहवेह मला साहाय्य करा.
11तुम्ही माझ्या शोकाचे रूपांतर हर्षनृत्यात केले.
तुम्ही माझे शोकाचे गोणपाट काढून मला उल्हासाची वस्त्रे घातली,
12जेणेकरून मी शांत न राहता, माझ्या हृदयाने सदैव तुमची स्तुतिस्तोत्रे गात राहावे.
याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी सदासर्वकाळ तुमची प्रशंसा करीतच राहीन.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 30: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन