प्रकटी 8:3-4
प्रकटी 8:3-4 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग आणखी एक देवदूत येऊन ‘वेदीपुढे उभा राहिला’ त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह धूप’ ठेवण्याकरता त्याच्याजवळ पुष्कळ ‘धूप’ दिला होता. देवदूताच्या हातातून ‘धूपाचा’ धूर पवित्र जनांच्या ‘प्रार्थनांसह’ देवासमोर वर चढला.
प्रकटी 8:3-4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
दुसरा एक देवदूत येऊन, वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या प्रार्थनांसह धुप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्रजनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला.
प्रकटी 8:3-4 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर दुसरा एक देवदूत, सोन्याची एक धुपदाणी घेऊन आला व वेदीजवळ उभा राहिला. त्याला राजासनासमोरील सोन्याच्या वेदीवर अर्पण करण्यासाठी परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांच्या प्रार्थना मिश्रित बराच धूप देण्यात आला होता. त्या देवदूताच्या हातातून प्रार्थना मिश्रित धूपाचा सुगंध परमेश्वरासमोर वर चढला.
प्रकटी 8:3-4 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणखी एक देवदूत येऊन वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धूपपात्र होते आणि राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्र जनांच्या प्रार्थनांसह धुपारती करण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता. देवदूताच्या हातातून धुपाचा धूर पवित्र जनांच्या प्रार्थनेसह देवासमोर वर चढला.