प्रकटी 9:20-21
प्रकटी 9:20-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या दैवतांची पूजा करणे त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, चेटके, लैंगिक अनैतिकता व चोऱ्या यांच्याबद्दलही पश्चाताप केला नाही.
प्रकटी 9:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, भूतांची व ज्यास पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी जादूटोणा, व्यभिचार व चोऱ्या ह्यांबद्दलहि पश्चात्ताप केला नाही.
प्रकटी 9:20-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्या पीडांमुळे जे ठार मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या गोष्टींबद्दल पश्चात्ताप केला नाही. म्हणजे, भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची पूजा करणे त्यांनी सोडले नाही. तसेच, त्यांनी केलेले खून, चेटके, जारकर्म, त्यांच्या चोर्या या पापांबद्दल पश्चात्ताप केला नाही.
प्रकटी 9:20-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी ‘आपल्या हातच्या कृत्यांविषयी’ पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, ‘भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची’ पूजा करणे त्यांनी सोडले नाही; आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, ‘चेटके, जारकर्म व चोर्या’ ह्यांबद्दलही पश्चात्ताप केला नाही.