रोमकरांस पत्र 12:3
रोमकरांस पत्र 12:3 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे.
रोमकरांस पत्र 12:3 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मला दिलेल्या कृपेने मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो: पाहिजे त्यापेक्षा स्वतःला अधिक समजू नका, तर आपणास विवेकाने जोखून, परमेश्वराने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने स्वतःला माना.
रोमकरांस पत्र 12:3 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.
रोमकरांस पत्र 12:3 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मला प्राप्त झालेल्या कृपादानामुळे मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःचे मूल्यमापन करा.