ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफटकानमुना
ल्यूक आपल्याला सांगतो की कशा प्रकारे पॉलला येशू हा ज्यू लोकांचा आणि सगळ्या जगाचा मेसॅनिक राजा आहे याची घोषणा केल्याबद्दल सतत मारले गेले, तुरुंगात टाकले गेले, किंवा शहराबाहेर काढले गेले. जेव्हा पॉल कोरिन्थमध्ये आला, त्याचा पुन्हा छळ होणार हे त्याला अपेक्षित होते. पण येशूने पॉलचे सांत्वन केले आणि एका रात्री दृष्टांत देऊन सांगितले, ""घाबरून जाऊ नकोस, बोलत राहा आणि शांत राहू नकोस. मी तुझ्या बरोबर आहे. कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही आणि तुला मारणार नाही, कारण या शहरामध्ये मी खूप ठिकाणी आहे."" आणि खात्रीनिशी, पॉल या शहरामध्ये शास्त्र वचनांमधून शिकवत आणि येशू बद्दल सांगत दीड वर्ष राहू शकला. आणि दरम्यान लोकांनी पॉलवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, जसे येशूने सांगितले होते, ते यशस्वी झाले नाहीत. वास्तविक, ज्या नेत्याने पॉलला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न केला त्याऐवजी त्याच्यावरच हल्ला झाला. पॉलला कॉरिंथ शहराबाहेर काढले नाही, पण जेव्हा योग्य वेळ आली, तो त्याच्या नवीन मित्रांबरोबर सिझेरिया, एन्टिओक, गॅलटियान, फ्रिगिया आणि इफिसस इथे राहणाऱ्या शिष्यांना धैर्य देण्यासाठी शहरातून निघून गेला.
इफिससमध्ये, पॉलने येशूच्या नवीन अनुयायांना पवित्र आत्म्याची भेट सादर केली, आणि त्याने दोन वर्ष शिकवले, आशियामध्ये जे राहत होते त्यांना येशूच्या शुभ वार्तेची शक्ती दिली. बरीच माणसे आश्चर्यकारकरित्या बरी होत होती आणि मुक्त केली जात होती. इतकी की माणसे गूढ गोष्टीपासून दूर जायला लागल्यामुळे शहराची अर्थव्यवस्था स्थलांतरित व्हायला सुरुवात झाली होती आणि येशूचे अनुसरण करण्यासाठी त्यांच्या मूर्त्या पूजणे सोडून देत होती. त्यामुळे सगळे धर्मोपदेशक हादरले होते. स्थानिक व्यापारी ज्यांना या मूर्तींपासून नफा होत होता ते नाराज झाले आणि आपल्या देवीला वाचविण्यासाठी आणि पॉलच्या प्रवासी साथीदारांविरोधात लढा देण्यासाठी जमावाला उत्तेजन देऊ लागले. शहर पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत गेले, आणि शहरातील कारकून बोलेपर्यंत दंगल सुरूच होती.
या योजनेविषयी
ल्यूक आणि अॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.
More
आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com