दुःख कसे हाताळावे?नमुना
या सर्वमध्ये देव कुठे होता?
आपल्या अंधकारमय क्षणांमध्ये,आपण आपले जीवन रागाने भरलेले असे जगू शकतो आणि “या सगळ्यात देव कुठे होता?”असे विचारत तीव्र संतापाने देवाकडे मुठी आवळतो,किंवा जीवन आणि मरण यावरील येशूच्या प्रभुत्वावर आपण विश्वास ठेवू शकतो.
जेव्हा देव आपल्या इच्छेनुसार प्रतिसाद देत नाही तेव्हा आपण अस्वस्थ होण्याचे कारण म्हणजे देवाने आपल्या संकेताप्रमाने कार्य करावे असे वाटते;आम्ही जे काही मागतो ते त्याने करावे अशी आमची इच्छा असते;आम्हाला त्याचा बॉस बनायचे असते. आपल्याला ते सांगण्यासाठी इतक्या शब्दांची गरज नाही,हे सांगण्याची दुसरी पद्धत म्हणजे,देवाला देव होऊ न देता आपल्याला देव व्हायचे असते. म्हणूनच जेव्हा आपण काही मागतो आणि ते देव करत नाही तेव्हा आपण तक्रार करीत राहतो.
आपल्या सर्वांना आपल्या आयुष्यात चमत्कार हवे आहेत. चमत्कार छान असतात;पण ते आमची गहन समस्या सोडवत नाहीत. होय,दयनीय जीवनाऐवजी आपण चांगले जीवन जगू इच्छितो;अशांत जीवन जगण्यापेक्षा आपण सामान्य जीवन जगू इच्छितो. पण शेवटी,आपल्यापैकी कोणालाही आपल्याला हवे तितके नियंत्रण मिळणार नाही. आमचे नुकसान होईल;आपणांस आपल्या प्रियजनांचा मृत्यू पहावा लागेल,आपल्या मुलांना वेदना आणि निराशा अनुभवावी लागेल;आमचे आयुष्य ठरविल्याप्रमाणे दिसणार नाही. आपण कल्पिले होते किंवा अपेक्षिले होते त्याप्रमाणे आमचे जीवन रहाणार नाही.
डॅलस विलार्ड यांनी लिहिले, “ज्या लोकांमध्ये जास्त क्लेश झाला नाही अशा लोकांमध्ये तुम्हाला आढळणारी एक गोष्ट म्हणजे ते योग्यतेवर विश्वास ठेवतात.” त्यांचे बरोबर आहे. आपल्याला आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू - आणि आपले दु:ख - कसे दिसावे याविषयीची पूर्वकल्पना बाजूला ठेवण्याची गरज आहे.
परंतु या सर्वांचे सौंदर्य हे आहे की येशू ख्रिस्त या जगात आरोग्य आणि उपचारांच्या चमत्कारांपेक्षा अधिक आणि चांगले काहीतरी देतो. मरीया आणि मार्थेप्रमाणे आपल्याला पुन्हा जिवंत होण्याची साक्ष देण्याची गरज नाही. देव आपल्या सोबत आहे याची आपल्याला खात्री आहे. आपण येशूच्या शब्दांवर विश्वास ठेवू शकतो ज्याने म्हटले होते, “मी सदैव तुझ्याबरोबर आहे,अगदी जगाच्या शेवटापर्यंत.”
लक्षात ठेवा की देव फक्त आपल्यासोबत रडत नाही. तो मरणातून पुनरुत्थान आणि जीवन आणतो.
येशू आणि लाजरच्या घटनेत,येशू हा कथेचा खरा चमत्कार आहे;तो प्रार्थनेचे अंतिम आणि एकमेव उत्तर आहे. तो पुनरुत्थान आणि जीवन आहे. पुनरुत्जिवन नव्हे तर पुनरुत्थान. उलट/विरुद्ध नाही तर नूतनीकरण. येशूने पाप आणि मृत्यू आणि नरकाचा पराभव केला.
संपूर्ण कथेत योहानाचा मुद्दा - जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला,तर आपल्याला खरे,कायमचे,विपुल,भरीव,सार्वकालिक जीवन मिळेल. जर आपण मेलो,तरीही आपण ते जीवन अनुभवू. पण आताही आपण ते जीवन अनुभवू शकतो कारण आपल्याला माहित असलेले जीवन आणि आपल्याला ज्याची भीती वाटते त्या मृत्यूपेक्षा ते मोठे आहे. “पुनरुत्थान व जीवन मीच आहे;जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल,आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही.”
मग येशू पुढे म्हणाला, “तुझा यावर विश्वास आहे का?”हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा,जेव्हा आपल्याला असा प्रश्न पडतो की, "या सगळ्यात देव कुठे होता?"
या प्रश्नाचे उत्तर असे आहे की तो आपल्यासोबत होता आणि अगदी जवळ आहे,आणि त्याचे पुनरुत्थीत जीवन आपल्याला देऊ इच्छितो. दुःखात असताना तुम्ही त्याची देणगी स्वीकाराल आणि नवीन जीवन अनुभवाल का?
संक्षिप्त: "जेव्हा दुःख आणि वेदना आपल्यावर येतात,तेव्हा शेवटी आपण आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवत नाही आणि कधीच ठेवत नव्हतो हेच पाहतो." - तिमथी केलर.
प्रार्थना: परमेश्वरा,जेव्हा मी तुझ्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे केले तेव्हा तू खूप जवळ होतास हे समजून घेण्यास मला मदत केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. हे पाहण्यास आणि विश्वास ठेवण्यास मला सहाय्य कर. आमेन.
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.
More
https://www.facebook.com/ThangiahVijay