दुःख कसे हाताळावे?नमुना
दुःखाची दोन उदाहरणे
डेव्हिड आणि त्याची पत्नी स्व्हिया फ्लड हे तरुण जोडपे आपल्या २ वर्षांच्या मुलासह,१९२१ मध्ये काँगोमध्ये मिशनरी म्हणून गेले.
अल्पावधीतच त्यांची पत्नी स्व्हियाला मलेरिया झाला. या दरम्यान,आपण गर्भवती असल्याचे तिला समजले आणि तिने अनेक महिने तीव्र ताप सहन केला.
अखेरीस,स्व्हियाचा मलेरिया इतका वाईट झाला की ती अंथरुणाला खिळली आणि एका आठवड्यातच एका निरोगी मुलीला जन्म दिल्यानंतर ती मरण पावली.
आपल्या पत्नीच्या मृत्यूमुळे डेव्हिड फ्लड हादरला होता. जेव्हा तो तिच्या कबरेजवळ आपल्या लहान मुलासोबत उभा होता,त्याच्या शेजारी त्याचा लहान मुलगा होता,तेव्हा त्याला मातीच्या झोपडीतून आपल्या लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. आणि अचानक,त्याच्या मनात कटुता भरली. त्याच्यात राग निर्माण झाला - आणि तो त्यावर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो रागाने ओरडला, “देवा,तू हे का होऊ दिले?आम्ही इथे जीव द्यायला आलो! माझी पत्नी खूप सुंदर,प्रतिभावान होती. आणि ती इथे मृत पडली आहे सत्तावीसाव्या वर्षीच."
“आता मला दोन वर्षांचा एक मुलगा आहे,ज्याचीच मी फारशी काळजी घेऊ शकत नाही तर लहान मुळीचीही काळजी घेण्याचा प्रश्नच नाही. माझा अपेक्षाभंग केलास देवा. आयुष्याचा किती अपव्यय!”
त्याने आपली नवजात मुलगी दुसऱ्या एका मिशनरीला सांभाळण्यासाठी दिली आणि तो गुरागुराला, “मी स्वीडनला परत जात आहे. मी माझी पत्नी गमावली आहे आणि स्वाभाविकच मी या बाळाची काळजी घेऊ शकत नाही. देवाने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.” त्याबरोबर,तो बंदराच्या दिशेने निघाला,केवळ त्याच्या स्वतःच्या पाचरणालाच नव्हे तर देवालाही नाकारून.
बऱ्याच वर्षांनंतर त्याच्या मुलीला तो एका बिल्डिंगमध्ये सापडला होता जेथे दारूच्या बाटल्या त्याच्याभोवती पडल्या होत्या. तो आता त्र्याहत्तर वर्षांचा होता आणि त्याला मधुमेहाचा त्रास होता. त्याला पक्षाघाताचा झटकाही आला होता आणि मोतीबिंदूने त्याचे दोन्ही डोळे झाकले होते.
पण देवाची स्तुती करा की त्याच्या मुलीशी झालेल्या भेटीमुळे त्याला पश्चात्ताप झाला आणि तो मृत्यूपूर्वी परमेश्वराकडे परत वळला. पण त्याचे संपूर्ण आयुष्य वाया गेले.
लेटी काउमन आणि तिचा नवरा चार्ल्स १९०० च्या शतकात मिशनरी म्हणून जपानला गेले.
सोळा वर्षांच्या दैनंदिन सभा,बायबल इन्स्टिट्यूट आणि संस्थेची देखरेख केल्यानंतर आणि कोरिया आणि चीनमध्ये प्रचार दौरे केल्यानंतर,चार्ल्सचे आरोग्य ढासळले. त्यामुळे चार्ल्स आणि लेटी अमेरिकेला परतले.
कॅलिफोर्नियामध्ये चार्ल्सला हृदयविकाराचा झटका आला,त्यानंतर त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली. लेटीने तिच्या प्रिय चार्ल्सची पुढील सहा वर्षे काळजी घेतली. परंतु दीर्घ लढाईनंतर १९२४ च्या सप्टेंबरमध्ये चार्ल्सचा मृत्यू झाला.
चार्ल्सचा मृत्यू लेटीसाठी विनाशकारी होता. ते निपुत्रिक असल्याने,चार्ल्स तिच्यासाठी सर्व काही महत्त्वाचा होता. त्यांच्या “लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या गेल्या होत्या” आणि ते एकमेकांना पूर्णपणे समर्पित होते. तिने तिच्या डायरीत लिहिले, “हा पृथ्वीवरील जिवंत नर्क आहे!” लेटीने प्रार्थना केली होती की देव चार्ल्सला बरे करो. त्याने का नाही केले?शेकडो लोकांनी चार्ल्सला बरे करण्यासाठी देवाकडे उचलून धरले नसते का?देव कुठे होता?"
लेटी तिच्या मदतीसाठी देवाच्या वचनाकडे वळली. देव तिला विचारत होता की काय तिला तिच्या पतीने बरे व्हावे हे तिच्यासाठी देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावे यापेक्षा अधिक पसंतीचे वाटते काय?.लेटीने बायबल,दुःख आणि उत्तेजनाविषयीची पुस्तके वाचण्यात तास घालवले. तिने या पुस्तकांमधून अनेक सत्ये पूनरलिखित केली. तिला हे फारसे माहीत नव्हते की ती हे काम फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी करत आहे,कारण मिसेस काउमनच्या अनुभवांमुळे,भग्न हृदयामुळे आणि तिने वाचलेल्या पुस्तकांमधून मिळवलेल्या शेकडो शहाणपणाच्या शब्दां/गोष्टींमधून, 'वाळवंटातील प्रवाह'या पुस्तकाचा जन्म झाला. . आणि आता ९० वर्षांहून अधिक काळ'वाळवंटातील प्रवाह'च्या प्रती उपलब्ध नाहीत असे केव्हा झालेच नाही. आणि अनेक भाषांमध्ये सहा दशलक्ष पेक्षा जास्त प्रती विकल्या आहेत.
तुम्ही देवाला तुमच्या दु:खाचा इतरांच्या जीवनाला स्पर्श करण्यास उपयोग करण्याची परवानगी देऊ शकता किंवा तुम्ही तुमचे आयुष्य वाया घालवू शकता. निवड तुमची आहे.
संक्षिप्त: "लक्षात ठेवा,तुम्हाला एकच जीवन आहे. एवढेच. तुम्ही देवासाठी बनलेले आहात. ते वाया घालवू नका.” - जॉन पायपर.
प्रार्थना: प्रभु,प्रिय व्यक्तीच्या नुकसानीमुळे मला कधीही तुझ्यावर किंवा जीवनावर हार न मानण्यास मदत कर. माझे आयुष्य वाया घालवू नये म्हणून मला मदत कर तर माझे दुःख तुझ्या गौरवासाठी होऊ दे. आमेन
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.
More
https://www.facebook.com/ThangiahVijay