YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yāनमुना

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yā

6 पैकी 4 दिवस

१ करिंथ. ११:२५ मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणिम्हटले,“हाप्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.”

ऐतिहासिकदृष्ट्या वल्हांडणाच्या वेळी प्राशन करण्यात आलेल्या द्राक्षारसाच्या प्याल्याला तारणाचा प्याला असे पण म्हटले जाते.

आपण जाणतो की केवळ प्रभु येशूचे रक्त, त्याच्या कृपेच्या दालनातील त्याच्या सिंहासनाकडेआपल्याला धैर्याने प्रवेश करता यावा म्हणून, आपल्याकरिता मार्ग सुकर करते. यज्ञपशूंच्या रक्ताने नव्हे तर आपल्या तारणदात्याच्या जीवनदायी रक्ताने आपण नवीन आणि जिवंत अशा मार्गाने प्रभुच्या कृपादालनात प्रवेश करतो.

हा नवा करार काय आहे?

हा अखंड अपरिमितप्रीती, कृपा आणि दयेचा करार आहे. हा एक असा करार आहे जो स्वर्गीय परमेश्वर पित्यासोबतचे आपले भंगलेले व तुटलेले नाते जोडून पुनर्संचयित करतो.

हा एक असा करार आहे जो आपल्याला देवाची मुले बनवतो आणि ख्रिस्ताबरोबर सह-वारस बनवतो. ख्रिस्ताचे सांडलेले रक्त हे एक असे स्मरणपत्र आहे जे आपल्याला सांगते की आपली सर्व भूतकाळातील, वर्तमान आणि भविष्यातील पापे एकदाचीच नाहीशी केली गेली आहेत. आम्हांला आता ख्रिस्ताचे नीतिमत्व लाभले आहे. केवळ यामुळेच परमेश्वराची मर्जी माझ्यावर आधीच बहाल झाली असून त्याचे प्रेम व अनुग्रह मिळविण्यासाठी मला आता वेगळे असे झटावे लागणार नाही कारण परमेश्वर त्याच्या प्रीतीस्तव पुर्वीपासून माझ्यासाठी अनुकूल आहे.

हा एक असा करार आहे जो आपल्याला निश्चितपणे सांगतो कि आपण परमेश्वराच्या, आपल्यावरील ख्रिस्त येशूमधील असलेल्या प्रीतीपासून पुन्हा कधीही दुरावणार नाही.

सदैव स्मरण करण्यासारखे हे सत्य किती महान, आनंददायक आणि आश्चर्यकारक आहे.

वधस्तंभावरील प्रभु येशूच्या बलिदानामुळे आपल्याला जे लाभले आहे त्याबद्दल प्रभु येशूचे आभार मानण्यासाठी आपण थोडा वेळ घेऊ या. तुम्ही आता देवाच्या कुटुंबाचा एक भाग आहात म्हणून ज्या गोष्टी तुमच्या झाल्या आहेत अशापाच गोष्टींचा तुम्ही विचार करू शकता का?

दिवस 3दिवस 5

या योजनेविषयी

प्रभुभोजनाच्या मेजासमीप या -Prabhūcyā Bhōjanāsāṭhī Yā

प्रभु येशू ख्रिस्त आपल्यासोबत अंतरंगाच्या गुजगोष्टी करू इच्छितो. चला तर आपण एकत्रितपणे “प्रभुभोजनाचा मेज” या विषयावर मनन-चिंतन करू या. प्रभु येशूने प्रस्थापित केलेले हे भविष्यसूचक कार्य आपण कशासाठी आणि का साजरे करतो या विषयी नवाझ डिक्रुझ (Navaz DCruz) यांनी लिहिलेला (आणि विक्रम अरविंद जाधव यांनी अनुवादित केलेला) हा सहा दिवसीय भक्ति-लेख आपणांस एका वेगळ्या चिंतनयात्रेवर घेऊन जाईल.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Word Of Grace Church चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.wordofgracechurch.org/