YouVersion लोगो
सर्च आयकॉन

तुमची सर्वोत्तम गुंतवणूक!नमुना

तुमची सर्वोत्तम गुंतवणूक!

5 पैकी 5 दिवस

"देवाची तत्त्वे दररोज लागू करा"

" तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे." स्तोत्र ११९:१०५

ख्रिस्ती लोकांसाठी, देवाचे वचन कधीकधी अंधकारमय जगात प्रकाशमान शक्ती प्रदान करते. देवाचे वचन तेव्हाच प्रकाशाचा स्रोत बनेल जेव्हा आपण त्याच्या सत्यांबद्दल मोकळे असू आणि त्याला आपल्या जीवनात खोलवर प्रवेश करू देऊ. येशूने मत्तयमध्ये आढळणाऱ्या एका दृष्टान्तात याचे वर्णन केले आहे:

“पाहा, पेरणारा पेरणी करण्यास निघाला. आणि तो पेरत असता काही बी वाटेवर पडले व पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले.

काही खडकाळीवर पडले, तेथे त्याला फारशी माती नव्हती, आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले; आणि सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्याला मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले; मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली.

काही चांगल्या जमिनीत पडले; मग त्याचे कोठे शंभरपट, कोठे साठपट तर कोठे तीसपट, असे पीक आले." मत्तय १३:३-८

या गोष्टीतील बीज पवित्र शास्त्राचे प्रतिनिधित्व करते आणि मातीची भिन्न परिस्थिती देवाचे वचन स्वीकारण्याची आपली तयारी आणि इच्छा दर्शवते. लक्षात घ्या की शेतकऱ्याने पेरलेल्या सर्व बियाण्यांचा त्याला अपेक्षित परिणाम मिळाला नाही; फक्त चांगल्या जमिनीत पेरलेले बी. येशूच्या या दाखल्याच्या स्पष्टीकरणासाठी मत्तय १३:१८-२३ वाचा. आपल्या जीवनात "चांगली माती" जोपासण्याचा अर्थ असा आहे की आपण देवाच्या वचनाला आपल्या विचारांमध्ये प्रवेश करू देतो आणि आपल्या अंतःकरणाच्या हेतू आणि वृत्तींवर प्रभाव टाकू शकतो.

“कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे." इब्री. ४:१२

तसेच, देवाच्या वचनावर कार्य करण्याची आपली तयारी ती प्रभावीपणे अंमलात आणण्याच्या केंद्रस्थानी आहे:

"वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता." याकोब १:२२

देवाच्या वचनाला आपल्या विचारांमध्ये शिरकाव करण्यास आणि आपल्या विवेकाला आकार देण्यास परवानगी देऊन, आपण दररोज घेतलेल्या निर्णयांबद्दल आपल्या मनोवृत्ती आणि हेतू प्रभावीपणे तपासू शकतो. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा त्याचे वचन जीवन जगण्यासाठी सर्वात प्रभावी मार्गदर्शक ठरते.

“परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल." याकोब १:२५

देवाच्या वचनाची बीजे तुमच्या जीवनात पेरण्यासाठी प्रोत्साहित व्हा; ते दररोज वाचा, समजून घ्या आणि लागू करा. आशीर्वादाचे भरघोस पीक तुमची वाट पाहत आहे!

दिवस 4

या योजनेविषयी

तुमची सर्वोत्तम गुंतवणूक!

आशीर्वादित आणि मुबलक परतफेड मिळविण्याची सुरुवात योग्य गुंतवणूक करण्यापासून होते. जर तुम्ही नवीन ख्रिस्ती असाल तर देवाच्या वचनाचा नियमितपणे अभ्यास करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विश्वासात मोठी गुंतवणूक करू शकत नाही. ते दररोज वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि प्रभावीपणे लागू करण्यात मदत करण्यासाठी येथे प्रारंभ करा. "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr