YouVersion लोगो
सर्च आयकॉन

देवाला प्रथम स्थान द्यानमुना

देवाला प्रथम स्थान द्या

5 पैकी 5 दिवस

" विजयी जीवन जगण्यासाठी पाच सूत्री धोरण".

हा विभाग पापाला आणि मोहाना प्रभावीपणे हाताळण्यासाठी बायबल-आधारित धोरणाचे ५ मुद्दे प्रदान करतो. ही योजना कृतीत आणणे हा देवाला तुमच्या जीवनात प्रथम स्थान देण्याचा आणखी एक मार्ग आहे!

1. येशू ख्रिस्ताच्या कार्याद्वारे देव तुम्हाला परिपूर्ण, पवित्र आणि निर्दोष म्हणून पाहतो हे समजून घ्या. (२ करिंथ. ५:२१ वाचा.) पुष्कळ वेळा अपराधीपणा आणि लाज हे पापाचे सर्वात विनाशकारी परिणाम असतात. हे समजून घेणे की ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच, पाप काहीही असो, विजयासाठी मूलभूत आहे (रोम. ८:१).

2. तुमची पापे कबूल करा. ( १ योहान १:९ वाचा.) आपल्या पापांची कबुली देणे म्हणजे प्रथम आपल्या स्वतःच्या अंतःकरणात आणि मनात त्या पापांची कबुली देणे आणि नंतर देवाला ते कबूल करणे. आपल्या पापाची कबुली देणे म्हणजे ते इतरांसमोर सार्वजनिक करणे असा होत नाही. कबुली तुमच्या आणि देवामध्ये आहे.

3. उत्तरदायी बना. (याकोब ५:१६ वाचा.) जवळचा विश्वासू ख्रिस्ती मित्र, पाळक किंवा कुटुंबातील सदस्य शोधणे ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, हा लढाईत उत्तरदायित्व आणि प्रार्थना समर्थन सादर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

4. मोहाचे उगम टाळा. (याकोब १:१३-१५ वाचा.) अंमलात आणण्यासाठी हा सर्वात आव्हानात्मक मुद्दा आहे आणि त्यासाठी काही सर्जनशील विचार आणि नियोजन आवश्यक आहे. सत्य हे आहे की जर तुम्ही मोह टाळू शकलात तर तुम्ही पाप टाळाल.

5. देवाचे वचन वाचा. (स्तोत्र ११९:११ वाचा.) देवाचे वचन आपल्याला स्पष्टपणे सांगते की आपण ते “आपल्या मनात जपून ठेवले आहे” तेव्हा ते मोहाला आणि पापाला नाही म्हणण्याचे विशेष सामर्थ्य देते.

दिवस 4

या योजनेविषयी

देवाला प्रथम स्थान द्या

देवाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणे ही काही एक वेळची घटना नाही... ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही विश्वासात नवीन असाल किंवा ख्रिस्ताचे "अनुभवी" अनुयायी असाल, तरीही, तुम्हाला ही योजना समजण्यास आणि लागू करण्यास सोपी वाटेल आणि विजयी ख्रिस्ती जीवनासाठी एक अत्यंत प्रभावी धोरण वाटेल. "या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr