YouVersion လိုဂို
ရွာရန္ အိုင္ကြန္

लूक 20

20
येशुना अधिकारविषयी संशय
(मत्तय २१:२३-२७; मार्क ११:२७-३३)
1त्या दिनसमा एकदाव अस व्हयनं की, येशु मंदिरमा लोकसले शिकाडी राहिंता अनं सुवार्ता सांगी राहिंता तवय मुख्य याजक अनं शास्त्री ह्या वडील लोकसनासंगे त्यानापुढे ईसन त्याले बोलनात, 2“तुम्हीन हाई गोष्ट कोणता अधिकारतीन करतस, अनी तुमले हाऊ अधिकार देणारा कोण शे, हाई आमले सांगा?”
3तवय येशुनी त्यासले उत्तर दिधं, “मी पण तुमले एक प्रश्न ईचारस; त्यानं माले उत्तर द्या. 4योहानले बाप्तिस्मा कराना अधिकार देवपाईन व्हता की, माणुसपाईन व्हता?”
5तवय त्या आपसमा चर्चा करीसन बोलनात, आपण काय उत्तर देवाणं “स्वर्गपाईन शे अस सांगं, तर हाऊ सांगी, मंग तुम्हीन त्यानावर ईश्वास का ठेया नही? 6अनी माणुसपाईन शे अस जर सांगं, तर सर्व लोके आपले दगडमार करतीन, कारण योहान संदेष्टा व्हता अस त्यासना भरवसा शे.” 7तवय त्यासनी उत्तर दिधं, “तो कोणापाईन भेटना हाई आमले माहित नही.”
8येशुनी त्यासले सांगं, “तर मंग मी पण तुमले सांगस नही की, कोणता अधिकारतीन ह्या गोष्टी मी करस.”
द्राक्षमळाना दृष्टांत
(मत्तय २१:३३-४६; मार्क १२:१-१२)
9मंग तो लोकसले हाऊ दृष्टांत सांगाले लागना; कोणी एक माणुसनी “द्राक्षमया लावा” अनी तो बटाईवर दिसन बराच दिन परदेशमा जाईन राहिना. 10मंग द्राक्षना हंगाम येवावर मळामालकनी त्याना वाटा लेवाले बटाईदार एक नोकरले शेतकरीसकडे धाडं; पण त्या शेतकरीसनी त्याले मारझोड करीसन रिकामं धाडी दिधं. 11परत त्यानी दूसरा एक नोकरले धाडं; त्याले बी मारीनझोडीन अनं त्याना अपमान करीसन रिकामं धाडी दिधं. 12परत त्यानी तिसराले धाडं; त्याले पण त्यासनी जखमी करीसन बाहेर फेकी दिधं. 13तवय द्राक्षमयाना मालक बोलना, “मी आते काय करू? मी मना आवडता पोऱ्याले धाडस; कदाचित त्या त्याना तरी मान राखतीन!” 14पण शेतकरी त्याले दखीसन आपसमा ईचार करीसन बोलनात, “हाऊ ते वारीस शे; याले आपण मारी टाकुत म्हणजे मळा आपलाच व्हई जाई!” 15मंग त्यासनी त्याले द्राक्षमयाना बाहेर काढीसन मारी टाकं; “तर द्राक्षमयाना मालक त्यासनं काय करी?” 16तो ईसन त्या शेतकरीसना नाश करी अनं द्राक्षमया दूसरासले सोपी दि. हाई ऐकीसन त्या बोलनात, “अस नको व्हवाले!” 17येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, तर जो “दगड बांधणारासनी नापसंत करा तोच कोणशिला व्हयेल शे, अस जे शास्त्रमा लिखेल शे त्याना अर्थ काय? 18जो कोणी त्या दगडवर पडी त्याना तुकडा तुकडा व्हतीन; पण ज्या कोणवर तो पडी त्याना तो भुगा भुगा करी टाकी.”
कैसरले कर देवाबाबत प्रश्न
(मत्तय २२:१५-२२; मार्क १२:१३-१७)
19तवय शास्त्री अनं मुख्य याजक यासनी त्याच येळले येशुले धराना प्रयत्न करा; पण त्यासले लोकसनी भिती वाटणी; कारण येशुनी हाऊ दृष्टांत आपले लाईन दिधा अस त्यासले वाटनं. 20मंग त्या त्यानावर नजर ठेईन राहिनात अनी येशुले प्रश्न ईचारिन त्याना बोलामा फसाडीन सुभेदारना ताबामा अनं रोमी सरकारना अधिकारमा धरी देवाकरता काही गुप्त हेरसले धार्मीकतेनं ढोंग रचाडीन त्यानाकडे धाडं. 21गुप्त हेरसनी येशुले सांगं, गुरजी, तुम्हीन योग्य बोलतस अनं शिकाडतस; तुम्हीन तोंड दखीन बोलतस नही, तर देवना खरा मार्ग शिकाडतस हाई आमले माहित शे. 22आम्हीन “कैसरले कर देवानं हाई योग्य शे की, नही?” 23येशुनी त्यासनं युक्ती वळखीन त्यासले सांगं, 24“माले एक चांदिनं नाणं दखाडा, यानावर कोण चित्र अनी लेख शे?” त्या बोलनात, “रोमना राजानं.” 25तवय येशुनी त्यासले सांगं, “तर जे राजानं शे ते राजाले अनं देवनं ते देवले द्या.” 26तवय लोकसना समोर या त्याना बोलनावर त्यासले त्याले धरता ई नही राहींत, अनी त्यानी देयल उत्तरनं नवल वाटीन त्या गप्पच राहिनात.
पुनरूत्थाननाविषयी प्रश्न
(मत्तय २२:२३-३३; मार्क १२:१८-२७)
27 # प्रेषित २३:८ नंतर, पुनरूत्थान व्हस नही अस म्हणनारा सदुकी लोकसमाईन बराच जणसनी येशुजोडे ईसन त्याले ईचारं, 28“गुरजी, मोशेनी आमनाकरता असा लिखेल शे की; ‘एखादाना भाऊ त्यानी बायको असतांना मरना अनं त्याले संतान नही शे, तर त्याना भाऊनी त्या बाईसंगे लगीन करीसन आपला भाऊना वंश चालाडानं.’ 29असाच कोणतरी सात भाऊ व्हतात; त्यासमाईन पहिला भाऊनी बायको करी अनं तो बिगर संतानना मरी गया. 30मंग दुसरानी अनं तिसरानी बी ती बाईसंगे लगीन करं; 31असंच त्या सातही भाऊ बिगर संतानना मरी गयात. 32शेवट ती बाई बी मरनी. 33तर पुनरूत्थानना येळले ती त्यासनामाईन कोणी बायको राही? कारण त्या सात जणसनी तिनासंगे लगीन करेल व्हतं.”
34येशुनी त्यासले सांगं, “या युगमा लोके लगीन करी लेतस अनं लगीन करी देतस; 35पण त्या ज्या युगमा प्रवेश कराकरता अनी अनं मरेल मातीन जिवत व्हईन ऊठाकरता योग्य ठरेल शेतस त्या, लगीन कराऊत नही अनी करी बी देवाऊत नही; 36अनी त्या पुढे मराऊत बी नहीत, कारण त्या देवदूतसना मायक राहतीन, अनी मरेल मातीन जिवत व्हईन ऊठामुये त्या देवना पोऱ्या व्हतीन. 37आखो मरेल बी ऊठतस हाई मोशेनी जळणारा झुडूपणा उदाहरणमा, परमेश्वरले ‘अब्राहामना देव, इसहाकना देव अनं याकोबना देव’ अस म्हणीन दखाडेल शे; 38तो मरेलसना देव नही, तर जिवतसना शे; कारण त्यानामा सर्वाच जिवत शेतस.”
39तवय शास्त्रीसमाईन बराच जणसनी सांगं, “गुरजी, बराबर बोलनात!” 40मंग त्याले अजुन काही ईचाराले त्यासनी हिम्मत व्हईनी नही.
ख्रिस्त कोणा पोऱ्या शे?
(मत्तय २२:४१-४६; मार्क १२:३५-३७)
41त्यावर येशुनी त्यासले ईचारं, “ख्रिस्त दावीदना पोऱ्या शे अस का म्हणतस? 42कारण दावीद स्वतः स्तोत्रना पुस्तकमा सांगस, ‘प्रभुनी मना प्रभुले सांगं; तू मना उजवीकडे बस 43जोपावत मी तुना शत्रुसले तुना पायसनं आसन करस नही.’ 44दावीद त्याले जर ‘प्रभु’ म्हणस; तर तो त्याना पोऱ्या कसा राही?”
शास्त्रीसबद्दल इशारा
(मत्तय २३:१-३६; मार्क १२:३८-४०)
45जवय सर्व लोके त्यानं ऐकी राहींतात तवय येशुनी आपला शिष्यसले सांगं, 46“शास्त्रीसबद्दल सावध राहा; त्यासले लांबलांब झगा घालीन फिराले चांगलं वाटस; बाजारमा नमस्कार अनं सन्मान, सभास्थानमा मुख्य आसन अनं मेजवानीमा चांगली जागा हाई त्यासले आवडस; 47त्या विधवा बाईसनी संपत्ती हड्डप करतस अनी त्यासना गैरफायदा उचलतस अनी ढोंगीसनामायक लांबलचक प्रार्थना करतस; त्यासले भलती शिक्षा व्हई!”

လက္ရွိေရြးခ်ယ္ထားမွု

लूक 20: Aii25

အေရာင္မွတ္ခ်က္

မၽွေဝရန္

ကူးယူ

None

မိမိစက္ကိရိယာအားလုံးတြင္ မိမိအေရာင္ခ်ယ္ေသာအရာမ်ားကို သိမ္းဆည္းထားလိုပါသလား။ စာရင္းသြင္းပါ (သို႔) အေကာင့္ဝင္လိုက္ပါ