YouVersion လိုဂို
ရွာရန္ အိုင္ကြန္

मत्तय 13

13
बिया पेरणी करणाऱ्याची कथा
(मार्क 4:1-9; लूका 8:4-8)
1काई दिवसानंतर येशू परत गालील समुद्राच्या काटावर देवाच वचन सांगत होता, 2अन् त्याच्यापासी एवढे लोकं जमा झाले, कि त्याले डोंग्यावर चढावं लागलं, अन् सगळी गर्दी काटावर उभी रायली. 3अन् येशू त्यायले कथेतून गोष्टी सांगू लागला कि पाहा “एक शेतकरी आपल्या वावरात बिया पेरणी करायले निघाला.
4अन् पेरत असतांना, असं झालं कि काही बिया रस्त्याच्या किनाऱ्यावर पडल्या, अन् ते पाखराईन येऊन खाऊन टाकल्या. 5-6काई बिया खडकावर पडल्या, तती त्यायले नरम माती नाई मिळाल्यानं, ते लवकर उगयले, पण सूर्य निघाला अन् सुर्याची गर्मी वाढल्यावर ते, झाड जळून गेले, कावून की त्याची मुयी जमिनीत खोल गेली नव्हती.
7काई बिया अशा जागी पडल्या जती काटेरी झाड उगवले होते, पण काटेरी झाडाच्याने ते वाढू शकले नाई, 8-9पण काई बिया चांगल्या काळ्या मातीवर पडल्या, अन् ते झाड चांगले उगवले व मोठेहुन काईले तीसपट, काईले साठपट, अन् काईले शंभरपट पीकं आले. ज्या कोणाले माह्यावाला आवाज आयकू येते त्यानं हे समज्याचा प्रयत्न करा.”
कथेचा उद्देश
(मार्क 4:10-12; लूका 8:9-10)
10येशूच्या शिष्यायनं जवळ येऊन त्याले म्हतलं, “कि तू लोकाय संग कथेतून कावून बोलतो?” 11येशूनं उत्तर देलं, “तुमाले तर देवाच्या राज्याच रहस्य समजून घ्यायची समज देली हाय, पण त्यायले नाई, 12कावून की, ज्याच्यापासी देवाच्या वचनाच ज्ञान हाय, त्याले अजून दिल्या जाईन अन् ज्याच्यापासी नाई हाय, तवा जे काई त्याच्यापासी अशीन ते पण वापस घेतल्या जाईन.
13मी त्यायच्या संग कथेतून यासाठी बोलतो, कावून कि पवित्रशास्त्राच हे वचन पूर व्हावं. ते दररोज पायत असतीन पण त्यायले स्पष्ट दिसीन नाई, ते दररोज आयकतं असतीन, पण त्यायले समजीन नाई 14त्यायच्या विषयात यशया भविष्यवक्त्याची पवित्रशास्त्रात लिवलेली ही भविष्यवाणी पूर्ण होते, कि तुमी कानाने आयकसान पण समजीन नाई, अन् डोयाने तर पायसान, पण तुमाले कधीच समजणार नाई.”
15कावून कि या लोकायचे मन कठोर झाले हाय, अन् ते कानाने तर आयकतं नाई, अन् त्यायनं त्यायचे डोयायले बंद केलं हाय, कधी असं नाई झालं पायजे, कि ते डोयाने पायतीन अन् कानाने आयकतीन, अन् मनात समजतीन, अन् वापस देवाकडे फिरतीन अन् मी त्यायले चांगलं करीन. 16“पण धन्य हायत, तुमचे डोये, जे पायतात, अन् तुमचे कान जे आयकतात 17कावून कि मी तुमाले खरंखोर सांगतो, लय भविष्यवक्त्यांनी अन् चांगले काम करणाऱ्या लोकायन इच्छा ठेवली, की ज्या गोष्टी तुमी पायता, ते त्यायन पण पहाव पण पाऊ शकले नाई, अन् ज्या गोष्टी तुमी आयकता, त्यायन पण आयकावे पण आयकू शकले नाई.”
बिया पेरणाऱ्याच्या कथेची व्याख्या
(मार्क 4:13-20; लूका 8:11-15)
18-19“पण तुमी पेरनाऱ्याची कथा आयका, एक शेतकरी जसा बिया पेरतो तसचं देवाच वचन पण पेरतो. काई लोकं त्या रस्त्या सारखे हायत, ज्याच्यावर बिया पळल्या, जवा ते लोकं देवाचं वचन आयकतात, तवा सैतान पटकन येते, अन् त्यायले हे सगळे देवाचे वचन भुलवून टाकते.
20-21अन् काई लोकं असे हायत ज्याची बरोबरी त्या जमिनी सोबत केली जाऊ शकते, ज्या खळखाळ जमिनीत पडल्या, हे लोकं देवाच्या वचनाले आयकून लवकर स्वीकार करतात. पण ते देवाच्या वचनाले आपल्या मनात मुया पर्यंत वाढू देत नाई, व काई दिवसानं वचनाच्यान त्यायच्यावर संकट किंवा सताव होते, तवा ते लवकरच नाराज होऊन जातात.
22-23काई बिया काटेरी झाडावर पडल्या, अशा लोकायची बरोबरी काट्याच्या झाडायच्या जमिनी बरोबर केली हाय, जवा ते देवाच वचन आयकतात तवा ते खूप खुश होते पण जवा त्यायले संसाराची कायजी असते व पैशावर अधिक प्रेम अन् अलग-अलग वस्तुची आवड त्यायच्या जीवनात येते, अन् देवाच्या वचनात अडथळा आणते, अन् त्याच्यामुळे त्यायच्या जीवनात फळ येत नाई. अन् चांगल्या मातीत पेरलेल्या बिया अशा हाय, जे लोकं देवाच वचन आयकून स्विकारतात मंग त्यायच्या जीवनात चांगले परिणाम येते, कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे फळ आणते.”
जंगली बियाची कथा
24येशूने त्यायले अजून एक कथा सांगतली, “कि स्वर्गाच राज्य त्या माणसाच्या सारखे हाय, ज्यानं आपल्या वावरात चांगले बिया पेरल्या, 25पण जवा लोकं झोपले होते, तवा त्याच्या वैरी येऊन गव्हाच्या मधात जंगली बिया वावरात पेरून चालला गेला, 26अन् जवा बियातून कोम बायर निघाले व थोडं वाढलं, तवा जंगली दाण्याचे झाड पण दिसले,
27तवा मालकाच्या नौकरायन येऊन त्याले म्हतलं, हे स्वामी काय तू आपल्या वावरात चांगलं बिया नाई पेरलं होतं? मंग जंगली बियाचे झाड त्यात कसे निघाले? 28मालकान त्याले म्हतलं, हे कोण्या वैऱ्याचं काम हाय, नौकरायन त्याले म्हतलं, काय तुह्याली इच्छा हे हाय, कि आमी जाऊन त्यायले उपळून जमा करू?
29मालकान म्हतलं कि, असं झालं नाई पायजे, कि जंगली दाण्याच्या झाडाय संग गहू पण उपडल्या जावा. 30सोंग्यापर्यंत त्याले संग मोठा होऊ द्या, अन् काप्याच्यावाक्ती मी सोंगनाऱ्याईले सांगीन कि पयले जंगली दाण्याचे झाड जमा करून पेटव्या साठी त्याचे गट्ठे बांधा, अन् गव्हाले माह्या गोदामात जमा करा.”
मवरीच्या दाण्याची कथा
(मार्क 4:30-34; लूका 13:18-21)
31-32येशूनं त्यायले म्हतलं मी तुमाले अजून एक कथा सांगतो, “स्वर्गाच राज्य एका मवरीच्या दाण्यासारखं हाय, जवा तो वावरात पेरतात, तवा तो सगळ्या बिया पेक्षा लहान व बारीक असते. ज्यावाक्ती ते बिया जमिनीत पेरल्या जाते व ते उगवते, अन् वाढते तवा तो सगळ्या रोपामध्ये ते मोठा झाड होते. अन् त्याले एवढ्या फांद्या फुटतात की अभायातले पाखरं, येऊन त्याच्या सावलीत रायतात व घर बनवतात.”
खमीराची कथा
(लूका 13:20-21)
33येशूनं त्यायले अजून एक कथा सांगतली, “स्वर्गाच राज्य, खमीरा सारखे हाय, ज्याले कोण्या बाईने घेऊन तीन पायल्या (साहा किलो) पीटात मिळवलं, अन् ते हळू-हळू सगळे खमीर झाले.”
कथेचा उपयोग
34ह्या सगळ्या गोष्टी येशूनं कथेतून लोकायले सांगतल्या, अन् कथे शिवाय तो त्यायले काहीच देवाच्या बाऱ्यात सांगत नव्हता. 35कि जे वचन भविष्यवक्ताच्या व्दारे सांगतल, होतं ते पूर्ण व्हावं “मी कथा सांगायले बोलीन व त्या गोष्टी ज्या जगाच्या उत्पती पासून गुप्त होत्या त्या प्रगट करीन.#13:35 मी कथा सांगायले बोलीन हे वचन स्त्रोत्रसहीता 78:2 मधून घेतल्या गेलं हाय.
जंगली बियाच्या कथेची व्याख्या
36तवा येशू लोकायच्या गर्दीले सोडून घरी आला, अन् त्याच्या शिष्यायनं त्याचा पासी येऊन म्हतलं, “कि वावराच्या जंगली दाण्याची कथा आमाले समजावून सांग.” 37येशूनं त्यायले या कथेचा अर्थ असा सांगतला, “चांगल्या बियाले, पेरणारा मालक जो माणसाचा पोरगा ख्रिस्त हाय.” 38वावर संसार हाय, चांगलं बिया देवाच्या राज्याची लेकरं, अन् जंगली बिया सैतानाचे लेकरं हायत.
39ज्या वैरीने त्याले पेरलं तो सैतान हाय, कापणी जगाचा अंत हाय, अन् कापणारे देवदूत हायत, 40अन् जसे जंगली दाण्याचे झाड जमा केले जातात अन् पेटवल्या जातात, तसचं जगाच्या आखरी मध्ये होईन. 41मी, माणसाचा पोरगा आपल्या देवदूतायले पाठवीन अन् ते देवाच्या राज्यातून सगळे अधर्मी काम करणाऱ्यायले अन् जे दुसऱ्या लोकायसाठी पाप करण्यासाठी कारण बनतात, त्यायले हटवून टाकीन.
42अन् देवदूत त्यायले आगीच्या भट्टीत टाकतीन, जतीसा दुखानं रडणं अन् दात खानं अशीन. 43त्यावाक्ती चांगले काम करणारे आपल्या देवबापाच्या राज्यात सूर्या सारखे चमकतीन, “ज्या कोणाले माह्यावाला आवाज आयकू येते त्यानं हे समज्याचा प्रयत्न करा.”
गुप्त धन
44“स्वर्गाच राज्य वावरात लपवलेल्या धना सारखं हाय, जे कोण्या माणसाले भेटलं, अन् त्यानं ते लपवलं अन् आनंदाने जाऊन आपली सगळी संपत्ती इकून टाकली, अन् त्या वावराले विकत घेतलं”
अनमोल मोती
45“मंग स्वर्गाच राज्य एका व्यापाऱ्या सारखं हाय, जो चांगल्या मोतीच्या शोधात होता, 46अन् जवा त्याले एक बहुमुल्य मोती सापडला तवा त्यानं आपलं सगळे काई इकून टाकलं, अन् तो मोती घेऊन घेतला.”
जाळ्याची कथा
47“मंग स्वर्गाच राज्य एक त्या मोठ्या जाळ्या सारखं हाय, जे समुद्रात टाकल्या गेलं, अन् सगळ्या प्रकारच्या मासोयायले जमा करून आणलं. 48अन् जवा जाळं भरलं, तवा मासोया पकडणाऱ्यायन त्याले काटावर ओडून आणलं, अन् बसून चांगल्या-चांगल्या तर भांडयाईत जमा केल्या, अन् बेकार-बेकार फेकून देल्या.
49जगाच्या आखरीले असचं होईन, देवदूत येऊन बेकारांना धर्मी लोकापासून अलग करतीन, 50अन् त्यायले आगीच्या भट्टीत टाकून देतीन, जती दुखानं रडणं अन् दात खानं अशीन.”
नव्या अन् जुन्या शिक्षेच महत्व
51तवा येशूनं आपल्या शिष्यायले विचारलं “काय तुमाले ह्या गोष्टी समजल्या?” त्यायन त्याले म्हतलं “हो प्रभू” 52मंग परत येशूनं शिष्यायले म्हतलं, “हरएक मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक ज्यायनं स्वर्गाच्या राज्याची शिकवण घेतली हाय, ते त्या घरच्या माणसा सारखा हाय, जे आपल्या घराच्या भंडारातून नव्या व अन् जुन्या मूल्यवान वस्तु काढते.”
येशूचा नासरत नगरात वापस येणे
(मार्क 6:1-6; लूका 4:16-30)
53जवा येशूनं ह्या सगळ्या कथा सांगतल्या तवा तो ततून चालला गेला. 54अन् आपल्या नासरत गावात येऊन त्या दिवशी तो धार्मिक सभास्थानात येऊन असा देवाच संदेश देऊ लागला, कि लय लोकं त्याचं आयकून हापचक झाले, अन् म्हणाले, “याले हे सगळे देवाच्या वचनाच ज्ञान अन् चमत्कार कऱ्याची ताकत कुठून भेटली.
55हा तर वाळ्याचा पोरगा हाय, अन् मरिया त्याची माय हाय, अन् याकोब, योसेफ, यहुदा व शिमोन त्याचे भाऊ हायेत. 56अन् त्याच्या सगळ्या बईनी, आमच्या वस्तीतच रायते, मंग याले हे सगळं ज्ञान कुठून भेटलं?” 57अशाप्रकारे ते लोकं त्याच्याच्यान दोषी ठरले पण येशूने त्यायले म्हतलं, “भविष्यवक्ता आपला देश अन् आपलं घराले सोडून अजून कुठेही अपमानित होतं नाई.” 58मंग येशू त्या लोकायच्या अविश्वासाच्याने तती ज्यास्त चमत्काराचे काम करू शकला नाई.

လက္ရွိေရြးခ်ယ္ထားမွု

मत्तय 13: VAHNT

အေရာင္မွတ္ခ်က္

မၽွေဝရန္

ကူးယူ

None

မိမိစက္ကိရိယာအားလုံးတြင္ မိမိအေရာင္ခ်ယ္ေသာအရာမ်ားကို သိမ္းဆည္းထားလိုပါသလား။ စာရင္းသြင္းပါ (သို႔) အေကာင့္ဝင္လိုက္ပါ