मत्तय भूमिका
भूमिका
मत्तय ची सुवार्था हा संदेश देते कि येशू ख्रिस्त फक्त तो तारणारा हाय, ज्याच्या येण्याची भविष्यवाणी केल्या गेली होती. देवाने जुन्या नियमात हजारो वर्षा पयले आपल्या लोकाय संग केली गेलेल्या कराराले त्याचं तारणाऱ्याच्या व्दारे पूर्ण केलं. हे शुभ सुवार्था फक्त यहुदी लोकायसाठीचं नाई हाय, ज्यायच्या मध्ये येशू जन्मला होता, अन् त्याचे पालन पोषण झाले, पण सगळ्या जगाच्या लोकायसाठी हाय.
मत्तयने लिवलेल्या सुवार्थेला खूप सावधानी पूर्वक व्यवस्थित लिवल्या गेलं हाय. याची सुरुवात येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वर्णनापासून होते, मंग त्याचा बाप्तिस्मा अन् परीक्षेचे वर्णन हाय, अन् तवा गालील प्रांतात प्रचार, शिक्षा, अन् बिमार लोकायले चांगलं करण्याचे वर्णन हाय. याच्यानंतर या सुवार्था मध्ये येशूची गालीलातून यरुशलेम परेंत यात्रा अन् येशूच्या जीवनातल्या शेवटच्या हप्ताचा घटनेचा वर्णन हाय, ज्याची पराकाष्ठा त्याचे वधस्तंभावर चढवणे अन् मेलेल्यातून जिवंत होणे हाय.
या सुवार्था मध्ये येशू एक महान गुरुच्या रुपात प्रस्तुत केले हाय. त्याले देवाच्या नियमाची व्याख्या करण्याचा अधिकार हाय, अन् तो देवाच्या राज्याची शिकवण देतो. त्याच्या शिक्षेले पाच भागात वाटल्या जाऊ शकते, (1) पहाडावरचा उपदेश, अन् स्वर्ग राज्याच्या नागरिकायचे काम अन् कर्त्यव्य अन् अधिकार अन् आखरी आशेच्या संबधित (अध्याय 5-7); (2) बारा शिष्यायले सेवाकार्याची शिकवण देणे. (अध्याय 10); (3) स्वर्ग राज्याच्या संबधित कथा. (अध्याय 18); (5) अन् स्वर्ग-राज्य येण्याचा संबधित अन् वर्तमान काळाच्या अंताच्या संबधित शिक्षा.
रूप-रेखा :
वंशावली अन् येशू ख्रिस्ताचा जन्म 1:1-2:23
योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे सेवाकार्य 3:1-12
येशूचा बाप्तिस्मा अन् परीक्षा 3:13-4:11
गालीलात येशूची जनसेवा 4:12-18:35
गालीलातून यरुशलेम परेंत यात्रा 19:1-20:34
यरुशलेम मध्ये आखरी हप्ता 21:1-27:66
प्रभू येशूच पुनरुत्थान अन् त्याचे दिसणे 28:1-20
Obecnie wybrane:
मत्तय भूमिका: VAHNT
Podkreślenie
Udostępnij
Kopiuj
Chcesz, aby twoje zakreślenia były zapisywane na wszystkich twoich urządzeniach? Zarejestruj się lub zaloguj
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.