Logótipo YouVersion
Ícone de pesquisa

मत्तय 18

18
स्वर्गना राज्यमा मोठा कोण?
(मार्क ९:३३-३७; लूक ९:४६-४८)
1 # लूक २२:२४ त्या येळले शिष्य येशुकडे ईसन बोलणात, स्वर्गना राज्यमा मोठा कोण? 2तवय त्यानी एक धाकला पोऱ्याले बलाईन त्याले त्यासना मझार उभं करं अनी बोलना; 3#मार्क १०:१५; लूक १८:१७मी तुमले सत्य सांगस, की, तुमनं मन बदलाशिवाय अनं तुम्हीन धाकला पोऱ्यासना मायक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हवावुच नही. 4यामुये जो कोणी स्वतःले ह्या धाकला पोऱ्यासना मायक नम्र करी, तोच स्वर्गना राज्यमा मोठा व्हई; 5अनी जो कोणी मना नावतीन असा धाकला पोऱ्याले जवळ करी त्यानी माले जोडे करं अस व्हई
आडफाटा आणनारासले इशारा
(मार्क ९:४२-४८; लूक १७:१,)
6अनी जो कोणी मनावर ईश्वास ठेवणारा या धाकलासपैकी एखादाले जरी पाप कराले प्रवृत्त करस, त्याना गळामा जातानी मोठी तळी बांधीन समुद्रमा खोल पाणीमा बुडाई देवाणं यामा त्यानं हित शे. 7आडफाटासमुये जगना धिक्कार असो! आडफाटा तर येतीनच, पण जो माणुस आडफाटा लई, त्याना धिक्कार असो! 8#मत्तय ५:३०तुना हात किंवा तुना पाय तुले आडफाटा करी तर त्या तोडीन फेकी दे; दोन हात किंवा दोन पाय राहिसन सार्वकालिक अग्नीमा पडापेक्षा लंगडा व्हईसन सार्वकालिक जिवनमा जावानं हाई तुनाकरता चांगल शे. 9#मत्तय ५:२९तुना डोयानी आडफाटा करा, तर तो उपटी टाक; दोन डोया राहिसन अग्नीनरकमा पडापेक्षा एक डोया राहीसन सार्वकालिक जिवनमा जावानं हाई तुनाकरता चांगल शे. 10#लूक १९:१०“दखा, तुम्हीन ह्या धाकला लेकरंसपैकी एकले बी तुच्छ मानु नका; कारण, मी तुमले सांगस की, स्वर्गमा त्यासना देवदूत मना स्वर्ग माधला बापनं तोंड कायम दखतस.” 11आखो ज्या दवडायेल शेतस त्यासनं तारण कराले मनुष्यना पोऱ्या येल शे.#१८:११ आखो ज्या दवडायेल शेतस त्यासनं तारण कराले मनुष्यना पोऱ्या येल शे. काही जुना शास्त्रभागमा हाई वचन वाचाले भेटस नही
दवडायेल मेंढरूना दृष्टांत
12तुमले काय वाटस; जर एक माणुसजोडे शंभर मेंढरं शेतस अनी त्यामातीन एक मेंढरू दवडी गयं, तर तो माणुस त्या नव्यान्नव मेंढरसले डोंगरवर सोडीन त्या दवडेल मेंढरूले दखाले जावाव नही का? 13कदाचित ते त्याले सापडनं तर, त्यानाकडे ज्या नव्यान्नव मेंढरं सुरक्षित व्हतात त्यासनापेक्षा जास्त आनंद त्याले ते मेंढरू सापडावर व्हई, हाई मी तुमले सत्य सांगस. 14तसच ह्या धाकलासनामाधला कोणाच नाश व्हवाले नको अशी तुमना स्वर्ग माधला बापनी ईच्छा शे.
भाऊ बहिणीसना पाप
15 # लूक १७:३ जर तुना भाऊ पाप करी, तर जा अनी त्याले एकांतमा लई जाईन समजाड, जर त्यानी तुनं ऐकं तर तुना भाऊ तुले परत भेटी गया. 16पण त्यानी जर तुनं नही ऐकं तर तु आखो दोन एक जणसले तुनासंगे लई जा; यानाकरता की, तुम्हीन दोन्ही जे बोलशात त्या प्रत्येक शब्दना ज्या दोन किंवा तीन शेतस त्या साक्षीदार राहतीन अनी त्या बी समजाडतीन. 17अनी जर त्यानी त्यासनं बी ऐकं नही तर मंडळीले सांग; अनी त्यानी मंडळीनं बी नही ऐकं तर, तो तुनासाठे एक जकातदार किंवा परकानामायक व्हवो.
विरोध करानं अनी परवानंगी देवानं
18 # मत्तय १६:१९; योहान २०:२३ मी तुमले सत्य सांगस की, जे काही तुम्हीन पृथ्वीवर बंद करशात ते स्वर्गमा बंद व्हई; अनी जे काही तुम्हीन पृथ्वीवर खोलशात, ते स्वर्गमा खोलाई जाई.
एकत्र प्रार्थना
19आखो मी तुमले सत्य सांगस, पृथ्वीवर तुमना मातीन दोनजण कोणतीही एक गोष्टकरता एकचित्त व्हईन ईनंती करतीन तर ती ईनंती मना स्वर्ग माधला बापकडतीन पुरी कराई जाई; 20कारण जठे दोन किंवा तिन जण मना नावतीन एकत्र जमतस, तठे त्यासनामा मी शे.
निर्दय सेवकना दृष्टांत
21 # लूक १७:३,४ तवय पेत्र येशुकडे ईसन बोलना, प्रभुजी मना भाऊनी मनाविरूध्द अपराध करा, तर मी त्याले कितला दाव माफ करू? सात दाव का? 22येशुनी त्याले सांगं, मी तुले अस नही म्हणस की, सात दाव, तर सातना सत्तरदाव कर. 23यामुये स्वर्गनं राज्य एक राजाना मायक शे; त्या राजाले आपला सेवकसकडतीन हिशोब ल्यावा अस वाटनं; 24अनी जवय तो हिशोब ली राहिंता तवय ज्यानावर कोटी रूपया कर्ज व्हतं त्याले त्यानाकडे आणं. 25पण त्यान्याकडे कर्ज फेडाले काहीच नव्हतं म्हणीन त्याना मालकनी हुकूम करा की, त्यानी बायको, पोऱ्या अनं त्यानं जे काही व्हई ते ईकीसन त्यानी कर्ज फेडानं. 26तवय त्या दासनी त्याना पाया पडीसन सांगं, माले वागाडी ल्या, म्हणजे मी सर्वकाही फेडी दिसु 27तवय त्या धनीले त्यानी दया वनी अनी त्यानी त्याले अनं त्यानं कर्ज बी माफ करी दिधं. 28#१८:२८ (एक चांदीना शिक्का) (एकदिनार) एक दिननी मजुरी.तो सेवक बाहेर गया अनी ज्यानाकडे त्याना शंभर दिनार रूपया बाकी व्हतात असा त्याना जोडीना सेवक त्याले दखायना, तवय त्यानी त्या सेवकनी गचांडी धरीन बोलना, तुनाकडे मनं जे लेणं शे ते दे. 29त्या सेवकनी पाया पडीन रावण्या करात, माले वागाडी ले, म्हणजे तुनं देणं मी फेडी दिसु; 30पण त्यानी त्यानं अजिबात ऐक नही तो कर्ज फेडत नही तोपावत त्यानी त्याले बंदिगृहमा टाकी दिधं. 31तवय हाऊ घडेल प्रकार दखीसन त्यानासंगेना सेवकसले दुःख व्हयनं अनी त्यासनी ईसन सर्वा प्रकार आपला मालकले सांगा. 32तवय त्याना मालकनी त्याले बलाईन सांगं, अरे दुष्ट सेवका, तु माले ईनंती करी अनी मी तुनं सर्व कर्ज माफ करं; 33जशी दया मी तुनावर करी, तशी तुले तुना जोडीदार सेवकवर करता नही वनी का? 34मंग त्याना मालकनी संतापमा त्याले सर्व कर्ज फेडस तोपावत शिक्षा भोगाकरता बंदीगृहाना ताबामा दिधं. 35जर तुम्हीन प्रत्येक आपापला बंधुजणसले मनपाईन माफ कराव नही, तर मना स्वर्ग माधला बाप बी तुमनासंगे तसच करी.

Atualmente selecionado:

मत्तय 18: NTAii20

Destaque

Partilhar

Copiar

None

Quer salvar os seus destaques em todos os seus dispositivos? Faça o seu registo ou inicie sessão