मत्तय 4

4
येशुनी परिक्षा
(मार्क १:१२,१३; लूक ४:१-१३)
1 # इब्री २:१८; ४:१५ तवय सैतानकडतीन येशुनी परिक्षा व्हवाले पाहिजे म्हणीसन आत्मा त्याले जंगलमा लई गया. 2मंग त्यानी चाळीस दिन चाळीस रात उपवास करा, त्यानंतर त्याले भलती भूक लागनी. 3मंग सैतान येशुना जोडे ईसन त्याले बोलना; “तु देवना पोऱ्या शे, तर ह्या दगडले आज्ञा कर की, भाकर व्हई जा. 4पण येशुनी त्याले उत्तर दिधं, ‘माणुस फक्त भाकर खाईसन नही तर देवना मूख माईन निंघणारा प्रत्येक वचनघाई जगी, असा शास्त्रलेख शे.’” 5मंग सैतान येशुले पवित्र नगर यरूशलेममा लई गया अनी मंदिरना शेंडावर त्याले उभं करं; 6मंग त्यानी त्याले सांगं, “तु देवना पोऱ्या व्हशी तर आठेन खाल उडी मार,” कारण शास्त्रलेखमा अस लिखेल शे की, “तुनं रक्षण कराकरता देव आपला स्वर्गदूतसले तुनाबद्दल आज्ञा दि.” तुना पायसले दगडनी ठेच लागाले नको म्हणीन त्या तुले हातवर झेली लेतीन. 7मंग येशुनी त्याले उत्तर दिधं, आखो असा शास्त्रलेख शे की, परमेश्वर जो तुना देव त्यानी परिक्षा दखु नको. 8मंग सैतान त्याले एक भलता उचा डोंगरवर लई गया अनी त्याले जगमाधला सर्वा राज्य अनी त्यासनं वैभव फटकामा दखाडं, 9अनी त्याले सांगं, “जर तु पाया पडीन माले नमन करशी तर हाई सर्व तुनं व्हई जाई.” 10तवय येशुनी त्याले उत्तर दिधं, “अरे सैतान, आठेन चालता व्हय,” कारण अस शास्त्रमा लिखेल शे की, “परमेश्वर तुना देव यानी भक्ती कर, अनी फक्त त्यानीच सेवा कर!” 11मंग सैतान तठेन निंघी गया, अनी दखा, देवदूत ईसन त्यानी सेवा कराले लागनात.
येशु प्रवचनले सुरवात करस.
(मार्क १:१४-१५; लूक ४:१४-१५)
12 # मत्तय १४:३; मार्क ६:१७; लूक ३:१९,२० मंग योहानले कैदखानामा टाकं हाई ऐकीसन येशु गालीलमा गया; 13#योहान २:१२अनी नासरेथ सोडीन जबूलून अनं नफताली यासना हद्दीमातला समुद्रना किनारावरला कफर्णहुम गावले जाईसन राहीना; 14हाई यानाकरता की, यशया संदेष्टानाद्वारा जे सांगेल व्हतं ते पुर्ण व्हयनं, ते अस की, 15जबूलून अनं नफताली प्रांत, समुद्र किनारावरला, यार्देनना पलीकडला देश, गैरयहूदी लोकसना गालील प्रांत. 16आठला अंधारामा बशेल लोकसनी मोठा उजेड दखा अनी ज्या मृत्युना प्रदेशमा, अनी छायामा बठेल व्हतात, त्यासनासाठे एक मोठी ज्योती उगम पावनी शे. 17#मत्तय ३:२तवयपाईन येशु उपदेश करीसन सांगु लागना की, “पापसपाईन फिरा कारण स्वर्गनं राज्य जोडे येल शे!”
येशु मासा धरणारासले बलावस
(मार्क १:१६-२०; लूक ५:१-११)
18मंग येशु गालील समुद्रना जोडेतीन चाली राहिंता. तवय त्यानी शिमोन पेत्र अनी त्याना भाऊ आंद्रिया या दोन्ही भाऊसले समुद्रमा जाळं टाकतांना दखं; कारण त्या मासा धरणारा व्हतात. 19येशुनी त्यासले सांगं, “मनामांगे या, लोकसले देवना राज्यमा कसं लयतस, हाई मी तुमले शिकाडसु.” 20त्यासनी लगेच जाळं तठेच सोडं अनी त्या त्याना मांगे निंघनात. 21तठेन पुढे जावानंतर त्यानी दूसरा दोन्ही भाऊ म्हणजे, जब्दीना पोऱ्या याकोब, अनं योहान यासले आपला बाप जब्दीनासंगे नावमा जाळं सवारतांना दखं, अनी येशुनी त्यासले बलायं. 22मंग त्यासनी लगेच त्यासना बाप अनं नावले सोडीसन त्यानामांगे चालु लागनात.
येशुनी सेवा
(लूक ६:१७-१९)
23 # मत्तय ९:३५; मार्क १:३९ मंग येशु यहूदी लोकसना सभास्थानमा, प्रवचन करत अनं देवराज्यनी सुवार्ता गाजाडत सर्वा कमजोर अनं रोगीसले बरं करत गालीलभर फिरना; 24अनी त्यानी बातमी सिरिया देशभर पसरनी; तवय ज्या येग-येगळा प्रकारना रोगग्रस्त व्हतात, ज्या भूत लागेल, मिरगिवाला अनं लखवा व्हयेल व्हतात असा सर्वासले त्यानाकडे लयनात, अनी त्यानी त्यासले बरं करं. 25मंग गालील, दकापलीस#४:२५ दकापलीस दकापलीस म्हणजे दहा गावसनं शहर, यरूशलेम, यहूदीया, अनं यार्देन नदीना पलीकडला प्रदेशमातीन लोकसनी गर्दी त्यानामांगे चालाले लागनी.

ప్రస్తుతం ఎంపిక చేయబడింది:

मत्तय 4: NTAii20

హైలైట్

షేర్ చేయి

కాపీ

None

మీ పరికరాలన్నింటి వ్యాప్తంగా మీ హైలైట్స్ సేవ్ చేయబడాలనుకుంటున్నారా? సైన్ అప్ చేయండి లేదా సైన్ ఇన్ చేయండి