युहन्ना 2

2
काना गावात लग्न
1दोन दिवसाच्या नंतर गालील प्रांताच्या काना गावात कोणाचं तरी लग्न होतं, अन् येशूची माय पण तती होती. 2येशू व त्याचे शिष्य पण त्या लग्नात आमंत्रित होते. 3जवा पाहुण्यायन सगळा अंगुराचा रस पेऊन टाकला, तवा येशूच्या मायनं त्याले म्हतलं, “त्यायच्यापासी अंगुराचा रस नाई रायला.” 4येशूनं तिले म्हतलं, “हे बाई, तू मले कावून सांगून रायली हाय? माह्यी वेळ आता नाई आली हाय.” 5पण त्याच्या मायनं नवकरायले म्हतलं, “जे काई तो तुमाले म्हणीन, तेच करजा.” 6यहुदी लोकायच्या धार्मिक नियमाच्या रिती प्रमाणे हात धुवायची रिती होती, असं करासाठी त्यायनं तती गोट्यायचे सहा मडके ठेवलेले होते. ज्याच्यात दोन-दोन तीन-तीन मन (जवळपास शंभर लिटर) पाणी बसत जाय. 7येशूनं त्या नवकरायले म्हतलं, “मडक्यात पाणी भरा.” तवा त्यायनं ते शिगीसांड भरलं. 8तवा येशूनं नवकरायले म्हतलं, “आता पाणी काढून जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याकडे घेऊन जा.” अन् ते घेऊन गेले. 9जवा जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यान ते पाणी चाखल, जे अंगुराचा रस बनलं होतं, अन् त्याले मालूम नव्हत कि ते कुठून आलं; पण ज्या कामवाल्यायन पाणी भरलं होतं, त्यायले मालूम होतं, तवा जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यान नवरदेवाले बलावून म्हतलं, 10“चांगला अंगुराचा रस देतात, अन् जवा लोकं पिऊन चाकून जातात, तवा साधारण अंगुराचा रस देते, पण तू चांगला अंगुराचा रस आतापरेंत ठेवला हाय.” 11येशूनं गालील प्रांतातल्या काना गावात आपला हा पयला चमत्कार दाखवून आपला गौरव प्रगट केला, अन् त्याच्या शिष्यायनं त्याच्यावर विश्वास केला कि तो ख्रिस्त हाय. 12त्यानंतर तो अन् त्याची माय अन् भाऊ अन् शिष्य कफरनहूम शहरात गेले, अन् तती काई दिवस रायले.
देवळातून व्यापारी लोकायले बायर काढणे
(मत्तय 21:12-13; मार्क 11:15-17; लूका 19:45-46)
13मंग यहुदी लोकायचा फसह सणाचा वेळ होता, अन् येशू यरुशलेम शहरात गेला. 14अन् त्यानं देवळात बैल अन् मेंढरं अन् कबुतर इकणाऱ्या व पैसे बदलणाऱ्या व्यापाऱ्यायले#2:14 पैसे बदलणाऱ्या व्यापाऱ्यायले त्यावाक्ती व्यापारी लोकं रोमी शिक्याच्या बदल्यात देवळात करचे सिक्के द्यासाठी व्यापार करत होते. बसलेलं पायलं. 15तवा त्यानं दोऱ्यायचा एक फटका बनवला, अन् सगळ्या मेंढरायले अन् बैलाले देवळातून बायर काढून टाकलं, अन् व्यापाऱ्यायचे पैसे फेकून देले, अन् त्यायचे टेबल उलटे केले. 16देवळातल्या कबुतर इकणाऱ्यायले म्हतलं “यायले इथून घेऊन जा, माह्या बापाच्या घराले व्यापाऱ्याचे घर बनवू नका.” 17तवा त्याच्या शिष्यायले आठवण आली, कि दाविदान या वचनायले पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, “तुह्या देवळाची भक्ती माह्या अंदर आगी सारखी जयत हाय.” 18या घटनेवर यहुदी पुढाऱ्यायन त्याले विचारलं, “तू आमाले कोणता आश्चर्य पूर्ण चमत्कार दाखऊ शकते, ज्याच्यान आमाले हे मालूम होईन तुमाले ते कऱ्याचा अधिकार हाय.” 19येशूनं त्याले उत्तर देलं, “या देवळाले पाडून टाका, अन् मी त्याले तीन दिवसात परत बनवीन.” 20यहुदी पुढाऱ्यायन म्हतलं, “या देवळाले बांध्याले छेचाळीस वर्ष लागले हाय, अन् काय तू त्याले तीन दिवसात बनवशिन?” 21पण येशू ज्या देवळाच्या बाऱ्यात बोलून रायला होता, ते त्याचं शरीर होतं. 22मंग जवा तो मुर्द्यातून परत जिवंत झाल्या तवा त्याच्या शिष्यायले आठवण आलं कि त्यानं असं म्हतलं होतं; अन् त्यायनं पवित्रशास्त्रात जे ख्रिस्ताच्या मुर्द्यातून परत जिवंत होण्याच्या बाऱ्यात म्हणते, अन् जे येशूनं म्हतलं होतं, त्याच्यावर विश्वास केला.
येशू माणसाचे मन ओयखते
23जवा येशू यरुशलेम शहरात फसह सणाच्या वेळी, सणात होता, तवा लय लोकायन जे चमत्कार तो करत होता, ते पाऊन त्याच्यावर विश्वास केला. 24पण येशूनं विश्वास नाई केला कि त्या लोकायन त्याच्यावर भरोसा केला हाय, कावून कि त्याले माणसाचा स्वभाव माईत होता. 25अन् त्याले कोणाची पण गरज नव्हती जे त्याले लोकायच्या बाऱ्यात सांगणार कावून कि त्याले माईत होतं कि त्या लोकायच्या मनात काय हाय?

ప్రస్తుతం ఎంపిక చేయబడింది:

युहन्ना 2: VAHNT

హైలైట్

షేర్ చేయి

కాపీ

None

మీ పరికరాలన్నింటి వ్యాప్తంగా మీ హైలైట్స్ సేవ్ చేయబడాలనుకుంటున్నారా? సైన్ అప్ చేయండి లేదా సైన్ ఇన్ చేయండి