Biểu trưng YouVersion
Biểu tượng Tìm kiếm

मत्तय 3

3
बाप्तिस्मा करनारा योहानना संदेश
(मार्क १:१-८; लूक ३:१-१८; योहान १:१९-२८)
1त्या दिनमा बाप्तिस्मा करनारा योहान हाऊ, यहूदीयाना जंगलमा ईसन अशी घोषणा देवाले लागना की, 2#मत्तय ४:१७; मार्क १:१५“पापसपाईन फिरा कारण स्वर्गनं राज्य जोडे येल शे!” 3त्यानाबद्दल यशया संदेष्टानी सांगेल व्हतं की, “जंगलमा घोषणा करनारानी वाणी व्हयनी की, परमेश्वरनी येवानी वाट तयार करा, अनी परमेश्वर जी वाट वरतीन जावाव शे, ती वाट नीट करा.”#यशया ४०:३ 4योहानना कपडा ह्या उंटसना केससपाईन बनाडेल व्हतात. त्याना कंबरले कातडाना पट्टा व्हता, त्यानं जेवण रानमध अनं टोळ व्हतं#२ राजे १:८. 5तवय त्याना संदेश ऐकाकरता यरूशलेम, सर्वा यहूदीयाना प्रदेश अनी यार्देन नदी, त्याना जवळपासना सर्व प्रदेशना सर्वा लोके त्यानाजोडे वनात. 6त्या लोकसनी पाप कबुल करं, म्हणजे तो त्यासले यार्देन नदीमा बाप्तिस्मा दे. 7#मत्तय १२:३४; २३:३३पण परूशी अनी सदुकी पंथना लोकसपैकी बराच जणसले आपलाकडे बाप्तिस्मा लेवाकरता येतांना दखीन, त्यानी त्यासले सांगं, “अरे सापसना पिल्लासवन!” देवना येनारा क्रोधपाईन पळी जावाले तुमले कोणी सावध करं. 8बाप्तिस्मा लेवाना पहिले पापसपाईन फिरा शोभी असा सत्कर्म करा, 9#योहान ८:३३अनं अब्राहाम आमना बाप शे, अस मनमा आणु नका; कारण मी तुमले सांगस की, देव अब्राहाम करता दगडसपाईन संतती उत्पन्न कराले समर्थ शे! 10#मत्तय ७:१९आत्तेच झाडना मुळजोडे कुऱ्हाड ठेयेल शे, जे जे झाड चांगलं फळ देस नही, ते ते झाड तोडीसन अग्नीमा टाकामा येस. 11मी पाणीघाई तुमना बाप्तिस्मा पापसपाईन फिराकरता करस हाई खरं शे; पण जो मना मांगतीन ई ऱ्हायना तो मनापेक्षा इतला समर्थ शे की, मी त्याना जोडा उचलीन चालानी पण मनी लायकी नही शे, तो पवित्र आत्माघाई अनी अग्नीघाई तुमना बाप्तिस्मा कराव शे. 12त्याना हातमा त्यानं सुपडं शे, तो त्यानं खळं पुर्ण स्वच्छ करी, अनी आपला कोठारमा गहु गोया करीसन ठेई. पण जो भुस्सा राही त्याले नही वलावनारी अग्नीमा जाळी टाकी.
येशुना बाप्तिस्मा
(मार्क १:९-११; लूक ३:२१-२२)
13तवय येशु योहान कडतीन बाप्तिस्मा करी लेवाकरता गालील प्रदेशमा यार्देन नदीवर त्यानाकडे वना; 14पण योहान त्याले मना करीसन बोलना, मी तुमना हाततीन बाप्तिस्मा लेवाले पाहिजे, पण तुम्हीन मनाकडे कशा काय ई राहीनात? 15तवय येशु त्याले बोलना, आते हाई व्हऊ दे; कारण सर्व रिती प्रमाणे धार्मीक काम पुर्ण करनं हाई आपलाकरता चांगलं शे, तवय योहाननी तस व्हवु दिधं. 16मंग बाप्तिस्मा लेवावर येशु पाणीमाईन वर वना. अनी दखा, स्वर्ग उघडनं तवय परमेश्वरना आत्मा कबुतरना रूपमा उतरीन स्वतःवर ई राहिना अस त्याले दखायनं. 17#मत्तय १२:१८; १७:५; मार्क १:११; लूक ९:३५अनी लगेच स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, हाऊ मना पोऱ्या माले परमप्रिय शे. मी त्यानावर संतुष्ट शे.

Tô màu

Chia sẻ

Sao chép

None

Bạn muốn lưu những tô màu trên tất cả các thiết bị của mình? Đăng ký hoặc đăng nhập