युहन्ना 6
6
पाच हजार लोकायले जेवू घालणे
(मत्तय 14:13-21; मार्क 6:30-44; लूका 9:10-17)
1ह्या गोष्टी नंतर येशू गालील समुद्राच्या तिकडल्या बाजुले गेला, ज्याले तीबिरीयास समुद्राच्या नावान पण ओयखल्या जाते. 2अन् एक मोठी गर्दी त्याच्या मांग आली, कावून कि जे चमत्कार तो बिमार लोकायवर करत होता ते पायासाठी. 3तवा येशू पहाडावर चढून आपल्या शिष्याय संग तती बसला. 4अन् यहुदी लोकायचा फसह सण जवळ आला होता. 5अन् जवा येशूनं आपले डोये वर करून एका मोठी गर्दी आपल्यापासी येतांना पायलं, तवा फिलिप्पुसले त्यानं म्हतलं, “आपण ह्या लोकायच्या जेवणासाठी कुठून भाकरी विकत आणायच्या?” 6पण त्यानं हे गोष्ट त्याले परखण्यासाठी केली होती; कावून कि त्याले स्वताले मालूम होतं कि तो काय करणार. 7फिलिप्पुसन त्याले उत्तर देलं, कि “दोनशे दिवसाची मजुरी (दोनशे दिनार) च्या बरोबर पैशाच जेवण पण त्यायच्यासाठी पूर नाई होणार, कि हरेकायले थोडं-थोडं जेवण भेटाव.” 8त्याच्यावाल्या शिष्यायतून शिमोन पतरसचा भाऊ आंद्रियासन त्याले म्हतलं, 9“अती एक पोरगा हाय, ज्याच्यापासी पाच जवाच्या भाकरी अन् दोन मासोया हाय, पण येवढ्या मोठ्या लोकायसाठी ते काईच नाई हाय.” 10तवा येशूनं त्याले म्हतलं “लोकायले जेवाले बसवून द्या.” त्या जागी लय गवत होतं. तवा लोकं ज्यायच्यात माणसायची संख्या पाच हजार होती, बसून गेले. 11तवा येशूनं भाकरी घेतल्या अन् देवाले धन्यवाद करून शिष्यायले देल्या अन् शिष्यायनं बसलेल्या लोकायले वाढून देल्या; तसचं मासोया पण जेवड्या पायजे तेवढ्या वाढून देल्या. 12जवा ते लोकं खाऊन तृप्त झाले, तवा येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, “उरलेल्या भाकरी एकत्र करा, कि काई फेकल्या नाई गेल्या पायजे.” 13म्हणून त्यायनं एकत्र केल्या, अन् जवच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे जे खाणाऱ्याकडून उरलेल्या होत्या त्याच्या बारा टोपल्या भरल्या. 14तवा जे चमत्कार त्यानं केलं, ते पाऊन लोकं म्हणाले लागले; “जो भविष्यवक्ता जगात येणारा होता तो खरोखर हाचं हाय.” 15येशू हे समजून कि ते लोकं त्याले राजा बनवासाठी पकडाले पायत हाय, म्हणून तो वापस पहाडावर एकटाचं चालला गेला.
येशूचे पाण्यावर चालणे
(मत्तय 14:22-27; मार्क 6:45-52)
16जवा संध्याकाळ झाली, तवा त्याच्यावाले शिष्य समुद्राच्या काटावर गेले. 17अन् डोंग्यात बसून समुद्राच्या तिकडच्या बाजूने कफरनहूम शहरात जाऊन रायले होते, तवा त्यावाक्ती अंधार पडला होता, अन् येशू अजून हि त्यायच्यापासी आला नव्हता. 18अन् वारावायद्ना मुळे समुद्रात लाटा वर खाली होतं होत्या. 19मंग जवा ते डोंग्याले वल्ही मारत जवळपास तीन चार कोस निघून गेले, (जवळपास पाच ते सहा किलोमीटर) तवा त्यायनं येशूले समुद्रावर चालतांना, अन् डोंग्याच्या जवळ येतांना पायलं, अन् तवा ते भेऊन गेले. 20पण येशूनं त्यायले म्हतलं, “मी हावो; भेऊ नका.” 21तवा ते त्याले डोंग्यावर चढवासाठी तयार झाले, अन् पटकन तो डोंगा त्या जाग्यावर जाऊन पोहचला जती ते जाऊन रायले होते.
लोकायचे येशूला पायने
22दुसऱ्या दिवशी त्या लोकायच्या गर्दीन, जी समुद्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर रायली होती, हे पायलं, कि इथं एक डोंगा सोडून आणखी कोणताही लहान डोंगा नाई होता, त्यायले पण माईत होतं कि येशू आपल्या शिष्याय सोबत त्या डोंग्यावर नाई चढला होता, फक्त त्याचे शिष्यचं गेले होते. 23तरी पण अजून लहान डोंगे तीबिरीयास समुद्राच्या त्या जाग्याच्या जवळ आली, जती त्यायनं प्रभू येशूले धन्यवाद केल्याच्या बाद भाकर खाल्ली होती. 24जवा लोकायच्या गर्दीन पायलं, कि अती येशू नाई हाय, अन् त्याचे शिष्य पण नाई हाय, तवा ते पण लहान-लहान डोंगे घेऊन येशूले पायासाठी कफरनहूम शहरात पोहचले.
येशू जीवनाची भाकर
25अन् समुद्राच्या तिकडल्या बाजूनं त्याले भेटून म्हतलं, “हे गुरुजी, तू अती कधी आला?” 26येशूनं त्यायले उत्तर देलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो, तुमी मले याच्यासाठी नाई पावून रायले कि तुमी कोणता चमत्कार पायला, पण याच्यासाठी कि तुमी भाकरी खाऊन तृप्त झाले होते. 27नाशवान जेवणासाठी मेहनत नका करू, पण त्या जेवणासाठी, जे अनंत जीवनापरेंत थांबून रायते, ज्याले मी, माणसाचा पोरगा तुमाले देईन, कावून कि देवबापान मले असं कऱ्याचा अधिकार देला हाय.” 28त्यायनं येशूले म्हतलं, “देवाची आमच्या पासून काय इच्छा हाय कि ते आमी करावं?” 29येशूनं त्यायले उत्तर देलं, “देवाची हे इच्छा हाय, कि तुमी माह्यावर विश्वास करावं, ज्याले त्यानं पाठवलं हाय.” 30तवा त्यायनं त्याले म्हतलं, “मंग तू कोणते चमत्कार दाखवत हायस कि आमी त्याले पाऊन तुह्यावर विश्वास करू? तू काय करणार हायस? 31आमच्या बापदादायन सुनसान जागी मन्ना खाल्ला; जसं पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, मोशेने त्यायले खायासाठी स्वर्गातून भाकर देली होती.” 32तवा येशूनं त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो कि मोशेनं ते भाकर तुमाले स्वर्गातून नाई देली होती, पण माह्या देवबापानं तुमाले स्वर्गातून खरी भाकर देली. 33कावून कि खरी भाकर जे देव देते तेच हाय, जे स्वर्गातून उतरून जगाले जीवन देते.” 34म्हणून त्यायनं येशूले म्हतलं, “हे गुरुजी, हे भाकर आमाले नेहमी देत जाय.” 35येशूनं त्यायले म्हतलं, “मीच जीवनाची भाकर हाय, भाकर जे अनंत जीवन देते जो माह्यापासी येतो त्याले कधीच भूक लागणार नाई अन् जो माह्यावर विश्वास ठेवतो, त्याले कधीच ताहान लागणार नाई. 36पण मी तुमाले पयलेच म्हतलं होतं, कि जरी तुमी पायलं हाय तरी पण विश्वास नाई करत. 37देवबाप जे काई मले देते ते सगळं माह्यापासी येईन, अन् जो कोणी माह्याल्या पासी येईन त्याचा मी कधीच तिरस्कार करणार नाई. 38कावून कि मी स्वताची इच्छा नाई, पण ज्यानं मले पाठवलं हाय त्याची इच्छा पूर्ण कऱ्याले स्वर्गातून उतरून आलो हाय. 39अन् ज्यानं मले पाठवलं हाय त्याची इच्छा हे हाय कि जे काई त्यानं मले देलं हाय, त्याच्यातून एकाले पण नाश नाई होऊ देईन, पण त्याले शेवटच्या दिवशी वापस जिवंत करीन. 40कावून कि माह्या पाठवण्यावाल्याची इच्छा हे हाय, कि जो कोणी पोराले पाईन, अन् त्याच्यावर विश्वास करीन, तो अनंत जीवन प्राप्त करीन, अन् मी त्याले आखरी दिवशी मेलेल्यातून जिवंत उठवीन.” 41तवा यहुदी लोकं त्याच्यावाल्या विषयात कुरकुर करायले लागले, कावून कि त्यानं म्हतलं होतं, “मी स्वर्गातून उतरली भाकर हाय.” 42अन् त्यायनं म्हतलं, “हा तर योसेफचा पोरगा येशू हाय, ज्याच्या माय-बापाले आमी ओयखतो, तर मंग हा कावून म्हणते कि मी स्वर्गातून उतरलो हाय?” 43तवा येशूनं त्यायले उत्तर देलं, “आपसात कुरकुर करू नका. 44कोणी पण माह्याल्या पासी येऊ शकत नाई, जोपरेंत देवबाप त्याले खेचून नाई घेत; अन् मी त्याले शेवटच्या दिवशी#6:44 शेवटच्या दिवशी शेवटचा दिवस म्हणजे ज्या दिवशी देव लोकायचा न्याय करीन वापस मेलेल्यातून जिवंत करीन. 45भविष्यवक्तायन आपल्या पुस्तकात हे लिवलेल हाय, ते सर्व देवा कडून शिकवलेले अशीन. ज्या कोणी बापापासून आयकलं अन् शिकले हाय, तो माह्याल्या पासी येईन. 46कोणच देवबापाले नाई पायलं, मी एकटा हाय, जो देव बापाकडून आलो हाय, ज्यानं त्याले पायलं हाय. 47मी तुमाले खरं-खरं सांगतो, जो कोणी माह्यावर विश्वास ठेवीन, अनंत जीवन त्याचचं हाय. 48जीवन देणारी भाकर मीच हाय. 49तुमच्या बाप-दादायन सुनसान जागी मन्ना खाल्ला अन् नंतर मरून पण गेले. 50हे ते भाकर हाय जे स्वर्गातून उतरली हाय, कि माणसायन त्याच्यातून खावं अन् ते मरतीन नाई. 51जीवनाची भाकर मीच हाय जे स्वर्गातून उतरलेली हाय, जो कोणी ह्या भाकरीतून खाईन, तो सर्वकाळ जिवंत राईन; अन् ते माह्य शरीर हाय, जे मी जगाच्या लोकायच्या जीवनासाठी समर्पित करीन.” 52ह्या गोष्टीवर यहुदी लोकं हे म्हणून आपसात वाद करू लागले, “हा माणूस कसा आमाले आपला शरीर खायाले देऊ शकते?” 53येशूनं त्यायले म्हतलं, “मी तुमाले खरं-खरं सांगतो जवा परेंत तुमी माह्या, माणसाच्या पोराचा शरीर नाई खासान, अन् त्याचा रक्त नाई पेसान, तर तुमच्यात जीवन नाई. 54जो माह्यावालं शरीर खाते अन् रक्त पेते, अनंत जीवन त्याचचं हाय, अन् मी आखरीच्या दिवशी वापस त्याले मेलेल्यातून जिवंत करीन. 55कावून कि माह्य शरीरच खरोखर जेवण हाय, अन् माह्यावालं रक्तचं खरोखर प्यायची वस्तु हाय. 56जो कोणी माह्यावालं शरीर खाईन अन् माह्य रक्त पिईन, तोच माह्यामधी स्थिर बनून रायते अन् मी त्याच्यात बनून रायतो. 57जिवंत देवबापाच्या शक्तीन मी जिवंत हावो, ज्यानं मले पाठवलं हाय; त्याचं प्रकारे जे लोकं माह्यावालं शरीर खातात, ते माह्यामुळे जिवंत रायतीन. 58हे ते भाकर हाय जे स्वर्गातून उतरलेली हाय, ती त्या भाकरी सारखी नाई हाय जे आमच्या बापदादायन खाल्ली होती अन् ते तर मरून गेले; पण जो कोणी हे भाकर खाईन, तो सर्वकाळ जिवंत राईन.” 59ह्या गोष्टी येशूनं कफरनहूम शहरात एका धार्मिक सभास्थानात उपदेश द्याच्या वाक्ती म्हतलं
अनंत जीवनाचे वचन
60म्हणून त्याच्यावाल्या शिष्याय पैकी लय जनायनं हे आयकून म्हतलं, “हे तर कठीण शिकवण हाय; याचं कोण पाळण करू शकते?” 61येशूनं आपल्या मनात हे समजून कि माह्ये शिष्य ह्या गोष्टीवर कुरकुर करत हाय, त्यायले विचारलं, “काय हे गोष्ट तुमाले माह्यावर विश्वास कऱ्याले थांबवत हाय? 62अन् जर तुमी माणसाच्या पोराले जती तो पयले होता, तती वरती जातान पायसान, तर काय होईन? 63हा तो आत्मा हाय जो तुमाले जीवन देते, माणसाच्या शक्तीन असे नाई होऊ शकत, मी तुमाले ज्या गोष्टी बोललो हाय, जे जीवन देणारा आत्मा म्हणते. 64पण तुमच्यातून कितीक असे हायत जे विश्वास नाई करत,” येशूनं हे यासाठी म्हतलं, कावून कि त्याले पयले पासूनच मालूम होतं, कि जे विश्वास नाई करत, कि ते कोण हायत; अन् कोण त्याले धरून देईन. 65अन् येशूनं म्हतलं, “म्हणून मी तुमाले म्हतलं होतं कि जवा परेंत कोणाले देव बापाकडून हा वरदान नाई भेटन तवा परेंत तो माह्याल्या पासी येऊ शकत नाई.”
पतरसचा विश्वास
66या गोष्टी वरून येशूच्या शिष्याय पैकी बरेचं जन त्याच्यापासून वापस गेले अन् याच्या बाद कधीच त्याचे शिष्य म्हणून त्याच्या संग नाई चालले. 67तवा येशूनं बारा शिष्यायले म्हतलं, “काय तुमची पण वापस जायची इच्छा हाय?” 68तवा शिमोन पतरसन त्याले उत्तर देऊन म्हतलं, कि “प्रभू, आमी कोणाच्या पासी जाणार? अनंत जीवनाच्या गोष्टी तर फक्त तुह्याच पासी हाय. 69अन् आमी विश्वास केला हाय, अन् समजून गेलो हाय, कि तू देवाचा पवित्र माणूस ख्रिस्त हाय.” 70तवा येशूनं त्याले उत्तर देलं, “मी तुमी बारा जनायले निवडलं हाय, तरी पण तुमच्यातला एक माणूस सैतानाच्या नियंत्रणात हाय.” 71हे येशूनं शिमोन पोरगा, यहुदा इस्कोरोतीच्या बाऱ्यात म्हतलं, कावून कि तो त्या बारा शिष्याय पैकी एक होता, जो येशू संग विश्वासघात करणार होता.
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.