लुका 16
16
चलाक खजिनदार
1मंग अजून येशूनं आपल्या शिष्यायले कथा सांगून म्हतलं, “कोण्या एका धनवान माणसाचा एक खजिनदार होता, अन् लोकाईन धनवान माणसाच्या पासी जाऊन, त्याच्या कारभाऱ्यावर हा आरोप लावला, कि हा तुह्यावाली सारी संपत्ती गमावून रायला हाय, 2तवा धनवानानं त्याच्या खजिनदाराले बलाऊन म्हतलं, तुह्यावाल्या बद्दल मी हे काय आयकू रायलो हाय? तू मह्याल्या पैशाच काय केलं हाय? तू आता आपल्या खजिनदार पणाचा हिशोब दे कावून कि तू आता खजिनदार राऊ शकत नाई. 3तवा त्या खजिनदारान आपल्या मनात विचार केलं, कि आता मी काय करू? कावून कि माह्याला घरधनी आता खजिनदार पणाचं काम माह्यापासून हिसकावून घेऊन रायला हाय, मातीचं मेहनती काम मले करता येत नाई, अन् भीख मांग्याची मले लाज वाटते. 4आता मले सुचलं कि काय करावं, जवा मी खजिनदार पणाच्या कामावरून काढला जाईन, तवा लोकायन माह्यी मदत कराले पायजे. 5तवा त्यानं आपल्या मालकाच्या कर्ज दरापैकी एकाएकाले बलावून, पयल्याले विचारलं कि तुह्याल्या इकडे माह्या मालकाचं किती कर्ज हाय? 6त्यानं म्हतलं, शंभर मन जैतूनचं तेल (जवळपास तीन हजार सातशे लिटर) तवा मालकान त्याले म्हतलं, तुह्याली खातावही घे अन् बसून लवकर पन्नास मन (जवळपास एक हजार आठशे पन्नास लिटर) लिवून टाक. 7मंग अजून त्यानं दुसऱ्याले विचारलं, तुह्यावर किती कर्ज हाय? त्यानं म्हतलं, शंभर मन (जवळपास विस हजार किलो) गहू, तवा त्यानं त्याले म्हतलं, तुह्याली खातावही घेऊन अस्सी मन (जवळपास सोडा हजार किलो) लिवून टाक.” 8हे पाऊन “मालकान त्या अधर्मी कारभाऱ्याची प्रशंसा केली, कावून कि त्यानं हुशारकीनं काम केलं हाय, ह्याच सारखं ह्या संसाराचे लोकं आपल्या काळाच्या रिती-व्यहारात प्रकाशाच्या लोकाय पेक्षा जास्त हुशार हायेत. 9आणखी मी तुमाले सांगतो, जगातल्या धनानं आपल्यासाठी मित्र बनवा, यासाठी कि ते संपल्यावर ते नेहमीच्या अनंत मंडपात तुमचं स्वागत करावं. 10जो थोड्यातल्या थोड्या गोष्टीत इमानदार हाय, तो बऱ्याचं गोष्टीत इमानदार हाय, अन् जो थोड्यातल्या थोड्या गोष्टीत बईमान हाय, तो बऱ्याचं गोष्टीत बईमान हाय. 11म्हणून तुमी जर जगाच्या धनात इमानदार नसाल, तवा तुमाले खरं धन कोण सोपवून देईन. 12अन् जर तुमी दुसऱ्याच्या धनात इमानदार नाई ठरले, तवा जे तुमचं हाय, ते तुमाले कोण देईन?
13कोणताही दास एका वाक्ती दोन मालकाची सेवा करू शकत नाई, कावून कि तो एका संग वैर अन् दुसऱ्या संग प्रेम करीन; अन् एका संग मिळून राईन अन् दुसऱ्याले तुच्छ समजीन: तुमी एका वेळी देव अन् धन दोघाची सेवा करू शकत नाई.”
देवाच्या राज्याची किंमत
(मत्तय 11:12-13)
14अन् परुशी लोकं जे धनाचे लोभी होते, ते ह्या सऱ्या गोष्टी आयकून त्याची थट्टा करत होते. 15तवा येशूनं त्यायले म्हतलं, “तुमी माणसायच्या समोर स्वताले धर्मी दाखवता, पण देवबाप तुमचे मन ओयखते, कावून कि जे गोष्टी माणसाच्या नजरीत महान हाय, त्या देवाच्या नजरीत खूप बेकार हायत.”
16“जवा परेंत योहान बाप्तिस्मा देणारा आला तवा परेंत मोशेचे नियमशास्त्र अन् भविष्यवक्त्याचे संदेश तुमच्या मार्गदर्शनासाठी होते पण आता देवाच्या राज्याची सुवार्था सांगतली जाते, अन् हरेक जन अंदर जायले उत्सुक हाय. 17अभाय अन् पृथ्वीचं लोप होऊन जाणं, मोशेच्या नियमशास्त्राच्या एका बिन्दूच्या मिटून जाण्या पेक्षा सोपे हाय. 18अन् जो कोणी आपल्या बायकोले सोडून दुसरं संग लग्न करते, तो व्यभिचार करते, अन् जो कोणी नवऱ्यानं टाकून देलेल्या बाई संग लग्न करते, तो पण व्यभिचार करते.”
धनवान माणूस अन् गरीब लाजर
19अजून एक कथा अशी हाय कि “एक धनवान माणूस होता, जो जांभळ्या रंगाचे मलमलीचे महाग कपडे घालत होता, अन् हरएक दिवशी सुखानं आनंदाने अन् धुम-धामानं रायत होता. 20-21लाजर नावाचा एक कंगाल गरीब माणूस, होता ज्याले धनवान माणसाच्या फाटकापासी ठेवून देत होते. त्याची अशी इच्छा होती, कि धनवानाच्या भाकरीचे जे तुकडे खाली पडीन, त्यानं आपलं पोट भरावं, अन् त्याचं शरीर फोडायन भरलेलं होतं, अन् कुत्रे पण येऊन त्याचे फोडं चाटत होते. 22अन् असं झालं कि तो गरीब माणूस मरून गेला, तवा देवदूत त्याले घेऊन अब्राहामापासी राहाले नेऊन ठेवलं, अन् मंग तो धनवान पण मेला अन् त्याले रोऊन टाकलं, 23अन् नरकात यातना होतं असतांना त्यानं वरते पायलं, अन् दुरून अब्राहामाच्या जवळ लाजराले पायलं, 24तवा त्यानं जोरात हाका मारून म्हतलं, हे बापा अब्राहामा, माह्यावर दया करून लाजराले माह्या जवळ पाठून दे, ह्याच्यासाठी कि त्यानं आपल्या बोटाचे टोक पाण्यात भिजून माह्याल्या जिभिले थंड करावं कावून कि मी ह्या आगीत तडपून रायलो हाय. 25पण अब्राहामाने म्हतलं, हे पोरा आठोन कर जवा तू पृथ्वीवर होता, तू आपल्या जीवनात चांगल्या वस्तुचा आनंद घेतला हाय, अन् तसेच लाजर ले ते काईच भेटलं नाई, पण अती त्याले शांती भेटत हाय, अन् तू तडपून रायला हाय. 26अन् ह्या साऱ्या गोष्टीले सोडून आमच्यात अन् तुमच्या मधात एक मोठी दरी स्थापलेली हाय, कि ज्यायले अतून तुमच्यापासी जायचे हाय ते जाऊ नाई शकले पायजे, अन् कोणी तिकडून इकडे येऊ नाई शकले पायजे. 27मंग त्यानं म्हतलं, हे बापा अब्राहाम मी तुले विनंती करतो, कि तू लाजर ले माह्याल्या बापाच्या घरी पाठव. 28कावून कि माह्याले पाच भाऊ हायत, तो त्यायच्यापासी जाऊन ह्या गोष्टीची साक्ष देईन, असं नाई व्हावं, कि ते पण या यातनेच्या जागी यावं. 29तवा अब्राहामाने त्याले म्हतलं, त्यायच्यापासी तर चेतावणी देण्यासाठी मोशेचे नियमशास्त्र अन् भविष्यवक्त्याचे पुस्तक हायत, त्यायनं तीतूनच आयकावे अन् त्याले मान्याले पायजे. 30त्यानं म्हतलं, नाई, हे बापा अब्राहामा पण जर मेलेल्यातून कोणी त्यायच्यापासी जाऊन त्यायले चेतावणी देईन तर ते पश्चात्ताप करतीन. 31अब्राहामाने त्याले म्हतलं, जर ते मोशेच्या नियमशास्त्रातल्या अन् भविष्यवक्त्याच्या आज्ञा नाई आयकतं, तवा जर मेलेल्यातून कोणी जिवंत होऊन त्यायच्या जवळ जाईन तरी ते त्याचं मानतीन नाई.”
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.