लुका 21:10-11

लुका 21:10-11 VAHNT

मंग त्यानं त्यायले म्हतलं, “तवा एका जातीचे लोकं अन्यजातीच्या लोकायवर हमला करतीन, अन् एका देशाचे लोकं दुसऱ्या देशाच्या लोकायच्या विरुध्य लढाई करतीन, अन् कुठीसा पण मोठे-मोठे भूपंक होईन, अन् जागो-जागी अकाल अन् महामाऱ्या पडतीन, अन् अभायातून भयंकर उत्पात व मोठं-मोठे चिन्ह प्रगट होतीन.