लुका 21:9-11

लुका 21:9-11 VAHNT

अन् जवा तुमी लढाया अन् विद्रोहाच्या विषयी आयकसान, तवा तुमी भेऊ नका, कावून कि हे होणे पक्के हाय, पण हा जगाचा अंत नाई हाय.” मंग त्यानं त्यायले म्हतलं, “तवा एका जातीचे लोकं अन्यजातीच्या लोकायवर हमला करतीन, अन् एका देशाचे लोकं दुसऱ्या देशाच्या लोकायच्या विरुध्य लढाई करतीन, अन् कुठीसा पण मोठे-मोठे भूपंक होईन, अन् जागो-जागी अकाल अन् महामाऱ्या पडतीन, अन् अभायातून भयंकर उत्पात व मोठं-मोठे चिन्ह प्रगट होतीन.