1
लूक 16:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे.
አወዳድር
{{ጥቅስ}} ያስሱ
2
लूक 16:13
कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही; कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्यावर प्रीती करील; अथवा एकाला धरून राहील व दुसर्याला तुच्छ मानील. तुम्हांला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.”
3
लूक 16:11-12
म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाहीत तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? आणि जे दुसर्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाहीत तर जे आपले आहे ते तुम्हांला कोण देईल?
4
लूक 16:31
तेव्हा त्याने त्याला म्हटले, ‘ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.”’
5
लूक 16:18
जो कोणी आपली बायको टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो; आणि नवर्याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करतो तो व्यभिचार करतो.
ቤት
መጽሐፍ ቅዱስ
እቅዶች
ቪዲዮዎች