एनासाठे मी स्वता ले ह्या योग्य बी नई समजना, कि तुना जोळे येवू, पण फक्त तोंड कण सांगी दे त मना दास बरा हुई जाईन. मी बी अधिकारी माणुस शे, आणि शिपाई मना हात मा शे, आणि जव एक ले सांगस, जा, त तो जास, आणि दुसराले सांगस, कि ये, त येस, आणि आपला दुसरा दास ले कि हई कर, त तो तेले करस. हई आयकीसन येशु ले आश्चर्य वाटण, आणि तेनी तोंड फिराईसन त्या गर्दी ले जी तेना मांगे ईऱ्हायंती सांग, “मी तुमले खरज सांगस, कि मले पुरा इस्त्राएल देश मा एक बी असा माणुस नई भेटणा, जो ह्या दुसरा जाती ना माणुस सारखा मनावर विश्वास करस.”