येशूनं त्याले उत्तर देलं, कि “सर्व्या आज्ञातून मुख्य आज्ञा हे हाय, कि हे इस्राएल देशाच्या लोकायनो आयका, प्रभू आमचा देव एकच देव हाय. तू आपल्या प्रभू व देवबाप याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, अन् पूर्ण शक्तीन प्रेम कर. दुसरी हि कि जसं आपल्या स्वतावर प्रेम करतो, तसचं तू आपल्या शेजाऱ्यावर पण प्रेम कर, याच्याऊन मोठी दुसरी कोणतीच आज्ञा नाई.”