म्हणून येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं, जागी राहा कारण कि घरधनी कधी येईन, संध्याकाळी, नाई तर अर्ध्याराती, नाई तन कोंबड्याच्या बाग देयाच्या वाक्ती, नाई तर सकाळी येईन. असं नाई झालं पायजे कि तो अचानक येऊन तुमाले झोपीत असतांना पाहावं. अन् जे मी तुमाले सांगतो, तेच सर्व्यायले सांगतो, कि मी येणार हाय म्हणून तयार राहा.”