अन् मंग त्यानं अंगुराच्या रसाचा गिलास घेऊन देवाचा धन्यवाद केला, अन् शिष्यायले देला तवा सगळेचं त्या गिलासातून पेले.
मंग येशूनं त्यायले म्हतलं कि, “हे माह्या नवीन कराराच रक्त हाय, ज्याच्या व्दारे देव आपल्या लोकायसोबत करार करीन अन् हे लय झनासाठी वाहल जाईन, जवा मी लय लोकाच्या फायद्यासाठी बलिदान होईन.