YouVersion Logo
Search Icon

मरकुस 14

14
येशूले पकळ्याची योजना
(मत्तय 26:1-5; लूका 22:1-2; योहान 11:45-53)
1दोन दिवस झाल्यावर यहुदी लोकायचा फसह सण व बेखमीर भाकरीचा वल्हाडनाचा सण होऊन रायला होता, अन् मुख्ययाजक व मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक या गोष्टीतच होते, कि येशूचा कसं विरोध करू, अन् पकडून मारून टाकू. 2मंग असे म्हणत कि “सणाच्या दिवशी नाई, असे नाई व्हावं की लोकाईन तांडव करावं.”
बैतनीयात येशूच्या पायावर शुद्ध ईत्र
(मत्तय 26:6-13; योहान 12:1-8)
3मंग येशू बेथानी गावात शिमोन पयले कुष्ठरोगी होता, त्याच्या घरी जेवण कऱ्याले बसला होता, तवा एक बाई संगमरमरच्या शिशीत एक जटामासीच्या फुलांपासून बनवलेलं लय किंमतीवान तेल घेऊन आली, अन् सिसीचं झाकण उघळून तेल त्याच्या डोक्शावर टाकले. 4पण काही लोकं आपल्या मनात, चिडून म्हणू लागले, कि तिने “या अती बहुमुल्य ईत्र तेलाले खराब केलं? 5कावून कि ह्या तेलाची किंमत तीनशे दिनार (जवळपास तीनशे चांदीचे सिक्के) हून अधिक होती, त्याले इकून ते पैसे गरीबायले वाटता आले असते” अशी ते तिच्या विरुध्य रागवले.
6येशूनं त्यायले म्हतलं कि “तिले दाटू नका, तुमी तिले कायले तरास देऊन रायले? तिनं तर माह्या संग भलं केलं हाय. 7गरीब लोकं तुमच्या संग नेहमीच रायतात, अन् तुमाले जवा वाटलं तवा तुमी त्यायची भलाई करू शकता, पण मी तुमच्या संग नेहमी राईन नाई. 8अन् जे काई ती करू शकते, ते तिनं केलं, तिने मले मरण्याच्या पयले माह्या आंगावर तेल लावल. 9मी तुमाले खरं सांगतो, कि साऱ्या जगात जती कुठी देवाच्या सुवार्थेचा प्रचार केल्या जाईन, तती तिच्या ह्या कामाची चर्चा पण तिच्या आठवणीत केल्या जाईन.”
यहुदाचा विश्वासघात
(मत्तय 26:14-16; लूका 22:3-6)
10तवा यहुदा इस्कोरोती जो बारा शिष्याइतून एक होता, ज्याने मुख्ययाजकापासी जाऊन म्हतलं, कि तो येशूला त्यायच्या हाती कसे पकळ्यायले पायजे याकरिता 11अन् हे आयकून ते खुश झाले, अन् त्याले पैसे दियाले तयार झाले, अन् ते मौका पावून रायले होते कि त्याले कसं पकडून देऊ.
शिष्याय संग आखरी जेवण
(मत्तय 26:17-25; लूका 22:7-14,21-23; योहान 13:21-30)
12फसहच्या सणाच्या पयल्या दिवशी ते फसहचा कोकरू बलिदान करत जात, येशूच्या शिष्यायनं त्याले म्हतलं कि “तुह्य म्हणनं काय हाय, कि आमी कुठं जाऊन तुह्यासाठी फसह सणाच जेवण तयार करू?” 13तवा येशूनं त्याच्या शिष्यायतून दोघायले असं म्हणून पाठवलं, कि “यरुशलेम नगरात जा अन् एक माणूस तुमाले पाण्याचा माठ घेऊन जातांना भेटीन त्याच्या मांग-मांग चालले जाजा. 14अन् तो ज्याच्या घरी जाईन त्या घरच्या मालकाले म्हणजा, कि गुरुजी म्हणतात कि माह्यी बैटक खोली ज्याच्यात मी माह्या शिष्याई संग बेखमीर फसह सणाच जेवण खाऊ ते कुठं हाय?
15अन् तो तुमाले स्वता सजवलेली अन् तयार केलेली एक मोठी माळी दाखविन तती आपल्यासाठी फसहचा जेवण तयार करा.” 16अन् शिष्य निघून नगरात आले, अन् जसं येशूनं त्यायले सांगतल होतं, तसचं पायलं, अन् बेखमीर फसह सणाच जेवण तयार केलं. 17अन् संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या बारा शिष्याई संग आला.
18मंग जवा येशू अन् शिष्य बसून जेवण करून रायले होते, तवा येशूनं त्यायले म्हतलं कि “मी तुमाले खरं सांगतो, कि तुमच्याईतून एक जो माह्या संग जेवून रायला हाय, तो माह्या वैऱ्याची मदत करणार मले पकडून देण्यासाठी. 19अन् त्यायच्यावर ते नाराज झाले, अन् एक-एक जन त्याले विचारायले लागले कि मी हाय का तो हाय?” 20अन् येशूनं त्यायले म्हतलं कि “तो तुमच्या बाराझनातून एक हाय, जो माह्या संग ताटात हात टाकून रायला. 21मी, माणसाचा पोरगा जसं त्याच्या बाऱ्यात लिवलेल हाय कि, तो मरणारच, पण त्या माणसाले भारी सजा भेटन कि त्याच्यापासून माणसाचा पोरगा पकडल्या जातो त्या माणसाचा जन्म नसता झाला ते त्याच्यासाठी चांगलं असतं”
प्रभू भोज
(मत्तय 26:26-30; लूका 22:14-20; 1 करिं 11:23-25)
22जवा येशू अन् त्याचे शिष्य जेवून रायले होते, तवा येशूनं भाकर घेतली, अन् देवाले धन्यवाद देवून तोडली अन् शिष्यायले देली अन् म्हतलं कि “घ्या अन् खा, हे माह्यावालं शरीर हाय.” 23अन् मंग त्यानं अंगुराच्या रसाचा गिलास घेऊन देवाचा धन्यवाद केला, अन् शिष्यायले देला तवा सगळेचं त्या गिलासातून पेले.
24मंग येशूनं त्यायले म्हतलं कि, “हे माह्या नवीन कराराच रक्त हाय, ज्याच्या व्दारे देव आपल्या लोकायसोबत करार करीन अन् हे लय झनासाठी वाहल जाईन, जवा मी लय लोकाच्या फायद्यासाठी बलिदान होईन. 25मी तुमाले खरं सांगतो, कि अंगुराचा रस त्या दिवसापरेंत मंग परत कधी पेईन नाई, जतपरेंत देवाच्या राज्यात नवीन नाई पेईन.” 26मंग येशू अन् त्याचे शिष्य वल्हाडन सणाचे भजन गायन करत बायर जैतून पहाडावर गेले.
पतरसच्या नकाराची भविष्यवाणी
(मत्तय 26:31-35; लूका 22:31-34; योहान 13:36-38)
27जवा ते लोकं पहाडा जवडून चालत असतांना तवा येशूनं त्यायले म्हतलं कि, “तुमी सगळे ठोकरा खासान, कावून कि असं पवित्रशास्त्रात लिवलेल हाय, मी त्याले मारीन जो माह्या लोकायले मेंढरं चारणाऱ्या सारखं सांभाळतो, अन् ते मेंढराय सारखे भटकून अलग रस्ताने जातीन. 28पण त्यानंतर मी मरणातून जिवंत झाल्यावर तुमच्या पयले गालील प्रांतात जाईन तती तुमाले भेटीन.”
29पतरसन त्याले म्हतलं कि “सगळे तुले सोडून जातीन अन् पडून जातीन पण मी तुले कधीच सोडणार नाई.” 30येशूनं त्याले म्हतलं, “मी तुले खरं सांगतो, कि आजच्या रात्री कोंबड्यान दोन वेळा बाग द्यायच्या पयले, तू तीन वेळा माह्या नकार करशीन” “अन् असं म्हणसीन कि मी याले ओयखत नाई.” 31पण त्यानं अजून जोर देऊन म्हतलं कि, “जर मले तुह्या संग मरावे लागलं तरी मी तुह्या नकार कधीच करीन नाई” असचं त्या सगळ्याईन म्हतलं.
गतसमनेत प्रार्थना
(मत्तय 26:36-46; लूका 22:39-46)
32मंग येशू अन् त्याचे शिष्य गतसमनी नावाच्या जागी आले, अन् येशूनं आपल्या शिष्यायले म्हतलं कि “जतपरेंत मी प्रार्थना करीन तोपरेंत तुमी अती बसलेले राहा.” 33अन् येशू पतरस, याकोब व योहानले आपल्या संग घेऊन गेला, अन् तो लय दुखी अन् व्याकूळ होऊन रायला होता. 34अन् येशूनं म्हतलं “माह्य मन लय उदास झालं हाय, अतपर्यंत मले वाटते कि मी मरणार हावो, तुमी अती थांबा, अन् जागे राहा.” 35अन् येशू उलचाक पुढे गेला, अन् जमिनीवर पडून प्रार्थना करून रायला होता कि, जर होईन हे दुःखाची वेळ माह्याहून टळून जावो. 36अन् म्हतलं कि “हे पिता हे बापा, तू सगळं काई करू शकतो, हे दुख माह्यापासून दूर कर, तरी जसा मी म्हणतो तसं नाई, पण जशी तुह्याली इच्छा अशीन तसचं कर.”
37अन् मंग जवा येशू वापस आला अन् शिष्यायले झोपलेलं पायलं, तवा पतरसले म्हतलं कि “हे शिमोन, तू झोपून रायला काय? एक घंटा पण तू जागी राहू नाई शकला? 38जागे राहा अन् प्रार्थना करत राहा कि तुमी परीक्षात पडून पाप नाई करावं, आत्मा तर तयार हाय, पण शरीर अशक्त हाय.” 39अन् मंग येशू वापस गेला, अन् तेच गोष्ट उच्चारून प्रार्थना केली, 40मंग येशू परत वापस येऊन त्यायले झोपलेलं पायलं, कारण कि त्यायचे डोये झोपीच्या गुंगीत भरलेले होते, अन् तवा त्यायले समजत नवतं कि त्याले काय उत्तर द्यावं 41अन् येशूनं वापस तीनदा येऊन त्यायले म्हतलं, “आता झोपून राहा अन् आराम करा, पुरे झालं, वेळ जवळ आला हाय, पाहा माणसाचा पोरगा पापी माणसाच्या हाती धरून देल्या जाईन. 42उठा, चला! पाहा, मले पकळणाऱ्याले मदत करणारा जवळ येऊन रायला हाय.”
येशूले धोक्यान पकडनं
(मत्तय 26:47-56; लूका 22:47-53; योहान 18:3-12)
43जवा येशू असा म्हणूनच रायला होता, कि यहुदा इस्कोरोती जो बारा शिष्यायतून होता, अन् त्याच्या संग मुख्ययाजक अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक व यहुदी पुढारी लोकं अन् त्यायच्या संग लय लोकं, तलवार अन् काड्या घेऊन तती आले. 44अन् यहुदा इस्करोतीन त्यायले हे सांगतल होतं कि ज्याचा मी मुका घेईन तोच येशू हाय त्याले पकडून व सांभाळून घेऊन जाजा. 45अन् तो आला अन् लवकरच येशू पासी जाऊन म्हतलं, “हे गुरुजी” अन् यहूदाने येशूचे मुके घेतले, 46तवा शिपायायनं येशूवर हात टाकले अन् त्याले पकडून घेतलं 47पतरस जो येशू पासी उभा होता, त्याच्यातल्या एका जनाने तलवार काढून महायाजकाच्या दासावर चालवली, अन् त्याचा कान कापून टाकला.
48येशूनं त्यायले म्हतलं, कि “काय तुमी डाकू समजून तलवार अन् काळ्या घेऊन मले पकड्याले आले काय? 49मी तर दररोज देवळात तुमच्या संग राऊन उपदेश देत जावो, अन् तवा तुमी मले नाई पकडलं, पण हे याच्यासाठी झालं कि पवित्रशास्त्रातल्या गोष्टी पूर्ण व्हावे.” 50मंग याच्यावर त्याचे सर्व शिष्य त्याले सोडून पयाले 51त्याचं वेळी एक जवान माणूस उघळ्या आंगावर चादर घेऊन त्याच्या मांग गेला, अन् लोकाईन त्याले पकळल 52अन् यो चादर सोडून उघळ्या अंगाचाच पवून गेला.
महासभे समोर येशू
(मत्तय 26:57-68; लूका 22:54,55,63-71; योहान 18:13,14,19-24)
53अन् मंग ते येशूले महायाजकापासी घेऊन गेले, अन् सगळे मुख्ययाजक अन् यहुदी पुढारी अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक त्याच्या घरी जमा झाले. 54पतरस दुरून-दुरून येशूच्या मांग महायाजकाच्या आंगणात अंदर परेंत गेला, अन् देवळातल्या चौकीदाराय संग बसून अंग शेकत बसला. 55मुख्ययाजक अन् साऱ्या न्यायसभेचे पुढारी येशूले मारून टाकासाठी त्याच्या विरोधात साक्षीदार पाऊन रायले होते. पण त्यायले भेटले नाई. 56पण बरेचशे त्याच्या विरोधात खोटी साक्ष देऊन रायले होते, पण त्यायची साक्ष एक सारखी नव्हती. 57तवा लय जनायनं उठून त्याच्या वरते हे खोटी साक्ष देली,
58“कि आमी याले हे म्हणतांना आयकलं कि, मी या लोकायन बनवलेल्या देवळाले पाडून टाकीन, अन् तीन दिवसात मी दुसरं देऊळ बनविण, जे लोकायन बांधलेलं नाई राहीन.” 59याच्यावर त्याईची साक्षी एक सारखी नाई निघाली. 60तवा महायाजकानं सभेच्या मधात उभं राहून येशूले विचारलं कि “तू कोणतचं उत्तर नाई देत? हे लोकं तुह्यावाल्या विरोधात वेगवेगळ्या साक्ष देतात स्वताले वाचव्यासाठी तू काईच बोलत नाई?” 61अन् तवा येशू चूप रायला, अन् काहीच उत्तर देले नाई, महायाजकानं त्याले अजून विचारलं “काय तू त्या परमधन्य देवाचा पोरगा ख्रिस्त हाय?”
62येशूनं म्हतलं, “हो मी हाय. अन् तुमी मले, माणसाचा पोरगा सर्व सामर्थ्यवान देवाच्या उजव्या बाजूनं बसलेलं, अन् अभायातल्या ढगासंग येतांना पायसान.” 63तवा महायाजकानं आपले कपडे फाडून म्हतलं, कि “आता आमाले साक्षीदारायची काई गरज नाई. 64तुमी आयकलं कि हा देवाची निंदा करते, तुमचा काय निर्णय हाय?” कि याले कोणता दंड द्यावा, तवा त्या सगळ्या सभास्थानाच्या पुढाऱ्यायन म्हतलं कि हा मरण दंडाचा योग्य हाय. 65तवा कोणी त्याच्यावर थुकुन अन् कोणी त्याचं तोंड लपऊन अन् त्याले कोम्बे मारून, त्याची मजाक कऱ्यासाठी त्याले म्हणत जात कि तू “भविष्यवाणी कर,” तवा चौकीदारायन त्याले ताब्यात घेऊन थापडा मारल्या.
पतरसचे येशूला नाकारणे
(मत्तय 26:69-75; लूका 22:56-62; योहान 18:15-18,25-27)
66जवा पतरस खाली आंगणात होता, तवा महायाजकाच्या दासी पयकी एक तती आली. 67अन् पतरसले शेकोटीवर अंग शेकतांना पाऊन तीन त्याच्या इकळे टक-टक पायलं, अन् त्याले म्हतलं कि “तू पण येशू जो नासरत नगरातला हाय त्याच्या संग होता.” 68पण पतरसन नकारून म्हतलं कि, “मी त्याले ओयखत नाई, तू काय म्हणत मले मालूम नाई,” मंग तो बायर देवडीवर गेला, तवा कोंबड्यान बाग देला. 69अन् मंग त्या दासीन त्याले पाऊन त्याच्यापासी जे उभे होते, अजून म्हतलं कि, “हा त्याच्यातून एक हाय.”
70तवा पतरसने नकारून म्हतलं कि मी नाई हाय, कि तू काय म्हणतो, हे मले समजत नाई तवा थोळ्या वेळान जे त्याच्यापासी उभे होते, वापस त्याले म्हतलं कि “खरचं तू त्याच्यातून एक हायस, कावून कि तू गालील प्रांताचा माणूस हायस.” 71तवा तो सोताची शपत घेऊन कोसून रायला होता, कि “मी त्या माणसाले ज्याची तुमी गोष्ट करता, मी त्याले ओयखत नाई.” 72तवा लगेचं दुसऱ्यानं डाव कोंबड्याने बाग देला. पतरसले हे गोष्ट जे येशूनं त्याले म्हतली होती, ते आठोन आली, कि “कोंबड्याने दोन वेळा बाग द्यायच्या पयले, तू तीन वेळा माह्या नकार करशीन,” तो या गोष्टीचा विचार करून लय दुखी झाला, अन् मोठमोठयान रडला.

Currently Selected:

मरकुस 14: VAHNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in