YouVersion Logo
Search Icon

ईयोब 22

22
अलीफज ईयोबावर भयंकर दुष्टाईचा दोष लादतो
1मग अलीफज तेमानी म्हणाला,
2“मनुष्याकडून देवाला काही लाभ आहे काय? सुज्ञ पुरुष स्वत:चाच लाभ करून घेतो.
3तू नीतिमान असलास तर तेणेकरून सर्वसमर्थाला काही सुख होते काय? तू सात्त्विकतेने वर्तलास तर त्याला काही लाभ होईल काय?
4तो तुझा भक्तिभाव पाहून तुझा निषेध करतो व तुझ्याशी वाद चालवतो काय?
5तुझी दुष्टाई मोठी आहे; तुझ्या अधर्माला अंत नाही, हे खरे ना?
6तू विनाकारण आपल्या बंधूचे गहाण अडकवून ठेवलेस; उघड्यानागड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतलीस.
7थकल्याभागलेल्यांना तू पाणी दिले नाहीस, भुकेलेल्यांना अन्न घातले नाहीस.
8जबरदस्ताच्या हाती भूमी गेली; प्रतिष्ठित पुरुषानेच तिच्यात वस्ती केली.
9तू विधवांना रिक्त हस्ते लावून दिलेस, पोरक्यांचे हात मोडून टाकलेस;
10म्हणूनच तुला चोहोकडून पाशांनी घेरले आहे; भीतीने तुला अकस्मात घाबरे केले आहे.
11काळोख आणि महापूर तुला व्यापून टाकत आहेत, हे तुला दिसत नाही काय?
12देवाचा निवास उंच गगन आहे ना? अतिशय वरच्या तार्‍यांकडे पाहा, ते किती उंच आहेत!
13तू म्हणतोस, ‘देवाला काय कळते? दाट अंधाराच्या आडून तो कशी न्यायाधीशी चालवील?’
14निबिड मेघ त्याला आच्छादतात म्हणून त्याला दिसत नाही; आकाशमंडळातच त्याचा संचार होतो.
15ज्या मार्गाने दुर्जन गेले त्याच प्राचीन मार्गाने तू जाणार काय?
16ते अकाली उच्छेद पावले, त्यांच्या पायाखालच्या भूमीचे विरघळून पाणी झाले;
17ते देवाला म्हणाले, ‘तू आमच्यापासून दूर हो; सर्वसमर्थ आमचे1 काय करणार?’
18तरी त्याने त्यांची घरे उत्तम पदार्थांनी भरली होती; दुष्टांची मसलत माझ्यापासून दूर असो.
19हे पाहून नीतिमान आनंद पावतात; निर्दोष जन त्यांचा उपहास करून म्हणतात,
20‘खरोखर आमच्या विरोधकांचा उच्छेद झाला आहे. अग्नीने त्यांच्या संपत्तीचा शेष खाऊन टाकला आहे.’
21त्याच्याशी2 सख्य कर आणि शांतीने राहा; अशाने तुझे कल्याण होईल.
22आता त्याच्या तोंडून नियमांचे शिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठव.
23तू सर्वसमर्थाकडे वळलास आपल्या डेर्‍यातून तू अधर्म दूर केलास, तर तुझी पुन्हा उभारणी होईल.
24तू आपले सुवर्ण धुळीत टाक; ओफीरचे सोने ओढ्यातल्या गोट्यांत फेकून दे;
25म्हणजे सर्वसमर्थ तुला सुवर्ण व राशींच्या राशी रुपे असा होईल.
26मग सर्वसमर्थाच्या ठायी तू आनंद पावशील, तू आपले मुख देवासमोर वर करशील.
27तू त्याची प्रार्थना केलीस म्हणजे तो तुझे ऐकेल; आणि तू आपले नवस फेडशील.
28तू संकल्प केला तर तो सिद्धीस जाईल; तुझ्या मार्गावर प्रकाश पडेल;
29त्या मार्गांनी तुला खाली जाण्याचा प्रसंग आला,1 तर तू ‘वर! वर!’ असेच म्हणशील; कारण देव नम्र वृत्तीच्या मनुष्याचा बचाव करील.
30जो निर्दोष नाही त्यालाही तो वाचवतो; तुझ्या हातांच्या निर्मलतेमुळे त्याचा बचाव होईल.”

Currently Selected:

ईयोब 22: MARVBSI

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in