YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 141

141
वाइटापासून राखण्यासाठी प्रार्थना
दाविदाचे स्तोत्र.
1हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्याकडे सत्वर ये; मी तुझा धावा करतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे.
2माझी प्रार्थना तुझ्यासमोर धूपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.
3हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या वाणीचे द्वार सांभाळ.
4अनीती करणार्‍या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस; आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नकोस.
5नीतिमान मला ताडन करो. तो मला बोल लावो, तरी ती दयाच होईल. तरी ते उत्कृष्ट तेल माझे मस्तक नको म्हणणार नाही; कारण दुर्जनांनी दुष्टाई केली तरी मी प्रार्थना करीत राहीन.
6त्यांच्या अधिपतींना कड्यावरून लोटून दिले आहे, आणि ते माझी वचने ऐकतील कारण ती मधुर आहेत.
7जमीन नांगरताना व ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशी आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत.
8तरी हे प्रभू परमेश्वरा, माझे डोळे तुझ्याकडे लागले आहेत; मी तुझ्यावर भरवसा टाकला आहे; माझा जीव जाऊ देऊ नकोस.
9त्यांनी माझ्यासाठी मांडलेल्या पाशापासून आणि दुष्कर्म्यांच्या सापळ्यांपासून मला राख.
10दुर्जन आपल्याच जाळ्यात पडोत; मी तर त्यातून साफ निसटून जाईन.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in