YouVersion Logo
Search Icon

मीखा 5

5
1यरूशलेमेतील लोकहो,
आता युध्दामध्ये एकत्र या.
तुझ्या शहरा भोवती एक भिंत आहे,
पण ते काठीने इस्राएलाच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतील.
2पण हे, बेथलहेम एफ्राथा.
बेथलेहेम येथून उद्धारकर्त्याचे राज्य
जरी तू यहूदातील सर्व कुळांत सर्वात लहान आहेस.
तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलात अधिकारी व्हायला एकजण निघेल.
त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून आहे.
3यास्तव प्रसूतीवेदना पावणारी प्रसवेपर्यंत तो त्यांना सोडून देईल,
आणि मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलाच्या लोकांकडे परत येतील.
4तो उभा राहून परमेश्वराच्या सामर्थ्याने,
परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने,
आपला कळप चारील, आणि ते वस्ती करतील;
कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल.
5आणि तो पुरुष आंम्हास शांती असा होईल.
अश्शूर जेव्हा आमच्या देशात येईल व ते आमच्या राजवाड्यात चालतील,
तेव्हा आम्ही सात मेंढपाळ
आणि आठ मुख्य त्याच्याविरुध्द उभे राहू.
6तो आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर
आणि निम्रोदच्या प्रदेशांमध्ये तलवारीने घात करेल.
जेव्हा ते आमच्या देशात येतील
आणि आमच्या सीमा पायदळी तुडवतील.
तेव्हा हा पुरुष त्याच्यापासून आम्हाला सोडवीन.
7जसे परमेश्वराकडून दहिवर येते,
जशा गवतावर सरी येतात
आणि त्या मनुष्याची वाट पाहत नाही व मनुष्याच्या मुलाची वाट पाहत नाही,
तसे याकोबचे उरलेले लोक पुष्कळ लोकांच्यामध्ये होतील.
8जसा जंगलातील प्राण्यांमधील सिंह येतो,
जसा तरूण सिंह मेंढ्यांच्या कळपांत येतो,
आणि तो मेंढ्यांच्या कळपातून गेला तर
त्यांना तुडवितो व चिरडून टाकतो व त्यांना वाचवायला कोणी नसते,
त्याच प्रकारे याकोबाचे राहीलेले लोक,
पुष्कळ लोकांच्यामध्ये असतील.
9तुझा हात तू शत्रूंवर उंचावलेला होवो
आणि तो त्यांचा नाश करो.
10परमेश्वर असे म्हणतो,
“त्या दिवसात असे होईल की, मी
तुझे घोडे तुझ्यामध्ये नष्ट करीन
आणि तुमचे रथ मोडून टाकीन.
11तुझ्या देशातील गावांचा मी नाश करीन
आणि तुझे सर्व किल्ले पाडून टाकीन.
12तुझ्या हातून मी जादूटोणा नष्ट करीन,
आणि तुमच्यात यापुढे भविष्य सांगणारे नसतील.
13मी तुझ्या कोरीव मूर्तींचा
आणि दगडी स्तंभांचा नाश करीन.
तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही.
14तुझ्यामधून अशेराचे पूजास्तंभ मी उपटून काढीन,
आणि तुझ्या शहरांचा नाश करीन.
15आणि ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही
त्यांचा मी क्रोधाने व कोपाने प्रतिकार करीन.”

Currently Selected:

मीखा 5: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in