YouVersion Logo
Search Icon

1 योहान 1

1
जीवनी शब्दाचा अवतार
1जे प्रारंभीपासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिले आहे, ज्याच्याकडे आम्ही लक्षपूर्वक पाहिले आहे आणि आमच्या हातांनी स्पर्श केला आहे; जीवनाच्या वचनासंबंधी आम्ही ही घोषणा करीत आहोत. 2जे जीवन प्रकट झाले ते आम्ही पाहिले आहे आणि त्याचीच साक्ष देतो आणि तुमच्यासाठी सार्वकालिक जीवनाची घोषणा करतो; जे पित्याजवळ होते आणि आमच्यासाठी ते प्रकट झाले आहे. 3आम्ही जे पाहिले व ऐकले आहे तेच तुम्हाला सांगत आहोत, यासाठी की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर सहभागी व्हावे. आमची सहभागिता पित्याबरोबर आणि त्यांचा पुत्र येशू ख्रिस्ताबरोबर आहे. 4आम्ही हे लिहित आहोत यासाठी की, आमचा आनंद परिपूर्ण असावा.
प्रकाश आणि अंधार, पाप आणि क्षमा
5हा संदेश आम्ही त्यांच्याकडून ऐकला आहे आणि तो तुम्हाला घोषित करतो, परमेश्वर प्रकाश आहेत; त्यांच्यामध्ये अजिबात अंधार नाही. 6जर आम्ही असे म्हणतो की, आमची त्यांच्याबरोबर सहभागिता आहे आणि तरीसुद्धा अंधारात राहतो तर आम्ही खोटे बोलतो आणि खरेपणाने जगत नाही. 7परंतु जसे ते प्रकाशात आहेत, तसे आम्ही प्रकाशामध्ये चाललो, तर आमची एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्यांचा पुत्र येशू यांचे रक्त सर्व#1:7 किंवा प्रत्येक पापापासून आम्हाला शुद्ध करते.
8जर आम्ही पापविरहित आहोत, असे आपण म्हणतो, तर आम्ही स्वतःला फसवितो आणि आमच्यामध्ये सत्य नाही. 9जर आपण आपली पापे त्यांच्याजवळ कबूल करतो, तर ते विश्वसनीय व न्यायी आहेत, म्हणून आपल्या पापांची क्षमा करतील आणि सर्व अनीतीपासून आपल्याला शुद्ध करतील. 10जर आपण म्हणतो की, आपण पाप केले नाही, तर आपण परमेश्वराला लबाड ठरवितो आणि त्यांचे वचन आपल्यामध्ये नाही.

Currently Selected:

1 योहान 1: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in