YouVersion Logo
Search Icon

इब्री 1

1
परमेश्वराचे अंतिम शब्द: त्यांचा पुत्र
1भूतकाळात परमेश्वर वेळोवेळी आणि निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलले. 2पण आता या शेवटच्या दिवसांमध्ये, ते त्यांच्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलले आहे, त्यांनी त्यांना सर्व गोष्टींचे वारस केले आहे, आणि त्यांच्या द्वारेच जग निर्माण केले आहे. 3पुत्र परमेश्वराच्या गौरवाचा प्रतिबिंब आणि त्याचे हुबेहूब प्रतिरूप आहे, ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गात थोर परमेश्वराच्या उजव्या हातास विराजमान झाले. 4अशा रीतीने ते देवदूतांच्या मानाने अतिश्रेष्ठ झाले आणि जे नाव त्यांना बहाल केले ते देवदूतांच्या नावांहून अतिश्रेष्ठ आहे.
पुत्र दूतांपेक्षा सर्वश्रेष्ठ
5कारण परमेश्वराने असे कोणत्या देवदूताला कधी म्हटले,
“तू माझा पुत्र आहेस;
आज मी तुझा पिता झालो आहे”#1:5 स्तोत्र 2:7?
आणि पुन्हा एकदा,
“मी त्याचा पिता होईन,
आणि तो माझा पुत्र होणार”#1:5 2 शमु 7:14; 1 इति 17:13?
6आणि त्याच्या ज्येष्ठ पुत्राला पृथ्वीवर आणतो, आणि म्हणतो,
“परमेश्वराचे सर्व दूत त्याची उपासना करोत.”#1:6 अनु 32:43
7परमेश्वर ते आपल्या दूतांविषयी बोलताना म्हणतात,
“तो त्यांच्या दूतांना वायुसमान,
आणि त्यांच्या सेवकांना अग्निज्वाला असे करतात.”#1:7 स्तोत्र 104:4
8पण आपल्या पुत्राविषयी ते म्हणतात,
“हे परमेश्वरा, तुमचे सिंहासन सदासर्वकाळ टिकेल;
न्याय्यतेचा राजदंड त्यांच्या राज्याचे राजदंड राहील.
9नीतिमत्व तुम्हाला प्रिय व दुष्टाईचा तुम्हाला द्वेष आहे;
म्हणून परमेश्वराने, तुमच्या परमेश्वराने, तुम्हाला इतर सोबत्यांपेक्षा उच्च करून
आनंदरूपी तेलाने अभिषिक्त केले आहे.”#1:9 स्तोत्र 45:6,7
10ते असेही म्हणाले,
“हे प्रभू, प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला,
आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत.
11ती नाहीतशी होऊन शून्यवत होतील, पण तुम्ही निरंतर राहणार;
ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील.
12तुम्ही ती वस्त्राप्रमाणे गुंडाळणार;
आणि वस्त्राप्रमाणे ते बदलतील.
पण तुम्ही बदलणार नाहीस,
आणि तुमची वर्षे संपणार नाहीत.”#1:12 स्तोत्र 102:25-27
13आणि परमेश्वराने कोणत्या आपल्या दूतांविषयी असे म्हटले,
“जोपर्यंत तुझ्या शत्रूंना
पायाखाली ठेवीपर्यंत
तू येथे माझ्या उजव्या हाताला बसून राहा”#1:13 स्तोत्र 110:1?
14कारण ज्यांना तारण मिळणार आहे, त्यांची सेवा करण्यासाठी सर्व देवदूत म्हणजे जासूद म्हणून पाठविलेले आत्मे नाहीत का?

Currently Selected:

इब्री 1: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for इब्री 1