स्तोत्रसंहिता 144
144
स्तोत्र 144
दावीदाचे स्तोत्र.
1याहवेहचे, माझ्या आश्रय खडकाचे स्तवन असो,
ते माझ्या बाहूंना युद्धाचे
व माझ्या बोटांना लढाईचे प्रशिक्षण देतात.
2तेच माझे प्रेमळ परमेश्वर आणि माझा दुर्ग,
सुरक्षितेचा बुरूज आणि माझे मुक्तिदाता आहेत;
तेच माझी ढाल, माझे आश्रयस्थान आहेत,
ते माझ्या प्रजेला माझ्यासमोर नम्र करतात.
3हे याहवेह, मानव तो काय की तुम्ही त्याची काळजी घ्यावी,
नश्वर मानव तो काय की त्याचा तुम्ही विचार करावा?
4कारण मानव केवळ श्वासवत आहे;
सरणार्या सावलीप्रमाणे त्याचे आयुष्य आहे.
5हे याहवेह, स्वर्ग उघडून खाली या;
पर्वतांना स्पर्श करा म्हणजे ते धुमसतील.
6विजांचे लोळ मोकळे सोडा आणि शत्रूंची दाणादाण उडवून द्या;
आपल्या बाणांचा वर्षाव करून त्यांना उधळून टाका.
7स्वर्गातून आपला हात लांब करून
मला मुक्त करा;
जलप्रवाहाच्या तडाख्यापासून मला सोडवा,
आणि परक्यांच्या सामर्थ्यापासून मला मुक्त करा.
8त्यांचे मुख असत्य वचनांनी भरलेले असते;
त्यांचे उजवे हात कुकर्म करणारे आहेत.
9हे परमेश्वरा, मी तुमच्यासाठी एक नवे गीत गाईन;
दशतंत्री वीणेवर मी तुमच्या स्तवनाचे संगीत बनवेन.
10राजांना विजय तुमच्यामुळेच प्राप्त होतो,
आणि तुमचा सेवक दावीदाला सुरक्षा प्रदान करणारे तुम्हीच आहात.
घातकी तलवारीपासून 11मला सोडवा;
ज्यांची मुखे लबाड्यांनी भरलेली आहेत,
ज्यांचे उजवे हात फसविणारे आहेत.
त्या परक्यांच्या हातून मला सोडवा.
12मग आमचे पुत्र, तारुण्यात जोपासलेल्या
परिपक्व रोपांसारखे होतील;
आमच्या कन्या, राजमहालाच्या सजावटीसाठी केलेल्या
कोरीव स्तंभासारख्या होतील.
13आमची अन्नभांडारे
सर्वप्रकारच्या वस्तूंनी भरलेली असतील,
आमच्या कुरणात आमची मेंढरे सहस्त्रपट,
दशसहस्त्रपट वाढतील.
14आमची सशक्त गुरे अवजड वाहने वाहतील.
आमच्या तटबंदीला भगदाडे पडणार नाहीत,#144:14 किंवा त्यांचे प्रजनन विफल होणार नाही.
आम्ही पारतंत्र्यात जाणार नाही,
आमच्या रस्त्यावर दुःखाच्या आरोळ्या ऐकू येणार नाहीत.
15ज्या लोकांना असे आशीर्वाद लाभतात ते सुखी होत;
ज्या लोकांचा परमेश्वर याहवेह आहे, ते लोक धन्य आहेत.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 144: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.