YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 16

16
स्तोत्र 16
दावीदाचे मिक्ताम
1परमेश्वरा, माझे रक्षण करा,
कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे.
2मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात;
तुमच्याशिवाय दुसरे चांगले असे काहीच माझ्याकडे नाही.”
3पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत,
“ते आदरणीय आहेत, त्यांच्याठायी मी प्रसन्न आहे.”
4जे अन्य दैवतांच्या भजनी लागतात, ते अनेक दुःखांनी ग्रासले जातील.
अशा दैवतांना मी रक्तमय पेयार्पणे अर्पिणार नाही
किंवा त्यांची नावेही मी माझ्या ओठांनी उच्चारणार नाही.
5याहवेह तुम्हीच माझे वतन, माझा प्याला आहात;
तुम्हीच माझा वाटा सुरक्षित करता.
6माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत;
माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे.
7मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे;
रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते.
8मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे;
ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.
9यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे;
माझे शरीर देखील सुरक्षिततेत विसावा घेईल.
10कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही;
किंवा तुमच्या विश्वासणार्‍याला#16:10 किंवा पवित्राला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही.
11तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल;
तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल,
तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for स्तोत्रसंहिता 16