YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 28

28
स्तोत्र 28
दावीदाचे स्तोत्र.
1याहवेह, मी तुम्हाला हाक मारत आहे;
तुम्ही माझे आश्रयदुर्ग आहात.
माझ्यासाठी आपले कान बंद करू नका;
जर तुम्ही उत्तर दिले नाही,
तर मी खड्ड्यात पडलेल्या लोकांसारखा होईन.
2मी पवित्रस्थानाकडे
माझे हात उंच करतो;
साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारतो;
माझी दयेची आरोळी ऐका.
3दुष्टांना दिलेल्या शिक्षेमध्ये मला ओढू नका,
जे अन्याय करतात,
शेजार्‍यांशी त्यांचे संभाषण अतिशय सलोख्याचे आहे,
परंतु त्यांच्या हृदयात केवळ कपट असते.
4जे शासन त्यासाठी उचित आहे,
ते त्यांना पुरेपूर करा;
त्यांच्या दुष्टाईच्या मानाने त्यांना यथायोग्य शासन करा;
त्यांच्या सर्व दुष्ट कृत्यांबद्दल त्यांना योग्य परतफेड करा.
5कारण याहवेहच्या महान कृत्यांचे
व त्यांच्या हातांनी केलेल्या कार्याचे त्यांच्या दृष्टीने काही महत्त्व नाही.
याहवेहच त्यांचा नाश करतील.
मग ते पुन्हा कधीही पुन्हा उभे राहू शकणार नाही.
6याहवेहची स्तुती करा,
कारण त्यांनी माझी दयेची आरोळी ऐकली आहे.
7याहवेह माझे सामर्थ्य आणि माझी ढाल आहेत;
माझे हृदय त्यांच्यावर भरवसा ठेवते, तेच माझे साहाय्य करतात.
माझे अंतःकरण आनंदाने उड्या मारत आहे,
माझ्या गीताद्वारे मी त्यांचे स्तवन करेन.
8याहवेह आपल्या प्रजेचे बल आहेत,
आपल्या अभिषिक्ताच्या तारणाचे आश्रयदुर्ग आहेत.
9तुम्ही आपल्या लोकांचे रक्षण करा आणि आपल्या वतनास आशीर्वाद द्या;
त्यांचे मेंढपाळ होऊन त्यांना सदासर्वकाळ उचलून धरा.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in