YouVersion Logo
Search Icon

मरकुस 2

2
येशू लकव्याच्या रोग्याला बरं करते
(मत्तय 9:1-8; लूका 15:17-26)
1काई दिवसानं येशू वापस कफरनहूम शहरात आला, तवा लोकायले मालूम झालं की तो घरी आला हाय. 2मंग एवढे लोकं जमा झाले कि घरात बसायले पण त्यायले जागा नव्हती, म्हणून लोकं आंगणात बसलेले होते, तवा येशू त्यायले देवाच वचन सांगून रायला होता. 3तवा काई लोकायन त्याच्यापासी एका लकव्याच्या माणसाले बाजीवर घेऊन आले, तवा त्याले चार माणसांनी उचलून येशू पासी नेले.
4पण गर्दीच्यानं ते येशू पासी जाऊ शकले नाई, म्हणून त्यायनं तो जती उभा होता ततीच घरावरचे कवलं काढून, अन् ज्या बाजीवर तो लकव्याचा रोगी झोपला होता, त्याले ततून खाली उतरवले 5अन् येशूनं त्या चार लोकायचा विश्वास पावून त्या लकव्याच्या माणसाले म्हतलं कि “पोरा, मी तुह्या पापाले क्षमा करतो.” 6तवा बरेचसे मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकं त्या घरी बसले होते, अन् जे येशूनं म्हतलं त्याच्या बऱ्यात आपआपल्या मनात विचार करून रायले होते.
7“हा माणूस असा कावून बोलते? हा तर देवाची निंदा करते, देवा शिवाय कोणी पापाची क्षमा करू शकत नाई.” 8ते आपआपसात असा विचार करत होते, तवा येशूनं त्यायच्या मनातल्या गोष्टी जाणून म्हतलं, कि “तुमी तुमच्या मनात असा विचार नाई करायला पायजे.” 9यातून माह्यासाठी कोणतं सोपे हाय? तुह्या पापाची क्षमा झाली हाय, असं लकव्याच्या माणसाले म्हणनं की असं म्हण कि उठ, आपली बाज उचलून चाल फिर?
10पण मी, “जो माणसाचा पोरगा हावो, पृथ्वीवर पापाची क्षमा कऱ्याचा अधिकार हाय,” तवा त्यानं लकव्याच्या माणसाइकड़े फिरून पायलं अन् म्हतलं. 11“मी तुले सांगतो, उठ आपली बाज उचलून आपल्या घरी चालला जाय.” 12अन् लगेचं तो माणूस उठला, त्याची बाज उचलून तो सगळ्या देखत चालला गेला; यावर सर्व हापचप झाले, अन् देवाचे कवतुक करत म्हणाले, “कि आमी तर असं कधीच पायलं नाई.”
येशूनं लेवीले बलावलं
(मत्तय 9:9-13; लूका 5:27-32)
13तवा परत येशू निघून गालील समुद्राच्या काटावर गेला, अन् लय लोकं त्याच्यापासी येऊन जमा झाले, अन् तवा त्याने त्यायले देवाचे वचन शिकवले. 14जवा येशू जात होता, तवा त्यानं लैवी नावाच्या एका कर घेणाऱ्याले पायलं, जो हल्फईचा पोरगा होता, तो आपल्या जकात घेणाऱ्या नाक्यावर बसला होता, तवा येशूनं त्याले पाऊन म्हतलं, कि माह्या संग ये अन् “माह्य अनुकरण कर” तवा लैवी उठून त्याच्या मांग निघाला.
15मंग असं झालं कि येशू अन् त्याचे शिष्य लैवीच्या घरी रात्रीचं जेवण करून रायले होते, त्या ठिकाणी लय जकातदार व पापी लोकं जेव्याले पंगतीत बसलेले होते, कावून की ते लय होते अन् येशूच्या मागे आले होते. 16अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक परुशी लोकायन हे पायलं कि तो पापी अन् करवसुली करणाऱ्या#2:16 करवसुली करणाऱ्या त्यावाक्ती यहुदी लोकं करवसुली करणाऱ्याले पापी समजायचे कारण ते लोकायपासून जबरदस्ती जास्तीचे करवसुली करून घ्यायचे संग जेवण करून रायला हाय, तवा त्यायनं त्याच्या शिष्याईले म्हतलं कि, “हा तर करवसुली व पापी मानल्या जाणाऱ्या लोकाई संग जेवते.” 17हे आयकून येशूनं त्यायले असं म्हतलं, “कि निरोगी लोकायले वैद्याची (डॉक्टराची) गरज नाई, पण रोगी लोकायले गरज हाय, पण मी धर्मी लोकायले नाई पण पापी लोकायले बलव्याले आलो हाय.”
उपासावर प्रश्न
(मत्तय 9:14-17; लूका 5:33-39)
18तवा योहान बाप्तिस्मा देणाऱ्याचे शिष्य अन् परुशी लोकं उपास करत होते, मंग एक दिवस, काई लोकाईन येऊन येशूले विचारले, कि “योहानाचे शिष्य अन् परुशी लोकं उपास करतात, पण तुह्ये शिष्य कावून करत नाई?” 19येशूनं त्यायले म्हतलं “जोपरेंत माह्यावाले शिष्य माह्या संग हायत ते उपास कसे करतीन? कावून की ते खुश हायत, जसं एका नवरदेवाचे मित्र लग्नात आनंद करतात.”
20पण ते दिवस येतील, कि नवरदेव त्यायच्या पासून अलग केल्या जाईल, तवा ते त्या दिवशी उपास करतील. 21“कोणी कोण्या नव्या फळक्याचा तुकडा जुन्या कपड्याले लावत नाई, लावला तर थीगय करण्यासाठी लावलेला तुकडा चिमून जाईन अन् जुना कपडा आणखी जास्त फाटते, तसेच जर माह्या शिकवणी सोबत जुने रीतीरिवाज लावसान तर त्या शिकवणुकीचा काई उपयोग रायणार नाई.”
22“कोणी नव्या अंगुराचा रस जुन्या चामळ्याच्या थयल्या मध्ये ठेवत नाई, पण जर नवीन अंगुराचा रस जुन्या चामळ्याच्या थयल्या मध्ये ठेवला तर चामळ्याच्या थयल्या फुटतात, अन् अंगुराचा रस नाश होते, म्हणून नवीन अंगुराचा रस नवीन चामळ्याच्या थयल्यात ठेवतात.”
येशू आरामाच्या दिवसाचा प्रभू
(मत्तय 12:1-8; लूका 6:1-5)
23मंग असं झालं कि एका आरामाच्या दिवशी म्हणजे यहुदी आरामाच्या दिवशी, येशू अन् त्याचे शिष्य वावरातून चालले होते, तवा ते कणसं तोडून खाऊन रायले होते. 24तवा काई परुशी लोकायन येशूले म्हतलं, “पाहा, हे आरामाच्या दिवशी जे काम करायले पायजे नाई ते काम करतात, हे आमच्या नियमशास्त्राच्या विरोधात हाय.”
25येशूनं त्यायले विचारलं कि, तुमी वाचलं नाई काय “जवा दाविद राजाले अन् त्याच्या सोबत्यायले भूक लागली होती, तवा त्यानं काय केलं? 26अबियातार महायाजक असतांना तो कावून देवाच्या मंडपात गेला, अन् ज्या समर्पित भाकरी याजका शिवाय कोणीस नाई खाऊ शकत त्या दाविदान खाल्ल्या अन् त्याच्या संगच्या सोबत्यायले पण देल्या, मोशेच्या नियमानुसार फक्त देवाच्या मंडपातल्या भाकरी याजकालेच खाण्याची परवानगी हाय?” 27अन् येशूनं त्यायले म्हतलं, “कि आरामाचा दिवस देवानं माणसासाठी बनवला, तो त्यानं लोकायवर वझं दियाले बनवला नाई. 28म्हणूनच माणसाचा पोरगा आरामाच्या दिवसावर अधिकार ठेवतो.#2:28

Currently Selected:

मरकुस 2: VAHNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for मरकुस 2