1
उत्पत्ती 6:6
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला.
Comparer
Explorer उत्पत्ती 6:6
2
उत्पत्ती 6:5
पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले
Explorer उत्पत्ती 6:5
3
उत्पत्ती 6:8
परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती.
Explorer उत्पत्ती 6:8
4
उत्पत्ती 6:9
ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.
Explorer उत्पत्ती 6:9
5
उत्पत्ती 6:7
तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन; मानव, पशू, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन; कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे.”
Explorer उत्पत्ती 6:7
6
उत्पत्ती 6:1-4
नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यांना कन्या झाल्या; तेव्हा मानवकन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले; आणि त्यांच्यातल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही; तो देहधारी आहे; तथापि मी त्याला एकशे वीस वर्षांचा काळ देईन.” त्या काळी भूतलावर महाकाय1 होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.
Explorer उत्पत्ती 6:1-4
7
उत्पत्ती 6:22
नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.
Explorer उत्पत्ती 6:22
8
उत्पत्ती 6:13
मग देव नोहाला म्हणाला, “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन.
Explorer उत्पत्ती 6:13
9
उत्पत्ती 6:14
तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर; त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव.
Explorer उत्पत्ती 6:14
10
उत्पत्ती 6:12
देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती.
Explorer उत्पत्ती 6:12
11
उत्पत्ती 6:19
सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी दोन-दोन जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने.
Explorer उत्पत्ती 6:19
Accueil
Bible
Plans
Vidéos