मत्तय 26
26
येशुले माराना कट
(मार्क १४:१,२; लूक २२:१,२; योहान ११:४५-५३)
1मंग येशुनी ह्या सर्वा गोष्टी शिकाडानं संपाडानंतर आपला शिष्यसले सांगं, 2तुमले माहित शे की, दोन दिन नंतर वल्हांडण सण शे अनी मनुष्यना पोऱ्याले क्रुसखांबवर खियाकरता धरी देतीन.
3तवय कैफा नावना प्रमुख याजकना वाडामा मुख्य याजक अनं वडील लोके गोया व्हयनात, 4अनी येशुले गुपचुप धरीन मारी टाकानी योजना त्यासनी बनाडी. 5“लोकसमा दंगल व्हवाले नको म्हणीन हाई सणना दिनमा नही करानं, अस त्यासनी सांगं.”
येशुना तेल अभिषेक
(मार्क १४:३-९; योहान १२:१-८)
6जवय येशु बेथानी गावले जो पहिले कोडरोगी व्हता त्या शिमोनना घर व्हता. 7#लूक ७:३७,३८मंग तो जेवाले बठेल व्हता तवय एक बाई महागडं सुगंधी तेल संगमरवरना भांडामा लई वनी अनी तिनी ते भांडं फोडीन तेल त्याना डोकावर वती दिधं. 8हाई दखीन त्याना शिष्य संतापिन बोलनात, हाई का बर नासाडं? 9हाई “ईकीन बराच पैसा भेटतात अनी त्या गरीबसले देता येतात!”
10येशुने हाई दखीन त्यासले सांगं, हाई बाईले का बर त्रास देतस? तिनी तर मनाकरता चांगल कार्य करेल शे. 11गरीब कायमना तुमना जोडे शेतस, पण मी कायमना तुमना जोडे शे अस नही. 12तिनी मना शरिरवर सुगंधी तेल वतीन मना उत्तरकार्यनी तयारी पहिलेच करी दिधी. 13मी तुमले सत्य सांगस की, सर्व जगमा जठे जठे सुवार्ता सांगतीन, तठे तठे तिनी जे सत्कर्म करेल शे त्यानी आठवण करतीन.
यहुदा ईश्वासघात करस
(मार्क १४:१०-११; लूक २२:३-६)
14मंग बारा शिष्यसमधला एक यहूदा इस्कर्योत मुख्य याजकसकडे गया. 15अनी त्यानी सांगं, मी येशुले धरीन तुमले सोपी दिसु तर माले काय दिशात? मंग त्यासनी त्याले तिस रूपया दिधात. 16तवयपाईन यहूदा त्याले कसं धरी देवाणी यानी संधी दखु लागना.
शेवटलं जेवण
(मार्क १४:१२-२१; लूक २२:७-१३,२१-२३; योहान १३:२१-३०)
17नंतर बेखमीर भाकरीना सणना पहिला दिन शिष्य येशुकडे ईसन बोलणात, आपलाकरता वल्हांडण सणना जेवणनी तयारी आम्हीन कोठे करानी अशी तुमनी ईच्छा शे?
18त्यानी सांगं, नगरमा एक माणुसकडे जाईन त्याले सांगा की, गुरू म्हणस, मनी येळ जोडे येल शे; माले मना शिष्यसनासंगे तुना आठे वल्हांडण सण कराना शे.
19मंग येशुनी सांगेल प्रमाणे शिष्यसनी जाईन वल्हांडणना जेवणनी तयारी करी.
20संध्याकाय व्हयनी तवय तो बारा शिष्यससंगे जेवणले बठना. 21जवय त्या जेवण करी राहींतात तवय येशुनी सांगं, मी तुमले सत्य सांगस, तुमनामधला एकजण माले धरी दि.
22तवय त्या भलताच नाराज व्हयनात अनी त्या एक एक करीसन त्याले ईचारू लागनात, “प्रभुजी, मी शे, का तो?”
23येशुनी उत्तर दिधं, ज्यानी मनासंगे ताटमा हात टाकेल शे, तोच माले धरी दि. 24मनुष्यना पोऱ्याबद्दल जस लिखेल शे तसा तो जाई खरा, पण जो मनुष्यना पोऱ्याले धरी दि, त्या माणुसना धिक्कार असो, तो माणुस जन्मले नही येता तर ते त्याले चांगलं व्हतं!
25तवय त्याले धरी देणारा यहुदानी त्याले ईचारं, “गुरजी” मी शे का तो? येशुनी त्याले उत्तर दिधं, तु म्हणस तसच.
प्रभुभोजन
(मार्क १४:२२-२६; लूक २२:१४-२०; १ करिंथ ११:२३-२५)
26मंग त्या जेवण करी राहींतात तवय येशुनी भाकर लिधी अनं उपकार मानीन तोडी अनी शिष्यसले दिसन सांगं, “हाई ल्या अनी खा, हाई मनं शरीर शे,”
27अनी त्यानी प्याला लिधा अनी उपकार मानीन त्यासले दिसन सांगं, “तुम्हीन सर्वा यानामातीन प्या,” 28हाई मना “करारनं रक्त, शे. पापसनी क्षमा व्हवाकरता सर्वासना करता वताई जाई राहिना शे. 29मी तुमले सत्य सांगस की, मी तोपावत द्राक्षवेलना रस पेवाव नही जोपावत मना पित्याना राज्यमा नवा द्राक्षरस पितस नही.”
30मंग देवनं गानं म्हणीसन त्या जैतुनना डोंगरकडे निंघी गया.
पेत्रकरता भविष्यवाणी
(मार्क १४:२७-३१; लूक २२:३१-३४; योहान १३:३६-३८)
31मंग येशु त्यासले बोलना, “तुम्हीन रातले सर्वा माले सोडीन पळी जाशात, कारण शास्त्र अस सांगस की, ‘देव मेंढपायले मारी टाकी अनी कळपमाधला मेंढरसनी दाणादाण व्हई जाई.’ 32#मत्तय २८:१६पण मी जिवत व्हवानंतर तुमना पहिले गालीलमा जासु.”
33पेत्र येशुले बोलना, “सर्वा तुले सोडीन पळतीन पण मी तुले सोडीन पळाव नही!”
34येशु बोलना, “मी तुले सत्य सांगस की, आज रातले कोंबडा कोकावाना पहिले तु माले तिनदाव नाकारशी.”
35पेत्र त्याले बोलना, “तुनासंगे माले मरणं पडनं तरी मी तुमले नाकारावुच नही!” अनी बाकीना शिष्यसनी पण तसच सांगं.
गेथशेमाने बागमा येशुनी प्रार्थना
(मार्क १४:३२-४२; लूक २२:३९-४६)
36नंतर येशु त्याना शिष्यससंगे गेथशेमाने नावना बगीच्यामा वना, “मी पुढे जाईन प्रार्थना करस तोपावत तुम्हीन आठे बठा.” 37मंग त्यानी पेत्र अनं जब्दीना दोन्ही पोऱ्या यासले संगे लिधं अनं तो खुपच खिन्न अनं कष्टी व्हवाले लागना. 38तवय तो त्यासले बोलना, “मना जीव” मरणप्राय, खुपच खिन्न व्हई जायेल शे, तुम्हीन आठेच थांबा अनी मनासंगे जागा ऱ्हा.
39मंग तो थोडा पुढे जावानंतर पालथा पडिन अशी प्रार्थना कराले लागना की, “हे मना पिता व्हई तर हाऊ दुःखनां प्याला मनावरतीन टळी जावो! तरी मना ईच्छाप्रमाणे नको तर तुनी ईच्छाप्रमाणे व्हऊ दे.”
40मंग तो शिष्यसना जोडे वना अनी त्या झोपेल शेतस हाई दखीन पेत्रले बोलना, काय! एक तास बी तुमनाघाई जागं ऱ्हावायनं नही का? 41तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा अनी प्रार्थना करा; आत्मा तयार शे खरं पण शरीर अशक्त शे.
42परत दुसरी दाव जाईसन येशुनी हाई प्रार्थना करी की, “हे मना पिता, जर हाऊ प्याला मी पेवाशिवाय टळाव नही तर तुनी ईच्छाप्रमाणे व्हऊ दे.” 43मंग त्यानी परत ईसन त्यासले झोपेल दखं; कारण झोपमुये त्यासना डोया जड व्हयेल व्हतात. 44परत तो त्यासले सोडीन गया अनी परत त्यानी तिसरांदाव त्याच शब्दसमा प्रार्थना करी. 45परत तो शिष्यसकडे ईसन बोलना, काय तुम्हीन अजुन आरामशीर झोपी राहिनात? दखा! येळ जवळ येल शे, मनुष्यना पोऱ्या पापी लोकसना हातमा देवाई जाई राहिना. 46ऊठा, चला. दखा, माले धरी देणारा जोडे येल शे.
येशुले अटक करतस
(मार्क १४:४३-५०; लूक २२:४७-५३; योहान १८:३-१२)
47येशु बोली राहींता इतलामा बारा शिष्यसपैकी एक म्हणजे यहूदा तठे वना, त्यानाबरोबर मुख्य याजक, शास्त्री अनी वडील लोकसना माणसे तलवारी अनी टिपरा लई वनात. 48त्याले धरी देणारानी एक इशारा देयल व्हता तो असा की; “मी ज्यानं चुंबन लिसु तोच तो शे. त्याले धरा!” 49मंग त्यानी लगेच येशुजोडे ईसन, गुरजी, नमस्कार बोलीन त्याना चुंबन लिधात.
50येशु त्याले बोलना, “दोस्त! ज्या कामकरता तु येल शे ते कर” तवय त्यासनी जोडे ईसन येशुले धरं अनी अटक करी. 51मंग दखा, येशुनासंगे ज्या व्हतात त्यासनामातीन एकनी तलवार काढी अनी महायाजकना दासवर चालाडी अनं त्याना कान कापी टाका. 52तवय येशु त्याले बोलना “तुनी तलवार परत जागावर ठेव,” कारण “तलवार चालाडणारा सर्वजण तलवारघाईच नाश पावतीन.” 53तुले अस वाटस का की, माले मना पिताजोडे मांगता येस नही, आत्तेना आत्तेच तो मनाकरता देवदूतसना बारा सैन्यपेक्षा जास्त धाडु नही शकस? 54मंग शास्त्रना शास्त्रलेख कशा पुर्ण व्हई की, हाई व्हणं आवश्यकच शे?
55 #
लूक १९:४७; २१:३७ #
लूक १९:४७
तवय येशु लोकसनी गर्दीले बोलना, “जस एखादा नियम तोडणाराले धराकरता तलवार अनी टिपरा लई जातस तसा तुम्हीन माले धराले येल शेतस का? मी रोज मंदिरमा बशीन शिकाडी राहिंतु तरी तुम्हीन माले धरं नही. 56पण संदेष्टासना लेख पुर्ण व्हवाले पाहिजे म्हणीन हाई व्हयनं.” इतलामा सर्व शिष्य त्याले सोडीन पळी गयात.
मुख्य याजकससमोर येशुनी चौकशी
(मार्क १४:५३-६५; लूक २२:५४,५५,६३-७१; योहान १८:१३,१४,१९-२४)
57मंग येशुले धरणारासनी त्याले कैफा नावना मुख्य याजक याना घर लई गयात, तठे शास्त्री अनं वडील लोक जमेल व्हतात. 58पेत्र दुरतीन त्याना मांगेमांगे मुख्य याजकना वाडापावत गया अनं मझार जाईन त्याना शेवट काय व्हस हाई दखासाठे पहारेकरीसमा बसना. 59मुख्य याजक अनं सर्व न्यायसभा यासनी येशुले मारी टाकना उद्देशतीन त्यानविरूध्द खोटा आरोप शोधी राहींतात; 60अनी बराच खोटा आरोप करनारा वनात पण त्यामा त्यासले काहीच भेटनं नही, तरी शेवट दोनजण ईसन बोलणात की, 61#योहान २:१९“देवनं मंदिर तोडीन ते तिन दिनमा बांधाले मी समर्थ शे अस हाऊ बोलना.”
62तवय मुख्य याजक ऊठीसन येशुले बोलना, “तु काहीच उत्तर देत नही का?” या तुनाविरूध्द कितला आरोप करी राहिनात, 63पण येशु गप्पच राहिना. यावरतीन मुख्य याजकनी त्याले सांगं, “मी तुले जिवत देवनी शप्पथ घालिन विचारस की; जर तु देवना पोऱ्या ख्रिस्त शे तर तसं आमले सांगं.”
64येशु त्याले बोलना, “तु सांगस तसच आखो. मी तुमले सांगस; यापुढे तुम्हीन फक्त मनुष्यना पोऱ्याले सर्व समर्थना उजवीकडे बठेल अनं स्वर्गना ढगसवर येतांना दखशात!”
65तवय मुख्य याजकनी आपला कपडा फाडिसन सांगं, हाऊ देवनी निंदा करी राहिना, आते आमले आखो साक्षीदारसनी काय गरज! तुम्हीन हाई निंदा ऐकेल शे! 66तुमले काय वाटस? त्यासनी उत्तर दिधं, “हाऊ मृत्यूदंडना योग्य शे.”
67तवय त्या त्याना तोंडवर थुंकनात; अनं त्यासनी त्याले बुक्क्या माऱ्यात अनी बाकिनासनी त्याले थापड्या मारीन सांगं 68अरे ख्रिस्त! “भविष्यवाणी करीसन सांगं तुले कोणी मारं!”
पेत्र येशुले नकारस
(मार्क १४:६६-७२; लूक २२:५६-६५; योहान १८:१५-१८,२५-२७)
69इकडे पेत्र वाडामा बाहेर बठेल व्हता; तवय मुख्य याजकनी एक दासी त्यानाकडे ईसन बोलनी, “तु पण गालीलकर येशुसंगे व्हता.”
70तो सर्वासना समोर नकारीन बोलना. “तु काय सांगी राहीनी, माले माहीत नही” 71मंग तो बाहेर वट्टावर गया तवय आखो एक दासी त्याले दखीन तठे ज्या उभा व्हतात त्यासले बोलनी, “हाऊ पण नासरी येशु बरोबर व्हता.”
72परत “तो शपथ लिसन बोलना मी त्या माणुसले वळखत नही!”
73नंतर थोडा येळतीन तठे उभा राहणारासनी जोडे ईसन पेत्रले सांगं, खरच तु पण त्यानामाधलाच शे, कारण तुना बोलावरतीन तु कोण शे हाई समजी राहिनं.
74मंग पेत्र बोलणा, “जर मी खोटं बोली ऱ्हायनु तर, देव माले मारी टाको! अशा शपथा वाहीन बोलु लागणा, हाऊ ज्या माणुसबद्दल तुम्हीन बोली राहिनात त्याले मी वळखत नही!” इतलामा कोंबडा कोकायना, 75तवय “कोंबडा कोकावाना पहीले तु माले तीनदाव नाकारशी” असा ज्या शब्द येशुनी पेत्रले सांगेल व्हतात त्या त्याले आठवणात अनी तो बाहेर जाईसन हंबरडा फोडीन रडाले लागना.
Chwazi Kounye ya:
मत्तय 26: NTAii20
Pati Souliye
Pataje
Kopye
Ou vle gen souliye ou yo sere sou tout aparèy ou yo? Enskri oswa konekte
The New Testament in Ahirani language © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2020