मत्तय 5

5
येशू ख्रिस्ताचा पहाडी उपदेश
1जवा येशू लोकायची गर्दी पावून पहाडाच्या किनाऱ्यावर थोडा वरती गेला, तवा त्याचेवाले शिष्य त्याच्यापासी आले अन् तो त्यायले शिकवण देण्यासाठी बसला. 2अन् येशू मोठ्याने बोलून देवाच्या वचनातून शिकवण देऊ लागला, अन् म्हतलं.
धन्य वचन
3“धन्य हायत, ते ज्याईले वाटते कि त्यायले देवाची आवश्यक्ता हाय, कावून कि देवाचं राज्य त्यायचं हाय. 4धन्य हायत जे दुख करतात, कावून कि देव त्यायले सांत्वना देईन. 5धन्य हायत जे नम्र हायत, कावून कि ते सगळ्या पृथ्वीचे वतन भोगतीन. 6धन्य हायत जे धार्मिकतेचे जीवन जगायची इच्छा ठेवतात, कावून कि देव त्यायले तृप्त करीन.
7धन्य हायत जे दयावान हायत, कावून कि देव त्यायच्यावर दयावान होईन. 8धन्य हायत जे ज्यायचे मन शुद्ध हायत, कावून कि ते देवाले पायतीन. 9धन्य हायत जे शांती करणारे हायत, त्यायले देवाचे लेकरं म्हणतीन. 10धन्य हायत, जे धार्मिक जीवनाच्या कारणाने सतावल्या जातात, कावून कि देवाचं राज्य त्यायचं हाय.
11धन्य हा तुमी जवा माणसं माह्या कारणाने तुमची निंदा करतीन, अन् तुमाले सतावतीन, अन् कावून कि तुमी माह्ये शिष्य हा म्हणून खोटं बोलून तुमच्या विरोधात सगळ्या प्रकाराच्या बेकार गोष्टी करतीन. 12तुमी आनंदित व उल्लाशित होवून जा, कावून कि तुमच्यासाठी स्वर्गात मोठं प्रतिफळ हाय, अन् जसं त्यायनं त्या भविष्यवक्त्यांना जे तुमच्या आगोदर होते अशाचं प्रकारे सतावल होतं.”
मीठ अन् ऊजीळा सोबत तुलना
(मार्क 9:50; 4:21; लूका 14:34-35; 8:16)
13“तुमी या जगाच्या लोकायसाठी मिठा सारखे हा, पण मिठाचा खारटपणा गेला कि असा कोणताही पदार्थ नाई, कि त्याले अजून खारट बनवलं जावं, मंग ते कोणत्या हि कामी येणार नाई, फक्त बायर फेकल्या जाईन अन् माणसाच्या पायान तुडवल्या जाईन. 14तुमी सगळ्या जगासाठी ऊजीळासारखे हा, जो नगर पहाडावर वसलेले हाय ते लपू शकत नाई.
15अन् लोकं दिवा लावून बाजी खाली ठेवत नाई, पण दिव्याले टेबलावर ठेवतात, कावून की त्याचा ऊजीळ सगळ्या इकडे पळला पायजे. 16तसचं तुमचा हि ऊजीळ माणसाच्या समोर चमकावा, कि ते तुमच्या चांगल्या कामाले पाऊन, ते तुमच्या स्वर्गातल्या देवबापाची प्रशंसा करतीन.”
मोशेच्या नियमशास्त्राच पूर्ण होणं
17“हे नका समजू कि मी, मोशेचे नियमशास्त्र किंवा भविष्यवक्त्याच्या लिवलेल्या गोष्टीले रद्द करण्यासाठी आलो हाय, पण मी या कामासाठी नाई, पण जे लिवलेल हाय ते पूर्ण कऱ्यासाठी आलो हावो. 18कावून कि मी तुमाले खरं सांगतो, कि जोपर्यंत अभाय अन् पृथ्वी नष्ट नाई होईन, तोपर्यंत मोशेच्या नियमशास्त्रातून काई पण अन् काना मात्रा या बिंदू पण पूर्ण झाल्या शिवाय रायणार नाई.
19म्हणून जो कोणी या लायण्यातली लायनी एका आज्ञेचे पण उल्लंघन करणार, अन् तसाचं लोकायले शिकवीन तो देवाच्या राज्यांमध्ये सगळ्याईत लायना मानला जाईन, पण जो कोणी त्या आज्ञाचं पालन करीन, अन् ते शिकवीन, तोच देवाच्या राज्यात महान म्हणल्या जाईन. 20कावून कि मी तुमाले सांगतो, जर तुमची धार्मिकता मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् परुशी लोकायच्या धार्मिकतेपेक्षा अधिक नाई, तर तुमी देवाच्या राज्यात कधीच प्रवेश करू शकणार नाई.”
हत्या अन् क्रोधाच दंड
21“हे आज्ञा तुमाले मालूम हाय, कि देवानं आपल्या पूर्वजाले सांगतल होतं कि हत्या करू नका, अन् जो कोणी हत्या करीन त्याले न्यायालयात न्याय दंडाचा सामना करा लागीन. 22पण मी तुमाले सांगतो, कि जो कोणी आपल्या भावावर राग करीन, त्याले न्यायसभा मध्ये न्याय कऱ्याले घेऊन जातीन व त्याले सजा देतीन, अन् जो कोणी आपल्या भावाले मुर्खा म्हणीन, तर तो पण महासभा मध्ये दंडाच्या योग्य ठरीन, अन् जर तुमी आपल्या भावाले म्हणीन, अरे महामुर्खा तो नरकाच्या आगीच्या दंडाच्या योग्य होईन.
23म्हणून जर तू आपले भेट वेदीत अर्पित हायस, तवा जर तुले ततीसा आठवते कि माह्या भावाच्या मनात माह्या बद्दल काई विरोध हाय, तवा ततीच आपली भेट वेदीवर सोडून दे. 24अन् जाऊन पयले आपल्या भावाच्या संग दोस्ती कर, मंग येऊन आपली भेट चढव.
25अन् जोपर्यंत तू आपल्या दुश्मना बरोबर रस्त्याने हायस, जो तुले न्यायाधीशापासी घेऊन जातीन तवा लवकर मेलमिलाप करून घे, असं नाई व्हावं कि न्यायाधीश तुले शिपायायच्या हाती देईन, अन् तुले जेलात टाकल्या जाईन. 26मी तुमाले खरंखोर सांगतो, कि जोपर्यंत तू कवडी-कवडी भरून देशीन नाई, तोपरेंत जेलातून सुटशीन नाई.”
व्यभिचार च्या विषयात शिक्षण
27“हे आज्ञा#5:27 आज्ञा हे पवित्रशास्त्रातल्या दहा आज्ञा मधली एक आज्ञा हाय, जे देवानं मोशेच्या द्वारे इस्त्रायलाच्या लोकायले देली होती तुमाले मालूम हाय, जे हे म्हणते कि तू व्यभिचार करू नको. 28पण मी तुमाले म्हणतो, कि जो कोणी कोण्या बाईवर बेकार नजर टाकीन, तर त्यानं आपल्या मनात तिच्या बद्दल व्यभिचार केला.
29अन् जर तुह्याला उजवा डोया तुले पापात टाकत हाय, तर तो काढून फेकून दे, कावून कि तुह्यासाठी हेच चांगलं हाय, कि तुह्याल्या शरीरातला एक अंग जरी नाश झाला, तरी तुह्यालं सर्व शरीर नरकात टाकला जाईन नाई. 30अन् जर तुह्यावाला उजवा हात तुले जर पापात टाकत अशीन तर त्याले कापून फेकून दे, कावून कि तुह्यासाठी हेच चांगलं हाय, कि तुह्याल्या शरीरातला एक भाग जरी नाश झाला, तरी तुह्याला सर्व शरीर नरकात टाकला जाईन नाई.”
फारकतीच्या विषयात शिक्षण
31“हे आज्ञा तुमाले मालूम हाय, जे हे म्हणते कि जो कोणी आपल्या बायकोले सोडीन, त्याने तिले फारकती प्रमाण पत्र द्यावी.
32पण मी तुमाले म्हणतो, जो कोणी आपल्या बायकोले व्यभिचाराच्या शिवाय कोण्या दुसऱ्या कारणान फारकती देईन, तर तो तिच्या कडून व्यभिचार करून घेतो, अन् जो कोणी त्या सोडलेल्या बाई संग लग्न करते, तो पण व्यभिचार करतो.”
शपत खावू नये
(मत्तय 19:9; मार्क 10:11-12; लूका 16:18)
33“तुमाले हे पण माहीत हाय कि देवानं आपल्या पृर्वकाळाच्या लोकायले म्हतलं होतं, खोटी शपत खाऊ नको पण देवाच्यासाठी आपली शपत पूर्ण करजो. 34पण मी तुमाले सांगतो, कि कधीही शपत खाऊ नका, स्वर्गाची पण नाई, कावून कि ते देवाच राजासन हाय.
35अन् पृथ्वीची पण नाई, कावून कि ते त्याच्या पायाचे पदासन हाय, अन् यरुशलेम शहराची पण नाई, कावून कि ते महाराजाचे नगर हाय. 36अन् आपल्या मस्तकाची पण शपत नका खाऊ, कावून कि तू एकाही केसाले पांढरे किंवा काळे करू शकत नाई. 37पण तुमचे बोलणे हो चे हो, या नाई चे नाई राहो, कावून कि जे काई याहून अधिक होते ते सैतानापासून हाय.”
बदला नका घेऊ
(लूका 6:29-30)
38“हे आज्ञा तुमाले मालूम हाय, जे हे म्हणते कि डोयाच्या बदल्यात डोया अन् दाताच्या बदल्यात दात. 39पण मी तुमाले सांगतो, कि जो कोणी तुह्यालं वाईट करीन त्याचा बदला घेऊ नको, अन् जो कोणी तुह्याल्या उजव्या गालावर थापड मारीन, त्याच्या पुढे दुसरा पण गाल दे.
40अन् जो तुले घासत न्यायालयात घेऊन जाईन, व तो तुह्या सदरा घ्यायले पाईन, तवा त्याले दुसरा सदरा पण देऊन दे. 41जो कोणी तुले एक कोस जाणून बुजून नेईन तवा त्याच्या संग दोन कोस चालला जाय, 42अन् जो कोणी तुले मांगत अशीन त्याले दे, अन् जो कोणी तुले उधार मांग्यासाठी आला अशीन तवा त्याच्यापासून पाठफिरवू नको.”
43“तुमी लोकायले म्हणतांना आयकलं हाय, कि मोशेच्या नियमशास्त्राच्या लिवलेल हाय, कि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर अन् वैऱ्यावर वैर. 44पण मी तुमाले सांगतो, तुमी आपल्या वैऱ्यावर प्रेम करा अन् जे तुमाले सतावते त्यायच्यासाठी प्रार्थना करा. 45ज्याच्याच्यान तुमी स्वर्गातल्या देवबापाचे लेकरं व्हाल, कावून कि तो बेकार लोकायवर अन् चांगल्या लोकायवर आपला सुर्य उगवतो, अन् धर्मी अन् अधर्मी दोघावर पण पाणी पाडतो.
46कावून कि जर तुमी आपल्या प्रेम करणाऱ्यायलेच प्रेम करसान, तर देव तुमाले प्रतिफळ नाई देईन, जकातदार पण तर असचं करते. 47अन् जर तुमी फक्त आपल्या भावायलेच नमस्कार करसान, तर कोणत मोठं काम करता? जे देवावर विश्वास नाई करत ते पण तर असचं काम करतात. 48याच्यासाठी नेहमी चांगले काम करा, तुमी पण सगळ्यात चांगलं बना जसा तुमचा स्वर्गातला बाप सगळ्यात चांगला हाय.”

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

मत्तय 5: VAHNT

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល