Kisary famantarana ny YouVersion
Kisary fikarohana

लुका 20

20
यहुदी पुढाऱ्या कडून येशूले प्रश्न
(मत्तय 21:23-27; मार्क 11:27-33)
1एक दिवस असं झालं, कि जवा येशू देवळात लोकायले शिकवण देत होता अन् सुवार्था सांगू रायला होता, तवा मुख्ययाजक अन् मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक, यहुदी पुढारी लोकायबरोबर त्याच्यावाल्या पासी येऊन उभे झाले. 2अन् त्याले म्हणू लागले, “आमाले सांग, तू कोणत्या अधिकारानं हे काम करत? अन् तो कोण हाय, ज्यानं तुले हा अधिकार देला हाय?” 3तवा येशूनं त्यायले उत्तर देलं, “मी पण तुमाले एक गोष्टी विचारतो, अन् ते तुमी मले सांगा, 4-5योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता, कि माणसापासून होता?” “तवा ते आपआपसात, विचार करू लागले स्वर्गापासून हाय असं म्हतलं तर तो मनीनं तुमी त्याच्यावर विश्वास कावून केला नाई? 6अन् जर आपण म्हतलं कि, माणसापासून होता असं म्हतलं तर काय होणार? लोकं आमाले दगड मारतीन, कावून कि त्यायले लोकायचा भेवं लागत होता, कावून कि लोकायले माईत हाय कि योहान बाप्तिस्मा देणारा खरोखरचं देवाचा संदेश देणारा भविष्यवक्ता होता.” 7तवा त्यायनं येशूले उत्तर देलं, “आमाले माईत नाई, कि तो कोणा कडून आला होता.” 8येशूनं त्यायले म्हतलं, “मंग कोणत्या अधिकारानं मी हे काम करतो, हे तुमाले सांगत नाई.”
बेकार शेतकऱ्याची कथा
(मत्तय 21:33-46; मार्क 12:1-12)
9तवा त्यानं लोकायले हे कथा सांगायले लागला, “कोण्या एका माणसानं अंगुराची वाडी लावली, अन् त्या अंगुराच्या वाडीले ठेक्यानं देऊन प्रदेशात चालला गेला. 10मंग हंगामाचा वाक्ती मालकाने आपल्या एका नौकराले अंगुराच्या वाडीच्या ठेकेदाराच्या इकळे पाठवलं, कि जे काई नफा होईन ते घेऊन या. पण वाडीच्या ठेकेदारायन नौकराले धरून मारलं, अन् त्याले त्यायनं रिकाम्याच हातांन पाठून देलं. 11मंग त्यानं अजून एका दासाले पाठवलं, अन् त्यायनं त्याले पण झोडपले अन् त्याच्या अपमान करून रिकाम्या हातानच वापस पाठवलं, 12मंग अजून त्यानं तिसऱ्याले पाठवलं, अन् त्यायनं त्याले पण घायल करून हाकलून देलं, 13तवा अंगुराच्या वाडीच्या मालकान म्हतलं, मी आता काय करू? मंग त्याचा एक आवडता पोरगा होता, आखरी मध्ये त्यानं त्याच्या पोराले त्यायच्या कडे पाठवतो, कि होऊ शकते ते माह्या पोराचा मानदान व आदर सन्मान करतीन. 14जवा ठेकेदारायन त्याले पायलं, तवा आपआपसात विचार करून म्हणू लागले हा तर वारीस हाय, चला आपण त्याले मारून टाकू, मंग वाडी आपलीच होऊन जाईन. 15-16अन् तवा त्यायनं त्याले अंगुराच्या वाडीतून बायर काढलं अन् मारून टाकलं, आता तो अंगुराच्या वाडीचा मालक त्यायच्या संग काय करीन? तो येऊन त्या वाडीच्या ठेकेदाराले मारून टाकीन, अन् अंगुराची वाडी दुसऱ्याईले देऊन देईन.” हे आयकून त्यायनं म्हतलं, “देवानं असं नाई करावं.” 17तवा येशूनं त्यायच्या इकडे पाऊन म्हतलं, “मंग पवित्रशास्त्रात लिवलेल्या या भागाचा अर्थ काय हाय, जती हे म्हणते कि ज्या गोट्याले राजमिस्त्रीयांनी निकम्मा ठरवलं होतं, तोच कोपऱ्याचा मुख्य भाग झाला. 18जो कोणी त्या गोट्यावर पडीन, तो चकनाचूर होऊन जाईन, अन् ज्यावर तो पडीन, त्याचा चुरा-चुरा होऊन जाईन.”
मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् मुख्य याजकाची चाल
19त्याचं वाक्ती मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् मुख्ययाजकांनी त्याले पकडण्याचा प्रयत्न केला, कावून कि त्यायले समजलं कि, त्यानं आपल्या बद्दल हे कथा सांगतली हाय, पण ते लोकायले भेले. 20तवा ते त्याच्यावर टपून होते, अन् काई भेद घेणाऱ्या लोकायले त्याच्याकडे पाठवलं कि धर्मी असाच्या भेष बनवून त्याची कोणती न कोणती गोष्ट पकडावं, कि त्याले पकडून राज्यपालाच्या हातात देऊन द्यावं. 21त्यायनं येशूले फसव्यासाठी विचारलं, “हे गुरुजी आमाले मालूम हाय कि तुमी जे बोलता ते नेहमीच खरं असते, अन् शिकवते पण अन् कोणाचा भेदभाव नाई करत, पण देवाचा मार्ग बरोबर खरं-खरं सांगते. 22मंग आमाले सांग, काय आमाले रोमी सम्राटला कर देणं उचित हाय, किंवा नाई?” 23-26तवा येशूनं त्यायचा कपट ओयखून त्यायले म्हतलं, तुमी मले कायले पारखता, “एक दिनार (एक चांदीचा सिक्का) मले दाखवा, तवा येशूनं त्यायले म्हतलं, कि ह्याच्यावर चित्र अन् नाव कोणाचं हाय?” अन् त्यायनं म्हतलं “सम्राट राजाचं.” येशूनं त्यायले म्हतलं “जे रोमी सम्राटची वस्तु हाय ते रोमी सम्राटले द्या, अन् जे देवाची वस्तु हाय ते देवाले द्या,” तवा त्यांच्या च्यानं ते लोकायच्या समोर त्याले बोलण्यात धरू नाई शकले, तर त्याच्या उत्तरावून अचंभा होऊन चुपचाप रायले.
पुनरुत्थान अन् लग्न
(मत्तय 22:23-33; मार्क 12:18-27)
27मंग सदुकी लोकं जे हे विश्वास नाई करत होते कि मेल्याच्या बाद परत जिवंत होतीन, असे म्हणणाऱ्या काई लोकायन येशूच्या पासी येऊन विचारल. 28“हे गुरुजी, मोशेने आपल्यासाठी हे लिवलं हाय, कि जर कोणाचा भाऊ आपल्या स्वताची बायको असूनहि बिना लेकराचा मरून जाईन, तवा त्यांचा भाऊ त्याच्यावाल्या बायको संग लग्न करणार, अन् आपल्या भावासाठी वंश उत्पन्न करणार. 29तर सात भाऊ होते, पयला भाऊ तिच्या संग लग्न करून बिना लेकराचा मरून गेला. 30मंग दुसऱ्या भावानं पण तिच्या संग लग्न केलं अन् बिना लेकराचा मरून गेला. 31अशाचं प्रकारे सातही भावानं लग्न केलं अन् बिना लेकराचे मरून गेले. 32त्यानंतर ते बायको पण मरून गेली, 33तर मेलेल्यातून परत जिवंत झाल्यावर ती त्यायच्यातून कोणाची बायको होईन, कावून कि ती त्या सातही जनायची बायको झाली होती.” 34येशूनं त्यायले म्हतलं, “या जगातले लोकं लग्न करतात. 35पण जे लोकं या योग्य ठरतीन, कि त्या काळात मेलेल्यातून परत जिवंत होण्याले प्राप्त करतीन, त्याच्यात लग्न करून घेणं अन् लग्न करून देनं रायणार नाई 36अन् ते कधीही मरतीन नाई, कावून कि ते देवदूताच्या सारखे होतीन, अन् मेलेल्यातून परत जिवंत झाल्याने ते देवाचे पण लेकरं होतीन. 37पण मेलेले जिवंत होण्याच्या बाऱ्यात मोशेने जळनाऱ्या झुळपाच्या भागात लिवलेल हाय, कि मोशेनं प्रभूले अब्राहामाचा देव, अन् इसहाकाचा देव, अन् याकोबाचा देव असे म्हतलं हाय. 38तर देव मेलेल्याचा नाई, पण जिवंत लोकायचा देव हाय, कावून कि त्याचा जवळ सगळे लोकं जिवंत हायत.” 39तवा हे आयकून मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायतून कित्येकायनं म्हतलं, “हे गुरुजी तू तर ठिक बोलतोस.” 40अन् मंग त्यायनं त्याले आणखी काई विचारायची हिम्मत केली नाई.
ख्रिस्त दाविदाचा पोरगा कि दाविदाचा प्रभू हाय?
(मत्तय 22:41-46; मार्क 12:35-37)
41मंग त्यानं त्यायले विचारलं, “ख्रिस्त दाविद राजाच्या पोरगा हाय, असं कावून म्हणता? 42दाविद राजा स्वता स्तोत्रच्या पुस्तकात म्हणते, कि प्रभूने माह्या प्रभूले म्हतलं 43माह्या उजवे कडे बस, जतलग कि मी तुह्या शत्रूले तुह्याल्या पायाच्या पदासन करत नाई. 44दाविद राजा स्वता त्याले प्रभू म्हणते; तर मंग तो त्याचा पोरगा कसा काय होईन?”
मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायच्या विरुद्ध येशूची चेतावणी
(मत्तय 23:1-36; मार्क 12:38-40; लूका 11:37-54)
45जवा सरे लोकं आयकून रायले होते, तवा येशूने आपल्या शिष्यायले म्हतलं, 46“मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षक लोकायपासून सावधान राहा, ज्यायले लंम्बे झगे घालून लोकायमध्ये फिरनं. अन् बजारात नमस्कार अन् धार्मिक सभास्थानात मुख्य जागा अन् जेवाच्या वाक्ती पण मुख्यचं जागा त्यायले चांगल्या वाटते. 47व ते विधवा बायाचे अनादर पूर्वक घर हडपून टाकतात, अन् दाखवण्यासाठी लय वेळ परेंत लंबी-लंबी प्रार्थना करतात, त्यायले नेहमी दंड भेटीन.”

Voafantina amin'izao fotoana izao:

लुका 20: VAHNT

Asongadina

Hizara

Dika mitovy

None

Tianao hovoatahiry amin'ireo fitaovana ampiasainao rehetra ve ireo nasongadina? Hisoratra na Hiditra